गुरू ठाकुर हे नावं पहिंल्यादा चर्चेत आलं ते "मन उधाण वार्याचे, धुंद पावसाचे" ह्या गाण्याच्या रिलिजनंतर. तुफान गाजलं होतं हे गाणं आणि ह्याच्याच जोडीला "मल्हारवारी" हे सुद्धा. हे गाणं जेव्हा रिलिज झालं तेव्हा मी शाळेत होतो. आठवी नववीत असेल. फुलपाखरासारखं फुलायचं वय होतं ते. अशा वयात मन खरचं उधाण वार्यासारखंच असतं आणि नेमके शब्द अगदी काळजात उतरायचे. जुलैच्या पाऊसात छत्रीबरोबर चाळे करत मी मजेत ते गाणं गात जायचो. त्यावेळी मोबाईलचा फारसा सुळसुळाट नव्हता. वाॅकमेन तर शाळेत अलाऊडच नव्हता. तसाही आमच्याकडे नव्हताच म्हणा, इतकंच कशाला टी.व्ही असून नसल्यासारखाच. बहिणीची दहावी म्हणून केबल काढलेली.
रोज पडणारी स्वप्ने आता पडत नाही..
व्हायच्या आधी गाठी भेटी खुप..
हल्ली त्या घडत नाही..
कित्येक वचने आणि कित्येक तुझे बोलणे.
आता सहसा आठवत नाही..
यावसं वाटतं पुन्हा फिरून तुझ्यात..
पण मन माझं पाठवतं नाही..
मृगजळ का भास असावं तुझ प्रेम..
अजुनही मला माहीत नाही...
आधीही करत होतो प्रेम तुझ्यावर
हल्ली मात्र झेपत नाही..
भावना माझ्या रद्दीत जमा झाल्यात..
रद्दीला त्या किंमत नाही...
विकावीशी वाटते ती कधीतरी
पण माझ्यात तितकी हिंमत नाही..
गेलाबाजार प्रेम कवडीमोल झालंय..
हल्ली कुणी साठवत नाही..
भाग 1 - https://www.maayboli.com/node/64901
12 जानेवारी 2010.
सचिन आपल्या सायबर कॅफेत त्याच्या एका कस्टमरला पीडीएफ बनवण्यासाठी हेल्प करत होता.इतक्यातच एक व्हाईट टी शर्ट, ब्लू हाफ पँट, एका हातात लेदर बॅग व दुसर्या हातात महागडा मोबाईल असलेली मुलगी आत आली.
"एक्सुमी मी??? व्हू ईज द इंचार्ज हिअर?? - ती.
" येस?" सचिनने अपेक्षापेक्षा जरा जास्तच उशिराने रिप्लाय दिला.
"ओह... आय नीड पीसी फाॅर अन हाअर...कॅन पाॅसिबल धिस टाईम..ईटस सो अर्जंट. " हातातली बॅग समोरच्या टेबलावर ठेवत ती म्हणाली.
"ते तिघे"
"तीन तिगडा काम बिघाडा" अशी म्हण जरी मराठी भाषेत प्रचलित असली तरीही त्या तिघांचं थोडं वेगळं होतं.
तीन मित्र..तीन बाजु..तीन आयुष्य...
तिघांची मैत्री.. तिघांचाच त्रिकोण...
तीन गोष्टी..तीन नाती..
तिघांच असणं ...तिघांच जगणं..
असं म्हणतात की, ही दुनिया गोल आहे पण त्या तिघांच्यालेखी दुनिया ही त्रिकोणी होती.त्यांनी ईतर लोकांच्या भुरसटलेल्या चष्मातून जग कधी पाहीलच नाही त्यांनी जग नेहमी काटकोनाच्या कोपर्यातून पाहीलं आणि म्हणूनच ते तिघे वेगळे होते.
त्यांचीच ही त्रिकोणी कथा.
ते तिघे म्हणजे विश्वास, सचिन आणि जयेश.
भांडायचं नाही, बोलायचं नाही..
कसा जगतोय मी हे तुला कळायचं नाही..
सांगायच नाही, दाखवायचंही नाही
एकतर्फी प्रेम करून बघ
तुला ते सोसायचं नाही....
ओथंबलेल्या भावनेने रडायचं नाही..
सुकलेल्या वेदनांना कुरवाळायचं नाही..
तुटलेल्या स्वप्नांची अवशेष जपायची.
न दिलेल्या प्रेमाची कळी हळूच सांभाळयची..
कळीचं त्या फुल कधी होणार नाही..
