प्रेम-बीम

Submitted by वर्षा.नायर on 25 September, 2012 - 05:28

तुला काय वाटतं मी तुझ्यावर प्रेम-बीम करते?
चल फुट असं काही नाही,
हा तर माझा एक विरंगुळा आहे,
तुझ्याविषयी विचार करणे, तुझ्याप्रेमामधे खंगणे हि ना सगळी माझी व्यसने आहेत,
मनाला रिझविण्याची थेरं आहेत

तुला काय वाटतं मी तुझ्यावर प्रेम-बीम करते?
चल फुट असं काही नाही,
प्रेम म्हणजे नेमकी काय रे?,
शेवटी सगळे स्वतःचीच कुठली तरी गरज भागविण्यासाठी असते सारे,
तुला प्रेमपत्र लिहुन मला आनंद मिळतो, तुझ्यावर प्रेम करुन आनंद मला मिळतो,
तुझ्या विरहामधे व्याकुळ होउन, खोल खोल मनाची दरी मी गाठते,
पण शेवटी ते मन माझच असतं ना, तो अनुभव माझाच असतो ना?

तुला काय वाटतं मी तुझ्यावर प्रेम-बीम करते?
चल फुट असं काही नाही,
तुझ्या भेटीनंतर माझ्या मनात शिलक राहीलेला तू,
मला बरेच काही देतो, तो तुझ्यापेक्षा ब-याच वेळा वेगळा असतो,
म्हणजे काय माझ्या मनातला तू शेवटी वेगळाच ना?
तू तर फक्त एक निमित्त,
शेवटी मीच, माझ्यासाठीच, माझ्या आत्म्यासाठीच,
बाकी सारे शून्य.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्हणजे काय माझ्या मनातला तू शेवटी वेगळाच ना?

तू तर फ़क्त एक निमित्त

शेवटी मीच, माझ्यासाठीच, माझ्या आत्म्यासाठीच
<<<

छान