ह्या धाग्याद्वारे मैत्रीच्या ह्या वर्षातील (२०२१) उपक्रमांविषयक माहिती आणि आवाहन एकाच ठिकाणी संकलित करण्याचा मानस आहे.
'मैत्री' ही पुण्यातील स्वयंसेवी संस्था मेळघाटातील अगदी दूरच्या गावांमधे आरोग्य , शिक्षण व शेती याकरता काम करते. स्वयंसेवेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे सरकारी मदत न घेता 'मैत्री'चे काम सुरू आहे. प्रत्येक माणसाला समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा आणि उर्मी असते यावर 'मैत्री'चा दृढ विश्वास आहे आणि म्हणूनच त्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे आणि संधी उपलब्ध करून देणे 'मैत्री' आनंदाने करते. शक्यतो मैत्रीच्या उपक्रमांमधे लोकांनी प्रत्यक्ष सहभाग घ्यावा ह्यावर 'मैत्री'चा भर आणि कटाक्ष असतो.
'मैत्री'चे काम मुख्यत्वेकरून अमरावती जिल्ह्यातील मेळघाट भागात चालते. तुम्हाला मेळघाटात जाणे शक्य नसेल तर तिथल्या उपक्रमांची आखणी करणे, पुर्वतयारी करणे ई. कामांकरता पुण्यातून मदत करू शकता.
उदा. शैक्षणिक साधने बनवणे, तान्ह्या बाळांसाठी कपडे तयार वा गोळा करणे, ते पिशव्यांमध्ये भरणे, औषधे जमा करणे, धान्य/ शिधा गोळा करणे व पाठवण्याची व्यवस्था करणे इ.
गेल्या अनेक वर्षापासून 'मैत्री' आपत्कालीन व्यवस्थापन संदर्भाने देखिल सातत्यपुर्ण कामगिरी करते आहे. त्याकरता त्या त्या वेळी प्रत्यक्ष
गरजेच्या ठिकाणी जाण्याबरोबरच तिथे न जाता करण्याजोगी अनेक कामे असतात त्यातही आपण सहभागी होऊ शकता.
'रद्दीतून सद्दी' ह्या उपक्रमा अंतर्गत तुमच्या सोसायटीमध्ये 'रद्दी संकलन' सुरु करून त्याच्या विक्रीतून आलेले पैसे मैत्रीला मदत म्हणून देऊ शकता. सोसायटीत मोठ्या प्रमाणावर जमणार नसेल तर स्वतःच्या आणि आपापल्या नातेवाएक मित्रमंडळी ह्यांच्या घरातली रद्दी विकून आलेले पैसे मैत्रीला मदत म्हणून देऊ शकता.
विविध कंपन्यामध्ये CSR ला पाठविण्यासाठी मेळघाट विषयीचे प्रस्ताव लिहिणे व त्याचा पाठपुरावा करणे या कामी आम्हाला मदत करू शकता. पुण्यातील ऑफिसमध्ये कार्यालयीन कामात काही वेळेला मदत लागते तेव्हा तुम्ही येऊ शकता.
'मैत्री' बाबत इतर लोकांना सांगून स्वयंसेवक व देणगी मिळवून देण्यासाठी आम्हाला मदत करू शकता.
अशा खूप काही कल्पना आणि मार्ग आमच्यापाशी आहेत आणि आम्हाला खात्री आहे की तुमच्याकडे यापेक्षा कितीतरी अधिक कल्पना असतील. चला तर मग, आपण एकत्र मिळून चांगले काहीतरी घडवूया.
Maitri is registered under the Bombay Public Trusts Act, 1950 on 31st July 1999 (E-2898 / Pune). PAN Number: AAATZ0344C, FCRA Registration Number: 083930473.
Office Address
Flat No. 9, Mahadev Smruti,
Near Bal Shikshan Mandir,
Mayur Colony,
Kothrud, Pune 411038
Telephone Numbers
Office: 9309930010
Website : http://www.maitripune.net
E-mail: maitri1997@gmail.com
मैत्रीच्या मेळघाट व इतर कामांसाठी तुम्ही यथाशक्ती आर्थिक मदत करू शकता.
