Submitted by अजय चव्हाण on 12 December, 2017 - 01:24
भांडायचं नाही, बोलायचं नाही..
कसा जगतोय मी हे तुला कळायचं नाही..
सांगायच नाही, दाखवायचंही नाही
एकतर्फी प्रेम करून बघ
तुला ते सोसायचं नाही....
ओथंबलेल्या भावनेने रडायचं नाही..
सुकलेल्या वेदनांना कुरवाळायचं नाही..
तुटलेल्या स्वप्नांची अवशेष जपायची.
न दिलेल्या प्रेमाची कळी हळूच सांभाळयची..
कळीचं त्या फुल कधी होणार नाही..
प्रयत्न इतकाच करेल की, ती कधी कोमजणार नाही..
अळवाच्या थेंबाची सर गरजणार्या झर्यात नसते...
अंतरंगातल्या एकाकी प्रेमात कधी हार नसते..
बोचर्या तिरस्काराच्या वार्याने हा देह झडणार नाही..
माहीत आहे मलाही तुझं प्रेम मजवर जडणार नाही..
तरीही प्रेमाचे ऋतु यायचे काही थांबणार नाही..
तु नसलीस म्हणून काय झालं..
तुझ्यावर प्रेम करणं मी कधी सोडणार नाही...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त आवडली
मस्त आवडली
व्वा सुंदर!
व्वा सुंदर!
सुंदर...
सुंदर...
छान !
छान !
धन्यवाद पंडीतजी,अक्षय दुधाळ
धन्यवाद पंडीतजी,अक्षय दुधाळ,सायुरी आणि दत्तात्रय साळुंके
Ohh... Very nice
Ohh... Very nice