एरंड
Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago
2
एवढा एरंडासारखा वाढलास तरी काडिची अक्कल नाही असे एकेकाळी आया न ऐकणार्या मुलाना सुनावत असत. का बुवा, एरंडच का ? तर तो सदोदित समोर दिसतो म्हणुन. आणि जवळपास माणसाच्या उंचीएवढा वाढतो म्हणुनही. पण तो बिनकामाचा नक्कीच नाही.
आता लगेच काहि जणांचा चेहरा एरंडेल प्यायल्यासारखा झाला असणार.
खरे तर एरन्ड कुठेही वाढतो. अगदी शहरातही जागोजाग दिसतो. एरंडेल तेलालाच कॅस्टल ऑईल म्हणतात. आणि याचे शास्त्रीय नाव आहे रिसिनस कम्युनिस.
अपूर्ण
विषय:
प्रकार:
शेअर करा
एकेकाळी?
अहो दिनेश, एकेकाळी म्हणून भुतकाळात कशाला जाताय? मी आजही माझ्या मुलीला कधी कधी रागाच्या भरात "मी नारळ समजुन एरंड लावला आहे की काय?" असे म्हणते, आणि तिही, नारळच आहे, पाहशिलच तू, असेही मला सुनावते.
माझ्या आधिच्या नोकरीत मी एका फ्याकटरीत कामाला होते, तिथे माझा एक गुजराती सहकारी तिथल्याच एका मुलीवर आशिक झाला होता. मी जेव्हा त्या मुलीला पाहिले तेव्हा असल्या साधारण रुपाच्या मुलीवर आशिक का झाला म्हणुन त्याला विचारले. तर तो म्हणाला, क्या करे, उज्जड गाममा एरंडो प्रधान.
हल्ली चर्चेत असलेला जट्रोपा म्हणजेच एरंड काय?
साधना
जित्रोबा
साधना, मजा वाचली वाचुन. जित्रोबा वेगळा. जमले तर त्याबद्दलही लिहीन.