ONLINE DOMESTIC DONATION
Maitri Account Details (avail this facility at no cost)
Bank : H D F C Bank
Branch : Kothrud, Pune
Savings Account Number : 01491450000152
Account Name : Maitri
MICR : 411240009
Details for RTGS / NEFT / IFS Code : HDFC0000149
ONLINE FOREIGN DONATION
Maitri Account Details (avail this facility at no cost)
Bank : H D F C Bank Limited
Branch : Kothrud, Pune, Maharashtra, India.
Savings Account Number : 01491170000017
Account Name : Maitri
MICR Code : 411240009
Swift Code : HDFCINBB
गेली अनेक वर्षे सुरु असलेली “मैत्री” ची मंगळवारची बैठक करोनाच्या काळात खंडीत झाली. सध्या ही बैठक प्रत्येक मंगळवारी नेहेमीप्रमाणे साडे सहा वाजता पण ऑनलाईन पद्धतीने सुरु आहे. ही बैठक ४० मिनिटांची असते. या बैठकीत उपस्थितीत राहणार्यांनी मैत्रीला 9309930010 वर तसे कळवावे.
२०२० साली सुरु केलेले दोन
२०२० साली सुरु केलेले दोन प्रकल्प अजूनही सुरु आहेत.
१. भोर तालुक्यातील रोहिडेश्वर माध्यमिक विद्यालय, नाटंबी ह्या शाळेतील ५१ मुला-मुलींना सायकल हवी आहे. त्यापैकी जवळ ३५ सायकली जमा झाल्या आहेत अजूनही सायकली हव्या आहेत.
२. ताडीवाला रस्ता परिसरातील अजूनही काही लोकांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याकरता मदत हवी आहे. त्याकरता ही निधी संकलनाचे काम सुरु आहे.
तरी अशा प्रकारची यथाशक्ती मदत करू शकता. धन्यवाद.
आपण देऊ केलेली देणगी एखाद्या
आपण देऊ केलेली देणगी एखाद्या विशिष्ट कामाकरता वापरली जावी असे मनात असेल तर जरूर कळवा. उदा. शेती, शिक्षण, वैद्यकीय किंवा करोना पश्चात लघूव्यवसाय परत सुरु करण्यास मदत म्हणून वगैरे.
मैत्रीला पावती पाठवता यावी म्हणून कृपया तुमचे नाव पत्ता ई. तपशील जरूर पुरवा.
फोन नंबर - 9309930010
E-mail पत्ता: maitri1997@gmail.com
मैत्री कडून आलेले निवेदन
मैत्री कडून आलेले निवेदन
मित्रांनो, आपण आपल्या कामासाठी आपल्या मित्रमंडळींकडूनच निधी उभा करतो. आपलं म्हणणं असं आहे की अशी प्रत्येक जण मग ती कुठल्याही वयाचा असली, ती कुठेही रहात असली, कितीही वयाची असली, ती कितीही व्यस्त असली तरी ती सामाजिक कामात योगदान देऊच शकते..
“रद्दीतून सद्दी” हा आपला असाच एक प्रकल्प आहे. आपल्या घरातील वर्तमानपत्रांची वा मासिकांची रद्दी विकून आपण त्यातनं मेळघाटमधील आपल्या कामासाठी निधी जमा करतो.. साघारण १९-२० वर्षांपूर्वी आपण हे सुरू केलं आणि आजवर त्यातून ३३ लाख रूपये गोळा करून ते मेळघाटच्या कामासाठी वापरले. ह्याचा सगळा बारीक बारीक हिशेब आपण ठेवला आहे. आजची मंगळवारची बैठक ह्या प्रकल्पाला बहाल आहे. आज आपण ह्या प्रकल्पात सातत्यानं काम करत असलेल्या काही मित्रांचे अनुभव ऐकून घेणार आहोत आणि त्यावर चर्चा करणार आहोत.. तसंच हे काम पुढे कसं वाढवता येईल ह्यावरही अधिक बोलणार आहोत.. जरूर या आणि आपल्या मित्रांनाही सांगा..
