पावसाळे

Submitted by दवबिंदू on 13 June, 2020 - 01:09

पावसाळे

कधी आला नदीला पूर...
वाहून गेले घरदारं.
गेले पाण्याखाली शेतातले उभे पीकं!

कधी खचली जमीन...
गाडले गेले गाव.
झाले अवघे जीवन भुईसपाट!

कधी झाली अतिवृष्टी...
कोसळल्या इमारती.
गेले पाण्याखाली वाहते रस्ते!

कधी पडला दुष्काळ...
तहानभूकेने झाला जीव व्याकूळ.
थांबता थांबेना डोळ्यांतला महापूर!

परवाचीच गोष्ट...
कोरोनाच्या संकटात म्हणती,
पडू नका घराबाहेर.
अन् वादळपावसात उडाले घराचे छप्पर!

पाऊस...घेई परीक्षा कठोर ...
जगण्याच्या धडपडीची.
अनुभवांचा दाखला देत ...
म्हणती मंडळी वडीलधारी...
तुझ्याहून मी पाहिले...पावसाळे अधिक!

- दवबिंदू

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults