हे नवल नव्हे,...
सरळ सरळ चालणारे
सरळ सरळ ठकू शकतात
कधी धनुष्याच्या बाणाचेही
इथे नेम चुकू शकतात
विश्वासाचे विश्वासही केवळ
इथे फक्त भासुन जातात
अन् कमलपुष्पातही म्हणे
घड्याळी काटे दिसुन येतात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783
काका,...
काका तुम्ही सोडून गेलात
याला मन संमत नाही
अन् श्रध्दांजली देण्याची
आमच्यामध्ये हिंमत नाही
गहिवरलं काळीज जरी
धरणी स्थिर राहिली नाही
आभाळाची भकास काया
अशी कधीच पाहिली नाही
कानात गुंजतो अजुनही
काका तुमचा आवाज
कसा विश्वास ठेवावा की
तुम्ही नाहित इथे आज
तुमच्या विचारानं विचार
समाजाचे बदलत आहेत
तुमचे उपदेशात्मक बोल
कानावरती आदळत आहेत
तुमचं हूबेहूब चित्रही
डोळ्यांपूढं साकारतं आहे
काका तुमच्या जाण्याला
मन आज नाकारतं आहे
घेरलेलं बजेट,...
बजेट जाहिर करताना
भावना म्हणे दूजी आहे
महा-बजेट वरती सुध्दा
कुठे महा-नाराजी आहे
बजेट आणि नाराजीचं
असं हे सुत्र ठरलेलं असतं
प्रत्येक-प्रत्येक बजेटला
नाराजीनं घेरलेलं असतं
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783
१९ मार्च २०१५ दै. प्रजापत्र
सरकारचा विरोध,...!
कुणी अडलेले आहेत
कुणी नडलेले आहेत
भु-संपादन विधेयकावर
कुणी इथे चिडलेले आहेत
जन कल्याणाचीच भुमिका
राज्यकर्त्यांनीही घ्यायला हवी
सरकारचा विरोध होण्याची
वेळच कशाला यायला हवी,..?
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
१८/०३/२०१५ दै.प्रजापत्र
कधी मनं खवळले जातात
कधी मनं कळवळू शकतात
कधी विरोध उफाळले जातात
कधी विरोध मावळू शकतात
परिस्थितीचा आढावा घेत
कधी शाब्दिक उधाण असावेत
तर बदलत्या परिस्थितीनुसार
कधी वाणीवर लगाम असावेत
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
१६/०३/२०१५ दै. प्रजापत्र