मंगळवारची बैठक नेहमीप्रमाणे ६:३० वाजता.
Join Zoom Meeting
संपर्क साधा ९३०९९३००१० वर
जेणेकरून तुम्हाला सभेला हजर राहता यावे म्हणून लिंक मिळू शकेल.
मैत्री सांगली-कोल्हापूरच्या
मैत्री सांगली-कोल्हापूरच्या पूराला विसरली नाही!
२०१९ च्या ऑगस्ट महिन्यात सांगली आणि कोल्हापूरमध्ये पूराने हाहाकार माजवला. हजारोंची घरे वाहून गेली.
'मैत्री'च्या स्वयंसेवकांनी पुरानंतर या भागात बरंच काम केलं होतं. पण टाळेबंदीमुळे ते काम पूर्ण करता आलं नाही. जवळजवळ एका वर्षानंतर मैत्रीच्या गटाने कोल्हापूर जिल्ह्यातील, शिरोळ तालुक्यातील आलास गावातील कांबळे वस्तीला पुन्हा भेट दिली. इथे अजूनही लोक तात्पुरत्या निवाऱ्यात राहात आहेत.
'मैत्री'ला त्यांची घरं आणि आयुष्यं पुन्हा उभी करायला मदत करायची आहे.
फोटोत गत्तेबाईंचे घर. त्या एकट्याच आहेत. त्यांच्या घराचे पूरात खूप नुकसान झाले. २०२० चा पावसाळा त्यांनी याच पत्र्याच्या घरात काढला.
मला थोडी देणगी द्यायची इच्छा
उत्तर मिळालं
मला थोडी देणगी द्यायची इच्छा
.
“मैत्री” च्या मेळघाटातील
“मैत्री” च्या मेळघाटातील शेती विषयक कामांचीं झलक आता छायाचित्रां मधून मिळायला लागली आहे.
पारंपारिकरित्या मेळघाटमध्ये गहू हरबर्या खेरीज तिसरे पीक घेतले जात नाही. त्यामुळे उन्हाळ्यात भाजीपाला मिळत नाही.
पण आता विदर्भातल्या कडक उन्हाळ्यातही अशी हिरवीगार शेतं- भाज्यांच्या वेली दिसायला सुरुवात झालीय. शेतात फक्त कांदे- वांगी -टोमॅटेाच नाही तर कार्ली, दोडकेही घ्यायचे प्रयोग सुरु झाले आहेत.
मल्टीलेअर शेती पाहण्यासाठी अनेक शेतकरी 'मारिता' व 'डोमी' या गावामध्ये जाऊन पहात आहेत. अनेक शेतकऱ्याना अशी शेती करण्यात रस आहे असं शेतकरी सांगत आहेत. यामुळे लोकांना ताजा गावातच भाजीपाला मिळेल. सध्या ५ गावातील ५ शेतकरी मल्टीलेअर पद्धतीने शेती करत आहेत. अशा प्रयोगासाठी लोकांना तयार करणं हे सोपं काम नाही. त्यासाठी “मैत्री”चं तिथलं इतरही काम मदतीला आलंय यात शंका नाही.
यामधे अर्थात पंजाबराव कृषी विद्यापिठाची आणि मैत्रीच्या मित्रांचीही मदत होते आहे.
हा कायापालट सुखद आहे हे निश्चित.
हब्बू बेठेकर डोमी यांच्या मल्टीलेअर शेती मधील भाजीपाला. रोपे वांगी,टोमॉटो, कोथिंबीर, मेथी, कारली, दोडका, भेंडी
१.
![WhatsApp Image 2021-04-01 at 4.40.43 PM (1).jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u22335/WhatsApp%20Image%202021-04-01%20at%204.40.43%20PM%20%281%29.jpeg)
२.
![WhatsApp Image 2021-04-01 at 4.40.47 PM (1).jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u22335/WhatsApp%20Image%202021-04-01%20at%204.40.47%20PM%20%281%29.jpeg)
३.