प्रयत्न इतकाच करेल की, ती कधी कोमजणार नाही..
प्रिय ..............
माहीतेय मला तुझ्या आयुष्याच्या डायरीतून माझं पान तु कधीच फाडून टाकलं आहेस आणि परत तुला ते कपटे जमा करून चिकटावावं असं वाटणारही नाही आणि कदाचित मलाही जोडून जोडून चिकटावासं वाटणारं नाही.....
गेलेले दिवस परत येत नाही आणि आलेल्या दिवसांत मला आठवणी सोडता आल्या नाहीत.
लेट ईट बी,मुव्ह ऑन स्वतःशीच बोलत खुप पुढे आलोय मी पण मनातल्या त्या छोट्याशा कोपर्यात अजुनही तु आहेस मेय बी तुझी ती जागा घेणारं कुणी भेटलचं नाही मला आणि परत असं कुणी भेटेलं असं वाटतं नाही आता...
तुम्हारी सुलु मै कर सकती है!
सुपरमॅनच्या पोझमधली, साडी घातलेली, सुपरवुमन भासणारी विद्या आणि अगदी खालीच असलेला न्यु ब्रॅण्ड रिबिन लावलेला चकाकता प्रेशर कुकर... सिनेमाचं पोश्टरच सिनेमाविषयी एक वेगळपणं सांगून जातं...ह्या सिनेमाची रिसेपी थोडी वेगळी आहे नेहमीच्याच पठडीतला मसाला न वापरता किंवा कुठल्याही आडवळणाची फोडणी न घातलेला असा हा सिनेमा कुकुरमध्ये शिजवलेल्या साध्या खिचडीसारखाच रूचकर आहे..
दिवाना..
तुझे चित्र साकारताना रंग संपले माझे..
नव्हतीच कधी तु स्वप्न तुटले माझे..
कनव्हास तुझ्या असण्याचा कोराचा राहीलाय..
कशी असशील तु? कशी दिसशील तु?
हा प्रश्न माझा नेहमीचा अपुराच उरलाय..
"भगवान घर पे देर है मगर अंधेर नही"
हा डायलाॅग आता खोटा वाटायला लागलाय..
माझ्या फॅशन आणि स्टाईलचा तोटा व्हायला लागलाय..
व्हाॅटसअप स्टेट्स माझ लोनली झालय...
डीपीमध्ये सुद्धा मी सिंगल ओन्लीच उरलोय..
"नटसम्राट" ह्या चित्रपटानंतर पहिल्यांदाच ज्यावर काही लिहावं असा वाटणारा हा माझा दुसरा सिनेमा...
काही चित्रपट खरंच खुप भारावून टाकणारे असतात म्हणजे पाहून झाल्यानंतर आपल्या तोंडातून वाॅव, मस्त असे शब्दही निघत नाही किंवा टाळ्याही वाजवल्या जात नाहीत कारण अशा चित्रपटांची स्तुती कुठल्याच शब्दांनी किंवा टाळ्यांनी आपण करू शकत नाही ते इतके अप्रतिम असतात की,"अप्रतिम" हा शब्दही कमी पडतो कौतुक करायला..
"सिक्रेट सुपरस्टार" हा अशाच अजरामर ठरवला जाऊ शकणार्या पठडीतला सिनेमा आहे..सिनेमातल्या एका गाण्यात सिनेमातल्या नायिकेचं अंतरंग दाखवण्यात आलं आहे आणि हे सांगायला
सर्रर्सर..र्सररऽऽऽऽ कुणीतरी मला दुर घनदाट जंगलात फरफरट नेतय...माझ्या विवस्त्र शरीरावर कसलातरी लाल रंग फासलाय..मी ओरडतोय.. किंचाळतोय पण तो जो कुणी आहे त्याला मात्र ह्या सार्याच काहीच वाटत नसावं उलट ते माझ्या प्रत्येक किंचाळीबरोबर जोरजोरात विशिप्तपणे हसत होत आणि त्याच हेच हसण भयान शांततेला चिरत सार्या जंगलात कंप निर्माण करत होतं...एकाकी ते भलंमोठ धूड एका विशिष्ट जागी थांबलं माझ्या कपाळावर कसलीतरी भुट्टी लावत काहीतरी पुटपुटत होतं.."इदरासा कालदिंद्रये ममधुपट बली अर्पण मुक्तचलोपन चामुंडेही ...चांमुडेही...चांमुडेहीऽऽऽऽऽ" त्याचे ते शब्द मला एखाद्या लावारसारखे तप्त भासत होते..