वास्तव-प्रेमगाव-वास्तव

Submitted by सुमित खाडिलकर on 7 April, 2011 - 15:18

वास्तव-प्रेमगाव-वास्तव

खेळत होतो मी मनाची गाडी
चालवत होता मेंदू अन कंडक्टर प्रेम दिवाणी !
कंडक्टरला वाटायचं सारखी बस भरावी
आत येऊ पाहणाऱ्यांची लाईन बघून खुदकन बस हसावी!
driver कधी चिडून मग घ्यायचा बस stop वर
म्हणायचा सीट नसलेल्यांनी उतराबघू पटकन!
तेवढयात त्याला दिसायचा कंडक्टर पायावर उभा
खास प्रवाशासाठी आपली सीट सोडून बघा !
पण तेवढी ढील driver द्यायचा बर का त्याला
कारण तोही होता थोडा प्रेमावरती फिदा!
'वास्तव-प्रेमगाव-वास्तव' होता बस चा रूट
गावी पोचल्यावर कंडक्टर म्हणे, आता तू एकटाच सूट!
येताना जेवढ्यानी केले हात, तेवढ्या वाजवल्या मी घंटा
रिकामीच गाडी मात्र घेऊन जा आता!
कुण्या बिचारया प्रवाश्यांना नको नेऊ त्या भिकार जागी
पण 'मन' तिकडे नेण्याची duty बजाव आपली!
हिरमुसला होऊन driver बसला, केली सुरु गाडी
बघतो तर कंडक्टरही चढला होता, कारण ती होती प्रेम-दिवाणी!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

कविता खूप खूप छान. नाविन्यपूर्ण कल्पना .
शेवटच्या ओळीत ''कंडक्टरही चढली होती ''अस असायला पाहिजे का ?