![WhatsApp Image 2021-04-01 at 4.40.45 PM (1).jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u22335/WhatsApp%20Image%202021-04-01%20at%204.40.45%20PM%20%281%29.jpeg)
४.
![WhatsApp Image 2021-04-01 at 4.40.43 PM.jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u22335/WhatsApp%20Image%202021-04-01%20at%204.40.43%20PM.jpeg)
छान काम
छान काम
मेळघाटातील होळीचा उत्सव
मेळघाटातील होळीचा उत्सव म्हणजे आपल्या कडील दिवाळीच.
होळीचा उत्सव परंपरेनुसार सलग ५ दिवस आदिवासी बांधव साजरा करतात. पहिल्या दिवशी गावातील लाकडे, जुना कचरा, धान्य यांचे पूजन करुन गावाचे पटेल होळी पेटवतात. त्याचसोबत मेघनाथाचे ही पूजन केले जाते. या सोबतच ढोलकी, चिटाप, किनकी, बासरी या वाद्यांच्या तालावर गावातील सर्वच लोक ताल धरतात. दुसऱ्या दिवसापासून मोठी मंडळी, मुले, मुली, महिला आपआपले ग्रुप बनवून फगवा मागत गाणी गातात. ५ दिवस गावात धमाल असते.
होळी
![Melghat Holi.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u22335/Melghat%20Holi.jpg)
मेघनाथ
![Melghat Meghnath.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u22335/Melghat%20Meghnath.jpg)
मेघनाथ (बाजूने)
![Melghat Meghnath 1.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u22335/Melghat%20Meghnath%201.jpg)
गेलं वर्षभर मेळघाटात शाळा
गेलं वर्षभर मेळघाटात शाळा भरल्या नाहीत. मेळघाटमित्रांनी चार गावात तरी अभ्यास वर्ग सुरु ठेवले. मुलं रोज पुस्तकं वाचतात, चित्र पहातात- काढतात, घरीही घेऊन जातात. मुलं पुस्तक पेटी सोबत- पुस्तकात रमलेली पाहून फारच बरं वाटतंय.
![Pustakpeti 1.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u22335/Pustakpeti%201.jpg)
कोणाचाच दोष नाही पण परिस्थितीला तोंड देण्यासाठी “मैत्री”चे अभ्यासवर्ग हा एक सकारात्मक उपाय नक्कीच आहे. मुलांचं कुतूहल- उत्सुकता अशीच वाढत रहावी-त्यांना पुस्तकं मिळत राहतील अशी जबाबदारी मैत्री घेते आणि घेत राहील.
वाह छान वाटलं वाचून आणि फोटो
वाह छान वाटलं वाचून आणि फोटो बघून. शेतीचे वेगवेगळे प्रयोग मस्तच.
मुलं पुस्तक पेटी सोबत- पुस्तकात रमलेली पाहून फारच बरं वाटतंय. >>> खरं आहे.
हर्पेन तुमचं आणि सर्व मैत्री टीमचं कौतुक.
हर्पेन तुमचं आणि सर्व मैत्री
हर्पेन तुमचं आणि सर्व मैत्री टीमचं कौतुक. +१
हर्पेन तुमचं आणि सर्व मैत्री
हर्पेन तुमचं आणि सर्व मैत्री टीमचं कौतुक.
काय सुंदर फोटो आहे. मुलं अगदी
काय सुंदर फोटो आहे. मुलं अगदी रमून गेली आहेत. किती पुण्याचे काम. सामाजिक दृष्ट्या महत्वाचे!! हर्पेन __/\__
धन्यवाद मंडळी
धन्यवाद मंडळी
ताडीवाला रोड परिसरात कंत्राटी
ताडीवाला रोड परिसरात कंत्राटी शिवणकाम करणाऱ्या अनेक बायका आहेत ज्यांचं काम टाळेबंदीत बंद झालं. आजही त्यापैकी अनेकींकडे काम नाही. त्यांच्या हाताला काही काम हवे, कामाची सुरूवात व्हावी म्हणून “मैत्री”ने त्यांना काही दिवसांमागे एक छोटं काम दिलं - जुन्या साड्यांपासून पिशव्या बनवण्याचं.
