Submitted by भानुप्रिया on 20 June, 2011 - 00:27
तुझे नक्षत्रांचे देणे..
माझ्या मनात दाटलेले,
रिक्त माझ्या क्षणांना..
काही अर्थ लाभलेले!!!
एकांती आर्त स्वरांनी..
विरहात रंग भरले,
स्मरणात तुझ्या गुंतुनी..
माझे 'मी' पण विरले,
मुग्ध ह्या भासांनी..
माझे जीवन भारलेले,
रिक्त माझ्या क्षणांना..
काही अर्थ लाभलेले!!
तुझे नक्षत्रांचे देणे..
माझ्या मनात दाटलेले,
रिक्त माझ्या क्षणांना..
काही अर्थ लाभलेले!
सहवास संपला परी..
जाणीव तुझी उरलेली,
श्वासांत गुंतुनी माझ्या..
रंध्रांमध्ये भिनलेली,
गात्रांत माझिया आता..
काही तुझे उरलेले,
रिक्त माझ्या क्षणांना..
तुझे वेध लागलेले..
तुझे नक्षत्रांचे देणे..
गुलमोहर:
शेअर करा