विचार
Submitted by वर्षु on 23 April, 2019 - 05:12
मनामध्ये विचारांची गर्दी जेव्हा जेव्हा दाटून येते
नकळत डोळ्यातले पाणी केव्हातरी आटून जाते
मोती होऊन शब्दांचे कागदावरती उमटू लागते
विहंगम विचारांची गती हातातून निसटून जाते
केविलवाण्या नजरेने आभाळात पाहू लागते
त्याचवेळी एक सर मनाला माझ्या चाटून जाते
थंड शिडकावा तनामनात ती पेरून येते
आठवणींच गाठोड मस्तिष्कात भरून जाते
किती आणि काय काय मनाच्या डोहात साठवलेले असते
सुख आणि दुःखाच्या लहरीतच मग मी स्वतःच सामावून जाते
#राधिका (वर्षा गायकवाड)
विषय:
शब्दखुणा: