सखी गं

Submitted by तुषार जोशी on 28 January, 2011 - 22:26

तुझे काळे काळे रूप
मला आवडते खूप
तुझ्या रंगात साठली गुंगी गूढ
सखी गं सखी गं सखी गं

तुझ्या रूपाचा प्रभाव
जाणवतो चारी ठाव
काळ्या सावळ्या रंगास किती ओढ
सखी गं सखी गं सखी गं

तुझे असणे केवळ
करी जगणे प्रेमळ
तुझे नसताना आयुष्य अगोड
सखी गं सखी गं सखी गं

तुझे बोलणे लाघवी
रोमारोमात पालवी
तुझे लाजणे जिवास लावी वेड
सखी गं सखी गं सखी गं

(सावळ्या मुलीची गाणी / तुषार जोशी, नागपूर)

गुलमोहर: 

तुझे असणे केवळ
करी जगणे प्रेमळ
तुझे नसताना आयुष्य अगोड
सखी गं सखी गं सखी गं

खूप खूप सुरेख!

तुझे असणे केवळ
करी जगणे प्रेमळ

तुझे बोलणे लाघवी
रोमारोमात पालवी

तुम्ही कवीता लिहीली की, नुसती तीला नखशीखांत माझ्यासमोर उभी करुन टाकली बुवा,,

खूप खूप सुरेख! तुषार जोशी आपण तर जाम खुश

एक वीनंती
मी पन नागपुरचाच, नविन आहे मायबोलीवर
सुधीर नावाने माझ्या कवीता search करु शकता
आवडल्यास
भेटता येइल तसे कळवाल तर उत्तम
माझा mobile 9503012986