मैत्री उपक्रम माहिती आणि आवाहन - २०२२
खूपच उशीर झालाय हा धागा सुरु करायला. पण इंग्रजीत म्हणतात तसे 'बेटर लेट दॅन नेव्हर'
“मैत्री” च्या कामाला ह्या वर्षी २५ वर्ष होत आहेत.
जुन्या जाणत्या सभासदांना माहीत असेल पण नवीन सभासदांकरता म्हणून परत एकदा लिहितोय
'मैत्री' ही पुण्यातील स्वयंसेवी संस्था मेळघाटातील अगदी दूरच्या गावांमधे आरोग्य , शिक्षण व शेती याकरता काम करते. स्वयंसेवेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे सरकारी मदत न घेता 'मैत्री'चे काम सुरू आहे.
ह्या धाग्याद्वारे मैत्रीच्या ह्या वर्षातील (२०२१) उपक्रमांविषयक माहिती आणि आवाहन एकाच ठिकाणी संकलित करण्याचा मानस आहे.
या वर्षी उन्हाळा म्हणजे नुसताच ‘लांडगा आला रे आला’ झालं. जर्रा उन्हानं डोकं वर काढलं की पावसानं टपली मारलीच. दम खाऊन उन्हानं तडाखा दिला, पण तो येता येताच फुस्स झाला. ८-१० दिवसाच्या वर उन्हाळ्याची सत्ता टिकली नाही. तरी आमच्याकडं ४८ ला टेकून आला पारा.
या सगळ्या भानगडीत आंघोळीला वाजले १०. मस्त कोमट-कोमट पाण्यानं आंघोळ केली. ऊन चांगलंच कावलं होतं. पुन्हा सर्पसिंहासनात आरुढ झालो. हाताशी दुर्बीण ठेवली. हो. असलेली बरी. खूप वेळा काहीही अनपेक्षित दिसू शकतं.
मी ‘कुठंय?’ म्हणून विचारल्यावर त्यानं शांतपणे बोट दाखवलं. माझ्यापासून दोन-तीन फूट दूर खुर्चीच्या मागं उजव्या हाताला भिंतीला चिकटून साप शांत पसरला होता.
‘आपण याच्या खुर्चीखाली साप सोडून आलोय’ याचं काहीही ओझं न बाळगता रामलाल जसा शांतपणे आला तसाच अतीव शांततेत निघून गेला. मी वळून सापाकडं पाहिलं. त्यानं काहीतरी खाल्लेलं होतं. मी विचार केला. ‘हा शांत पसरला आहे. कुठं जाणार नाही आता. आता आधी गरम गरम चहा घेतो, मग त्याच्याकडं पाहू.’ रामलालच्या शांतपणानं मला चांगलाच आत्मविश्वास आला होता. मी आता ‘शूर वीर’ झालो होतो. मी अजूनच ऐसपैस बसलो. शौर्य दाखवायची हीच वेळ होती.
मला बघताच झुडूपात बसलेला लालबुड्या बुलबुल अकारण अस्वस्थ झाला. फांदीवर बसून भयंकर टिवटीवीनं निषेध करू लागला. त्याचं घरटं की काय म्हणावं इथं? पण त्या तपासात मी पडलो नाही. घाबरतात पाखरं फार. लहान काय अन् मोठी काय? घरटं प्रत्येकाला जपायचं असतं. आपल्या या विश्वासावरच तर चिवचिवती पिल्लं मोठी होतात. उडून जायचं बळ त्या धडपडत्या पंखात घरटंच तर भरतं. मग त्या पाखराच्या घरट्याशी त्याला घाबरवण्यात काय शहाणपण? ‘नाही रे बा. तुझ्याशी मी येत नाही. शांत रहा. पिलांना बळ दे. पंखावर आनंद घेऊन उडू दे त्यांना माझ्या रानात अन् घरट्याची ताकद या रानाला लाभू दे. रान फुलू दे, फळू दे, वाढू दे.’
अधून-मधून इकडं पाण्यावर येणा-या या बिबटाची विश्रामगृहाच्या लोकांना खोड चांगलीच माहिती. मी परतल्यावर यावर ब-याच गप्पा झाल्या. दोन बाजूला डोंगर अन् पसरत गेलेलं रान. जनावराला तोटा नाही. ससे, भेडकी, कोठरी, सांबरं, रोही, डुकरं, कधी चितळं तर कधी चराईला आलेलं चुकार ढोर. अन् काही नाही मिळालं तर रात्री गाव राखणीचं मोकाट कुत्रं.
नमस्कार मंडळी
पुण्यामधील ‘मैत्री’ संस्था अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील हातरु या मेळघाटमधील भागामध्ये गेली २० वर्षे काम करीत आहे. आरोग्य, शिक्षण, शेती, संघटन अशा विविध पातळ्यांवर हे काम चालते. धडक मोहिमेसोबतच गेली काही वर्षे आपण राबवत असलेले शैक्षणिक उपक्रमही मेळघाटातल्या मुलांकरता लाभदायक ठरत आहेत.
*मेळघाटात आरोग्य शिबीर - डॉक्टर हवे आहेत*
आपल्या सर्वांच्या मदतीनं मेळघाटात कुपोषण आणि बालमृत्यूवर नियंत्रण आणण्यात आपण यशस्वी झालो. अशी कामं एकट्या-दुकट्यानं होत नाहीत. तुम्ही सारे सोबत आलात म्हणूनच ते यशस्वी झालं.
नमस्कार मंडळी
मैत्रीची सुरुवात मेळघाटातल्या कुपोषण निर्मूलन आणि आरोग्य विषयक कामांपासून झाली असली तरी गेली काही वर्षे आपण मेळघाटातल्या शाळा आणि मुलांचे शिक्षण सातत्य या मुलभूत बाबींकडे आवर्जून लक्ष पुरवत आहोत.