पावसाळे
कधी आला नदीला पूर...
वाहून गेले घरदारं.
गेले पाण्याखाली शेतातले उभे पीकं!
कधी खचली जमीन...
गाडले गेले गाव.
झाले अवघे जीवन भुईसपाट!
कधी झाली अतिवृष्टी...
कोसळल्या इमारती.
गेले पाण्याखाली वाहते रस्ते!
कधी पडला दुष्काळ...
तहानभूकेने झाला जीव व्याकूळ.
थांबता थांबेना डोळ्यांतला महापूर!
परवाचीच गोष्ट...
कोरोनाच्या संकटात म्हणती,
पडू नका घराबाहेर.
अन् वादळपावसात उडाले घराचे छप्पर!
मन, पाऊस....
काळे काळे ढग येता
जाते सारे अंधारून
मन बसे कोपर्यात
बावरून सुनसान
येती थेंब टपटप
एक साखळी धरून
लय भिनता पुरती
चिंबतान होते मन
भिने गारवा मनात
पुन्हा पुन्हा थरारुन
मूकपणे गाळी आसू
जाते थिजून थिजून
काळी रात्र सरे जेव्हा
येई पुन्हा उजाडून
ऊन्ह रेशमी बिलगे
मन जाई आसावून
कोंब इवले नाजूक
ऊन्ह झेलती मस्तीत
कंच हिरव्या ओठांत
दहिवर चमकत....
पावसाळ्याचं आणि कोकणाचं माझ्या मनात एक अतूट नातं आहे. कोकण तसं तर वर्षभर सुंदरच दिसतं पण त्याच रुप सर्वात खुलुन येत ते पावसाळ्यात. मी पहिल्यांदा गेले कोकणात तेच मुळी पावसाळ्यात. ढगांची दुलई पांघरलेला बावडा घाट श्वास रोखत पार करुन कोकणात प्रवेश केला आणि मग मात्र त्या हिरवाईने मनाला जी भुरळ घातली ती अगदी आज पर्यन्त. मग पुष्कळ वेळा पावसाळ्यात ही निरनिराळ्या वेळी कोकणात , घरी जाणं झालं आणि कोकणातलं पावसाळ्यातलं नित्य नव रुप ही तितकच मोहवणारं भासलं.
झुंबर ढगांचे
झुंबर ढगांचे
झुलते तालात
गाणे पावसाचे
पेरते वनात
सावळे सावळे
घन आभाळात
सल उकलवी
भुईचे अल्लाद
थेंब पावसाचे
येती आवेशात
मुग्ध रान सारे
बेहोशी उरात
दाटला कल्लोळ
गगनी अवनी
जलरुप घेई
स्वये नारायणी
हाय, पावसा सोबत आम्हीही एन्ट्री मारत आहोत ....लक्ष असू द्या
पहिल्या पावसाने ही जादू केली
माध्यम : अॅक्रलीक कलर विथ नाइफ (अॅक्रलीक कलरला ब्रश लावणार नाही , ही शप्पथ घेतलीय बहूदा )
हे सोफ्ट पेस्टल मधलं काम.... आमचं ड्रिम हाऊस
दिदीच बड्डे गिफ्ट....
सांगावा
आले सांगावा घेऊन
ढग गहिरे जरासे
येई पाऊस मागून
सोड मनाचे निराशे
येतो हवेत गारवा
वारा वाभरा दुवाड
किलकिले करुनिया
ठेव मनाचे कवाड
नवलाची येई खास
मत्त वळवाची माया
घेई ऊरात भरून
भुई-अत्तराचा फाया
पखरण थेंबुट्यांची
होत राही अविरत
सल कोरडे विरु दे
ओल राख अंतरात ....
(हा ट्रेक करताना पाऊस व धुक्याचे प्रमाण प्रचंड असल्याने फोटो काढणे शक्य झाले नाही. तरीही फोटोंची कमी भरून काढण्यासाठी लेखनाच्या पहिल्याच प्रयत्नात संपूर्ण भटकंती मायबोलीकरांच्या डोळ्यासमोर चितारण्याचा प्रयत्न केला आहे.)
मैत्री शाळेच्या निमित्ताने मेळघाटातल्या चिलाटी नावाच्या खेड्यात रहायची संधी मला मिळाली, त्यावेळी घेतलेली काही प्रकाशचित्रे
शाळेविषयी आपण अधिक जाणून घेऊ शकता ह्या दुव्यावर टिचकी मारून
http://www.maayboli.com/node/45066
१
२
मित्रांनो या पावसाळ्यात तुमच्या छोटुल्या मुलांबरोबर मिळून एक सुंदरसा प्रयोग आणि त्यासोबत धम्माल मस्ती नक्की करून बघा......
लंच टाईम च्या मध्ये घेतलेले प्रचि..