या महिलांचे व्यवसाय वाढवण्यासाठी “मैत्री” पुढेही मदत करणार आहे.
![Tadiwala Road Pishavya.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u22335/Tadiwala%20Road%20Pishavya.jpg)
पिशव्या
![Tadiwala Road Pishavya 1.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u22335/Tadiwala%20Road%20Pishavya%201.jpg)
सरकारच्या योजनांची पुरेपूर
सरकारच्या योजनांची पुरेपूर लाभ लोकांना मिळावा म्हणून मैत्रीचे सतत प्रयत्न असतात. याचंच एक उदाहरण म्हणजे मुख्यमंत्री सोलर योजनेतून डोमी गावातल्या बर्याच शेतकऱ्यांना सोलर पंप मंजूर झाले आहेत. शेतीविषयक शिबीरे आणि हे सोलर पंप ह्या दोन्हींमुळे काही लोकांनी उन्हाळ्यात सुद्धा प्रायोगिक तत्वावर भाजीपाला उत्पादन घेणे सुरु केले आहे. त्याच्यामुळे आता भर उन्हाळ्यात देखील ताज्या हिरव्या भाज्या खायला मिळतील. या फोटोत वांगी लावलेली दिसतात.
खूप छान अभिनंदन !
खूप छान
अभिनंदन !
मस्तच.
मस्तच.
मेळघाटातही करोनाचा शिरकाव
मेळघाटातही करोनाचा शिरकाव झाल्याच्या बातम्या येत आहेत. ह्या संकटाला सामोरे जाण्याकरता सज्ज असावे म्हणून नुकतेच मेळघाटातील कार्यकर्त्यांचे एक प्रशिक्षण शिबीर पार पडले. मैत्रीचे इतर स्वयंसेवी संस्थांना सोबत घेऊन काम करणेही सुरुच असते. सध्याच्या काळात तर ते अधिकच गरजेचे ठरत आहे. मैत्रीच्या कार्यकर्त्यांसोबत खोज चे कार्यकर्ते, पायवीर ग्रामसभेचे नागरिक, लोकबचपन बचाओ छत्तीस गढ ईत्यादी हजर सहभागी सदस्यांची एकूण संख्या ५८ होती.
हे प्रशिक्षण युमेटा फाउंडेशनच्या तज्ञ डॉक्टरांनी ऑनलाईन प्रकारे ( झूम- मिटिंग) घेतले.
काल (५ मे २०२१) 'मैत्री'च्या
काल (५ मे २०२१) 'मैत्री'च्या टीमने चिलाटी व सरवरखेडा या दोन गावात, हतरूच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या टीम बरोबर कोव्हिड-१९ चे रुग्ण शोधायला, तपासायला मदत केली.
या टीमने लोकांना औषधे दिली, व विलगीकरणात राहण्याचे महत्व पटवून दिले.
ही मोहीम आठवडाभर सुरु राहणार आहे. हतरू केंद्रातल्या सर्व गावांना या प्रकारे भेटी दिल्या जाणार आहेत आणि तपासणीही केली जाणार आहे.
गेल्या आठवड्यापासून मेळघाटमधे
“मैत्री” चे कार्यकर्ते गेल्या आठवड्यापासून मेळघाटमधे हाथरु आणि आसपासच्या गावातप्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॅाक्टर्स- सहकाऱ्यांसोबत काम करत आहेत. मैत्रीच्या काही मित्रांनी मेळघाटातल्या लोकांना / कार्यकर्त्यांना समजावे म्हणून इंग्रजीतली माहिती पत्रकं- पोस्टर्स सोप्या मराठी /हिंदी भाषेत करुन दिली आहेत.
