ती आली

ती आली

Submitted by आपटे सुरेखा on 15 March, 2013 - 06:03

ती आली
स्वप्नांचे पर लेऊन आली
फुलांची उधळण उधळत आली
ती आली ती आली
स्वच्छंदी पाखरं अधिकच बिलगली
शीतल चांदणं पांघरून राहिली
निर/भ आकाश अनुभवताना
प्रसन्न पाहाट मोकळं हसली
ती आली ती आली
दंवाची कोमलता तिच्या मनांत
अना/घात कळीची मोहकता तिच्या डोळ्यात
वा-याची हाळी तिच्या शब्दात
मखमाली ॠजुत तिच्या स्पर्शात
ती आली ती आली
सोनेरी सूर्य सागरकिनारी
तृप्तीचा आनंद अंतरी बाहेरी
उंच भरारीची जय्यत तयारी
अन् नजर मात्र घरटयावरी
ती आली ती आली.

विषय: 
शब्दखुणा: 

ती आली पुन्हा

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 30 January, 2013 - 09:37

ती आली पुन्हा
आज अचानक
हवेच्या झुळकी गत.
मनी गारवा
एक हवासा
हलका पसरवत.
रूढ रोकडा
होता व्यवहार
थोडी ओळख त्यात.
कसे काय ते
बोलही वरवर
झाले न झाल्यागत.
कितीतरी पण
वर्षानंतर तार
थरथरली आत.

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - ती आली