मी पण

Submitted by संकल्पित on 26 June, 2023 - 05:58

बराखाडीतील शब्द, स्वप्नी आले असे काही ऐकतोय खूप म्हणे वाढलय 'मी' पण
आम्हाला अजून कळलच नाही
वजन वजा उंची बदल नेमका काय?
' म' ला दीर्घ वेलांटी अजून दुसरे काय झोपेलाही मग चाक फुटले उत्तर शोधण्या पळत सुटले .... पापणी भरता दरबार भरविला, विडयाच्या रुपी प्रश्न फिरविल!.
म्हणे अहंकाराचे लावतो लेपन.
सांगेल का कुणी काय हे मी पण ? मैफिल नेमकी रंगणार असता, आला अचानक तो महापूर कसला .... हातात पाणी घेऊन आई दिसली..... दरबारी मसला स्वप्नातच फसला !
गाल फुगवून घेऊन बसले पुस्तक नि वही ,
केली असती ' मी' केवढी कामगिरी .
पण तुला किंमतच नाही ..........
प्रश्न कित्येक ' मी ' मार्गी लावले असते . 'माझ्या' जय जय का रा ने आसमंत दुमदुमले असते !
परत एकदा ते स्वप्न पडण्या ,केलेले प्रयत्न सारे फसतात
पण शब्द तेवढे बघून माझ्याकडे,
उगाच हसताना दिसतात !!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users