वैदेही - एक व्यक्तिचित्र
वैदेहीच मन आज दिवसभर विचलित होतं. हृदयात धडधडत होतं. लहानपणा पासून ते आत्ता पर्यंतच,गेल्या २९ वर्षांचं आयुष्य तिच्या डोळ्या सोमोरून तरळून गेलं. ती दहावी पास झाली तो क्षण. तिला ९७.७८ % पडले होते. ती शाळेतून पहिली आली होती. शिक्षक, आई-वडील, नातेवाईक मंडळी आणि इतर , सगळ्यांचाच समज असा होता की ती विज्ञान घेणार व बहुदा पुढे शल्यविशारद किंवा अभियांत्रिकी शिक्षण घेऊन अभियंता वगैरे होईलच , पण तसे काहीही न करता ती मास मीडिया आणि मास कॉम्युनिकेशन ची पदवीधर झाली होती.