“मैत्री” च्या अर्चना रानडे यांनी त्यासाठी वरचेवर प्रशिक्षण- उजळणी- सराव , प्रात्यक्षिकं, अशी योजना केली आहे. इतक्यातच डॅा. अभिलाषा पारखे आणि डॅा. पार्वती हळबे यांनी अजून एक प्रशिक्षणवर्ग सकाळी ९.३० ते १ पर्यंतच्या वेळात घेतला. विंदा बाळ त्यासाठी मदत करत आहेत. ह्यामुळे उजळणी होण्यास मोठीच मदत होत आहे.
आरोग्य मैत्रीणी, कार्यकर्ते त्यासाठी मैत्रीच्या चिलाटी गावातल्या कार्यालयात जमले आहेत. ॲानलाईन प्रशिक्षणाची आता त्यांनाही सवय झालीय.त्यांच्या मदतीनी गावागावातले लोक जागरुकपणे कोरोनाला दूर ठेवू शकतील.
मैत्रीच्या काही मित्रांनी
मैत्रीच्या काही मित्रांनी मेळघाटातल्या लोकांना / कार्यकर्त्यांना समजावे म्हणून इंग्रजीतली माहिती पत्रकं- पोस्टर्स सोप्या मराठी /हिंदी भाषेत करुन दिली आहेत. >>>
आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे ह्या कामाकरता मायबोलीकर आशुचॅम्पने देखील हातभार लावला आहे. त्याचे मनापासून आभार
अभिनंदन !
अभिनंदन !
छान, अभिनंदन !!
छान, अभिनंदन !!
मैत्रीचा लढा करोनाशी*
मैत्रीचा लढा करोनाशी*
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा टाळेबंदी झाली. त्याची झळ गरीब, रोजंदारीवर काम करणारे तसेच अंगमेहनती कामगार, छोटे व्यवसायिक एकट्या महिला, अशा सामान्य जनते पर्यंत पोहोचली आहे. अनेकांचा रोजगार बुडाला आहे, हातावर पोट असणाऱ्या अनेक जणांना उपाशी दिवस काढावे लागत आहेत.
“मैत्री” चा स्वयंसेवक आनंद जाधव याने ताडीवाला रोड येथील वस्तीतील लोकांना तातडीने मदत करण्याची गरज आहे, त्यांच्या रोजच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे असे कळवले आहे.म्हणून वस्तीतील गरजू लोकांना आपण मदत करण्याचे ठरवले आहे. एकूण ५०० कुटूंबांना देण्यासाठी सामान बांधून तयार करायचे आहे.
सामानातले साहित्य:
गव्हाचे पीठ- ५ किलो
तांदूळ- ५ किलो
तूर डाळ- १ किलो
तेल – १ किलो
मीठ- १ किलो
कांदा लसूण मसाला- २०० ग्रॅम
हळद - २०० ग्रॅम
साखर- २ किलो
चहा- १ पाकिट
पोहे– १ किलो
बेसन– १ किलो
कांदे- बटाटे मिळून २ किलो
(सामान, पॅकिंग, ट्रान्सपोर्ट) मिळून एकूण रु. ८००/- इतका खर्च येईल.१० जून पर्यंत किट तयार करुन त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे आहे.त्यासाठी आपण वस्तूरुपात अथवा निधी देऊन मदत करु शकता.
वस्तुरुपात मदतीसाठी: कोकण एक्सप्रेस हॉटेल समोर, कोथरुड स्टॅंड जवळ, कोथरुड.
४ ते ९ जून पर्यंत सामान सकाळी १०.०० ते १२.०० आणि संध्याकाळी ६.०० ते ७.०० यावेळेत आणून देता येईल.
देणगीसाठी -
Account name - Maitri. Bank details - HDFC Bank, Mayur Colony, PUNE.
Account No - 01491450000152. RTGS / NEFT / IFSC Code – HDFC 0000149.
MICR Code - 411240009.
