कॅलिफोर्नियात सध्या प्रचंड (ऐतिहासिक, न भूतो…, लय बेक्कार वगैरे वगैरे) दुष्काळ पडला आहे आणि त्याने सर्वांचेच धाबे दणाणले आहेत हे प्रसारमाध्यमांतून आतापर्यंत आपल्याला समजले असेल; २०१२ साली सुरु झालेल्या दुष्काळाचे हे सलग चौथे वर्ष आहे. अमेरिकेची सुमारे १२% लोकसंख्या इथे राहते आणि एकून उत्पन्नापैकी २०% उत्पन्न इथून येते (सुमारे २ ट्रीलियन डॉलर). (अवांतर: कॅलिफोर्नियाची अर्थव्यवस्था इतकी मोठी आहे कि जर तिचा स्वतंत्रपणे विचार केला तर ती जगात ७व्या क्रमांकावर येते.) त्यामुळे इथल्या घडामोडी देशाच्याच दृष्टीने एक चिंतेचा विषय असतो. असो.
मागचा रवीवार निसर्गाच्या सान्निध्यात अगदी सार्थकी लागला. आणि वाटायला लागलं की शहरी दिनक्रमात आपण जीवनातल्या अगदी सहज साध्या छोट्या छोट्या आनंदाला मुकतो.
नगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यात कान्होबाची वाडी व सातवड या दोन्ही खेड्यात असलेल्या पॉलीहाऊसला भेट देण्याचा योग आला.
ही गावं नगरपासून पाऊण तासाच्या अंतरावर आहेत.
निसर्गाचा लहरीपणा किंवा अनियमितता कधीकधी पिकांसाठी फारच मारक किंवा हानिकारक ठरते. पण पॉलीहाऊसच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे शेतकरी अश्या प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींशी सक्षमपणे लढा देऊ लागलाय.
आपली काळजी,...
तापमापीतील पाराही
आता वर-वर चढतो आहे
कारण ऊन्हाचा कहर
दिवसें-दिवस वाढतो आहे
या ऊन्हाच्या धग-धगीत
जबाबदारी ओतली पाहिजे
आपली काळजी आपणच
काळजीपुर्वक घेतली पाहिजे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
(निसर्गाची नैसर्गिक गुढी/तोरणे)
सर्व निसर्गप्रेमींना सप्रेम
नमस्कार,
गोनीदां, डॉ. शरदिनी डहाणूकर, दुर्गाबाई यांजसारखे जे निसर्गप्रेमी आहेत ते सतत आठवणीत असतातच पण त्यांचा विशेष आठव होतो ऋतूबदल होतो तेव्हा - काय सुरेखरित्या या नैसर्गिक गोष्टीला ते शब्दबद्ध करु शकतात !!
पुण्यातल्या कच-याच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. गेले काही महीने कचरा उचलला जात नसल्याने ठिकठिकाणी साठलेले कच-याचे ओंगळवाणे ढीग पाहून आपण एका सांस्कृतिक राजधानीच्या शहरात राहतो हे खरे आहे का असे वाटू लागलेले आहे. ठिकठिकाणी रस्ते कच-याच्या ढिगाने अडले आहेत. पाश्चात्य देशातले नागरीक आश्चर्याने कचरा व्यवस्थापनाकडे पाहतात. काही ठिकाणी कच-याला रात्री आग लावून दिली जाते. नागरी वस्तीत कचरा जाळायला मनाई आहे, कारण त्यामुळे घातक वायूंची निर्मिती होते. पण असा साठवून ठेवण्याने आरोग्याला धोका होतोच आहे.
Technically तेच आकाश आहे ना? तो चंद्रही तोच आहे..सूर्य, तारे सगळंच. वारा तोच, पाणी तेच. एक धरती सोडली तर सारी पंचमहाभूतं तीच आहेत. अर्थात technically माती देखील तीच. पण मग हे असं का होतंय? एखादया मुलाच्या पुढे चॉकलेट असावं आणि घ्यायला हात पुढे केला तर एकदम ते नाहीसं होऊन त्या जागी भलतीच वस्तू निघावी असं..
एक मुंगी होती.
काळी कुळकुळीत आणि इवलीशी.
त्या इवल्याशा मुंगीने एक नियम ठरवला होता.
रोज साखरेचे तीन कण कुठून तरी आणून एका झाडाच्या ढोलीत जमा करायचे !
एका हत्तीला ही गोष्ट समजली.
तो हसून मुंगीला म्हणाला-
" मुंगीताई, अस आयत आणण्यात काय ग पराक्रम ?
आम्ही कस .. सगळ्या जंगलात हिंडून, सगळ्यांची दाणादाण उडवून, खरे जीवन जगतो.
तुझ्यासारखं आम्ही आयत खात बसलो तर, देव काय म्हणेल आम्हाला ? "
प्रचंड हत्तीच्या तोंडून लाह्यासारखे फुटणारे एक एक शब्द ऐकून,
बिचाऱ्या मुंगीला अतिशय वाईट वाटले !
आपले आकारमान- आपला पराक्रम- आपली गती-
मे महिन्यात सहकुटूंब केरळस्थित मुन्नारला भेट देण्याची इच्छा आहे. मुन्नार बद्दल माहीती असलेल्यांनी माहिती द्यावी.
१) उन्हाळ्यात सोयीचे ठरेल काय? एकंदर १० ते १२ व्यक्ती जाणार आहेत.
मुन्नारच्या आजुबाजुची स्थ्ळे काय बघता येतील., साधारण किती दिवस लागलतील.
अकोला अगर नागपूर वरुन कसे जावे.
याशिवाय इतरही पर्यटन बद्दल लिहण्यास हरकत नाही.