याच्या दोन जाती आहेत रंगावरुन. एक आहे वर दिसतेय ती हिरवी. तिला पांढरी जात म्हणतात आणि दुसरी असते लाल. कारण याच्या बोंडांवर लाल झाक असते. हिइ जात खास करुन नगर जिल्ह्यात मी बघितली.
एवढा एरंडासारखा वाढलास तरी काडिची अक्कल नाही असे एकेकाळी आया न ऐकणार्या मुलाना सुनावत असत. का बुवा, एरंडच का ? तर तो सदोदित समोर दिसतो म्हणुन. आणि जवळपास माणसाच्या उंचीएवढा वाढतो म्हणुनही. पण तो बिनकामाचा नक्कीच नाही.