कोंब

मन, पाऊस.....

Submitted by पुरंदरे शशांक on 30 July, 2018 - 23:47

मन, पाऊस....

काळे काळे ढग येता
जाते सारे अंधारून
मन बसे कोपर्‍यात
बावरून सुनसान

येती थेंब टपटप
एक साखळी धरून
लय भिनता पुरती
चिंबतान होते मन

भिने गारवा मनात
पुन्हा पुन्हा थरारुन
मूकपणे गाळी आसू
जाते थिजून थिजून

काळी रात्र सरे जेव्हा
येई पुन्हा उजाडून
ऊन्ह रेशमी बिलगे
मन जाई आसावून

कोंब इवले नाजूक
ऊन्ह झेलती मस्तीत
कंच हिरव्या ओठांत
दहिवर चमकत....

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - कोंब