निसर्ग
गारवा
गारवा पसरला थोडा
जागीच गोठला ओढा
बेफ़ाम धावतो आहे
पांढरा धुक्याचा घोडा...
घागरी घेऊनी काही
बायका निघाल्या कोठे
चरण्यास उधळल्या गायी
जाहले रिकामे गोठे...
कानास उपरणे टोपी
घोंगडी लोंबते खाली
शेतात चालला आहे
शेतांचा दणकट वाली...
शेगड्या बंब दाराशी
ओठांवर घुमली गाणी
पेटल्या चुलीवर कोणी
ठेवले चहाचे पाणी..
गजरात मंद चिपळ्यांच्या
वासुदेव देतो हाळी
ओट्यावर म्हातारीची
तालात वाजते टाळी...
झाडात पोखरणारा तांबट
सध्या तांबट रोज दर्शन देत आहे. माझ्या घरातून लांबवर दिसणाऱ्या एका वाळालेल्या झाडात कोरून घर तयार करत आहे. गेले ४,५ दिवस त्याचा हा उद्योग चालू आहे. त्याचा फोटो काढणं जरा कठिणच गेलं कारण तो खुपच लांब होता, तो कॅमेरात बसवणं, हात स्थीर ठेवणं अवघड गेलं.
तांबट
सध्या तांबट रोज दर्शन देत आहे. माझ्या घरातून लांबवर दिसणाऱ्या एका वाळालेल्या झाडात कोरून घर तयार करत आहे. गेले ४,५ दिवस त्याचा हा उद्योग चालू आहे. त्याचा फोटो काढणं जरा कठिणच गेलं कारण तो खुपच लांब होता, तो कॅमेरात बसवणं, हात स्थीर ठेवणं अवघड गेलं.
साल्हेरगड परिसर गृहउपयोगीवस्तू आणि कपडे वाटप मोहीम (दिवाळी विशेष २०१४)
खरे तर कोणत्याही कार्याला केवळ प्रयत्नाची गरज असते …
तसाच एक साधा प्रयत्न या बागलाण ,नाशिक प्रांतात शालेय साहित्यांचे वाटप दि .१९-२० जुलै २०१४ वाटप या दरम्यान केला होता …(http://www.maayboli.com/node/50067)
या कार्यातून काही मिळेल याचा कधीच विचार नाही केला .…
आपल्या कडे खूप काही आहे आपण फक्त खूप काही मधील काही अंश वाटप करतोय इतकाच …
त्या कार्यक्रमा मधून बागलाण मध्ये नवीन क्रांतीच घडली असेच म्हणावे लागेल …
प्रत्येकाच्या मनात आपण आपल्या परिसरातील ऐतिहासिक वास्तूंची काळजी घेवू शकतो । हीच नवी भावना तयार झाली . एक एक माणूस मिळत गेला, तेथे दडलेल्या प्राचीन ठेवा स्वतःहून समोर येत
वादळवारा - एक अनोखा अनुभव
आम्ही कर्नाटकात भटकायला गेलो असताना थोडा अति शहाणपणा करून खोलीच्या बाहेर झोपलो. तेव्हां आलेला भन्नाट अनुभव.
हे सर्व अनुभव मायबोलीकर होण्याआधी लिहिले असल्यामुळे त्या सॉफ्ट्वेअरमधून इथे कॉपी पेस्ट होवू शकत नाहीत. क्षमस्व.
हकीकतीची लिंक खाली देत आहे.
http://www.mediafire.com/view/878cjnvw628g15u/vadalvara.pdf
आमच्या घरी आलेले अनाहूत पाहुणे
मेणबत्तीचे झाड
मेणबत्तीचे झाड
ऋतू पावसाळा.सप्टेंबरचे अखेरचे दिवस.आजूबाजूला हिरवळ आणि फुलांची रेलचेल.रस्ता आम्हा दोघांचा नेहमीचाच २६ वर्ष जाण्यायेण्याचा.पण त्यादिवशी एक नवल घडलं.अनपेक्षितपणे अपूर्व,अभूतपूर्व असे काहीतरी दृष्टीसमोरून ओझरते गेले.लगेचच गाडी थांबवून तिथपर्यंत गेलो.
रस्त्याच्या कडेला ते नवल आमची वाट बघत होते.अहाहा! अतिशय आकर्षक,चमकदार पिवळ्या रंगाचे अलौकिक पुष्पगुच्छ विराजमान झालेले ते झाड मी प्रथमच पहात होते.निसर्गाला अगदी मनापासून दाद द्यावीशी वाटली.निव्वळ अप्रतिम!भान हरपून त्या फुलांकडे मी पहातच राहिले.मन एकदम प्रसन्न, शांत व समाधानी झाले.
घरबसल्या उत्तरायण - दक्षिणायन
या घरात रहायला आल्यापासून सकाळी उठून लिविंग रुममध्ये आलं की समोरच सुर्योदय दिसतो मला. रोजचे नवे विभ्रम! कधी कधी खूप मनोरम देखावा असेल तर फोटोही काढले जातात. आताशा म्हणजे गेल्या वर्षीपासून व्हॉट्सअॅम्प ग्रुपवर 'गुड मॉर्निंग'च्या मेसेज बरोबर रोज सुर्याचाही फोटो टाकण्याची सवयच झाली आहे. ग्रुपवरची मंडळीही वाट बघत असतातच.
माझ्या या घरात हिवाळ्यात सूर्य नेमका समोरच उगवतो. अर्थात मुंबईचा हिवाळा तो! उन्हं चांगलीच तापतात कधी कधी. उन्हाळ्यात मात्र सूर्य एक वळण घेतो आणि उन्हाळ्याची सकाळ बर्यापैकी सुसह्य करतो.
करायला गेलो...
आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतलेही कसावा हे एक महत्वाचे पिक आहे. पूर्व आफिकेत तो प्रकार एक स्नॅक म्हणून खातात तर पश्चिम आफ्रिकेत ते मुख्य अन्न आहे.
या पिकाची शेती अगदी सोपी, फारसे काही करावे लागत नाही. उत्पन्नही भरपूर. पण या मूळांवर काही प्रक्रिया केल्याशिवाय ती खाता येत नाहीत. त्यात, खास करून सालीत काही विषारी घटक असतात.
आपल्याकडे याचे प्रचलित रुप म्हणजे साबुदाणा. साबुदाणा खिचडी म्हणजे आपला अगदी जिव्हाळ्याचा विषय !
माझ्या भारतातून आणायच्या सामानात साबुदाणा ( जास्त नाही, दोन वेळा खिचडी होईल इतकाच ) असतो. तशी ती
दोनवेळा करूनही झाली.