प्रेम प्रेम म्हणतात खरं,
पण हे करायचं तरी कसं.....???
मग आठवतो व्हॅलेंटाइन डे
तसा हा विविध डेज् मधलाच एक
पण नव्या प्रेमींच्या आयुष्यात
ठरलेला एक अनोखा ब्रेक,
तरुणाईत पसरलेली ती गुलाबी लाट
अन् मुलामुलींच्या चेहर्यावर आलेला नविनच थाट,
मुलांमध्ये सुरु होते प्रपोझलचे
प्लॅनिंग आणि फिक्सिंग
तर मुलींमध्ये डेटिंगसाठीची
हॉट हॉट शॉपिंग,
सगळीकडे वातावरण फक्त सेलिब्रेशनचं
पण माझ्या मनात एकच प्रश्नं
प्रेम प्रेम म्हणतात खरं,
पण हे करायचं तरी कसं...???
सध्या ज्या हॉबीज अंगी असायला पाहिजेत खास
त्यासाठीही निघालेत आता कोचिंग क्लास,
पण प्रेमासाठी अद्याप तरी नाही कुठले क्लास
आणि असता तरी गॅरंटी काय कि मिळेल तुम्हाला फस्टक्लास,
मग वाटतं, विचारावं अनुभवी लोकांना
त्या वेडया लव्हगुरु पेक्षा सल्ला मागावा आजीअजोबांना
त्यांना विचारताच कुठलीही टीम नसताना
अचानक फिल्मी सेट उभा राहतो
आणि दोघेही फ्लॅशबॅकमध्ये जाऊन एक मेलोड्रामा सुरु होतो,
मग आईला विचारलं तर तिला माझच टेंशन येतं
अन् मला असंख्य सौंशयी प्रश्नांना सामोरं जावं लागतं,
भावंडांना विचारलं तर 'तू अजून लहान आहेस' हे ऐकवलं जातं
तर मित्रमैत्रीणींमध्ये 'तू बावळट आहेस' हे भासवलं जातं,
मग नसती नाच्चकी नको म्हणून
एकटीच उत्तर शोधते या प्रश्नाचं
कि प्रेम प्रेम म्हणतात खरं,
पण हे करायचं तरी कसं...???
आसपास पाहिलं तर काही मंडळी सुन्न दिसतात
नकळतपणे मनातल्या मनात खूप एकटी असतात
वाटतं, यांना प्रेम कधी जमलंच नाही कि
जमलेलं प्रेम निभावता आलं नाही ??
आजकाल काही तरुणांना,
प्रेमासाठी व्हॅलेंटाइन डे कि व्हॅलेंटाइन डे साठी प्रेम
हेच कळत नाही आणि
म्हणूनच त्यांना त्यांच्या व्हॅलेंटाइनला
एक वर्ष देखील सांभाळता येत नाही,
अखेर माझा प्रश्न उरतो प्रश्नंच
प्रेम प्रेम म्हणतात खरं,
पण हे करायचं तरी कसं...???
मग मनाची समजूत काढते,
कि जरा धीर धर
एक दिवस तू ही प्रेमात पडशील, तुलाही प्रेम दिसेन
प्रेमात पडल्यावर या उत्तराची मजा काही औरच असेन,
मग कळतील तुलाही प्यार महोब्बत भरी बाते
आणि तू ही पाहशील अनेक रंगीबेरंगी स्वप्ने,
तेव्हा तूच उत्तर देशील या प्रश्नाचं
कि प्रेम प्रेम म्हणतात खरं,
पण हे करायचं तरी कसं....??
पण हे करायचं तरी कसं.....???
-- फुले नेत्रा
(No subject)
(No subject)
छान 'मुक्तक'! आता एखादा
छान 'मुक्तक'!
आता एखादा 'लांबलचक' 'लेख'ही येउ द्या या विषयावर...!
(No subject)
सर्वांचे आभार....! चातक, "
सर्वांचे आभार....!
चातक, " लांबलचक लेख" नक्की.....:-)
सर्वांचे आभार....! चातक, "
सर्वांचे आभार....!
चातक, " लांबलचक लेख" नक्की.....:-)
(No subject)
सगळे नुसत्याच smileys
सगळे नुसत्याच smileys पाठवतायेत.....
नक्की आवडली की नाही...?
स्पष्ट आणि कडक आभिप्रायांच सुध्धा स्वागत आहे...
त्याची मदतच होईल मला....