(“मैत्री” साठी दिलेल्या देणग्या आयकर कायद्याच्या ८० जी अन्वये करमुक्त आहेत)
संपर्कासाठी
ओंकार भोपळे – ९८२३३ ०३ ०६५
"मैत्री" कार्यालय - ९३०९९३००१०
दरम्यान मेळघाटातील हब्बू
दरम्यान मेळघाटातील हब्बू बेठेकर, डोमी यांच्या मल्टीलेअर शेतीची सद्यस्थिती दर्शवणारी काही प्रकाशचित्रे
१.
![WhatsApp Image 2021-06-03 at 7.36.39 AM.jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u22335/WhatsApp%20Image%202021-06-03%20at%207.36.39%20AM.jpeg)
२.
![WhatsApp Image 2021-06-03 at 7.36.34 AM (2).jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u22335/WhatsApp%20Image%202021-06-03%20at%207.36.34%20AM%20%282%29.jpeg)
३.
![WhatsApp Image 2021-06-03 at 7.36.36 AM (1).jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u22335/WhatsApp%20Image%202021-06-03%20at%207.36.36%20AM%20%281%29.jpeg)
४.
![WhatsApp Image 2021-06-03 at 7.36.39 AM (1).jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u22335/WhatsApp%20Image%202021-06-03%20at%207.36.39%20AM%20%281%29.jpeg)
५.
![WhatsApp Image 2021-06-03 at 7.36.35 AM (1).jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u22335/WhatsApp%20Image%202021-06-03%20at%207.36.35%20AM%20%281%29.jpeg)
@हर्पेन ---
@हर्पेन ---
वस्तुरुपात मदतीसाठी, तुम्ही वस्तूचा किलोचा अपेक्षित भाव / ब्रँडचे नाव सांगितले तर एकसारख्या प्रकारच्या / दर्जाच्या वस्तू येतील. अन्यथा लोक आपल्या अंदाजाने / बजेटने आणतील व थोडे गोंधळाचे होईल;
आणि वाटल्यावर पण त्यांनी आपसात तुलना केली (मनुष्यस्वभाव आहे) तर किटगणिक वस्तू वेगळ्या दिसतील. एका चांगल्या कामाला / उद्देशाला नको त्या चर्चेला तोंड द्यावे लागेल.
कारवी, मनापासून धन्यवाद.
कारवी, मनापासून धन्यवाद. तुमचे विचार आणि भावना अत्यंत महत्वाची आहे. पण आपण देऊ करत असलेल्या कीट मधे ब्रँडेड किंवा खूप तफावत दिसून येईल अशा वस्तू नाहीतच म्हटले तरी चालेल. वस्तूरुपी मदत म्हणून आतापर्यंत १०० कि तांदूळ, ४० किले साखर, २० किलो डाळ, २ किलो हळद वगैरे आले आहे त्यांचे किट मधे रुपांतर होताना छोट्या पॅक मधे रुपांतर करून दिल्या जाणार आहेत. शिवाय आपण तिथे हे नेहेमीच आणि नक्कीच सांगत असतो की अनेक लोकांच्या सहभागातून आणि योगदानामुळेच ही मदत उभी करणे मैत्रीला शक्य होते.
पण तरीही आपली सूचना मैत्री टीम कडे पाठवत आहे.
मेळघाटात “मैत्री” च्या
मेळघाटात “मैत्री” च्या प्रयत्नामुळे अकोल्याच्या पंजाबराव कृषी विद्यापीठातल्या तज्ञांच्या मार्गदर्शनामुळे शेतीमध्ये झालेले बदल लक्षणीय आहेत. ते प्रत्यक्ष पहायला मिळतात तेव्हा अतिशय समाधान वाटतं. आपले मित्र- सहकारी त्यासाठी भरपूर कष्ट घेत आहेत.तेव्हाच हे चित्र दिसतं. हे बदल सगळ्या मेळघाटच्या शेतांमधे होऊन मेळघाट चा कुपोषणाचा प्रश्न संपण्यासाठी मदत व्हावी अशी इच्छा आहे. ही सुरुवात आहे. या प्रयोगांमधे सतत भर पडावीआणि बदल होत रहावे.
https://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/aurangabad/241/02062021/0/2/
Pages