तुम्हारी सुलु मै कर सकती है!
सुपरमॅनच्या पोझमधली, साडी घातलेली, सुपरवुमन भासणारी विद्या आणि अगदी खालीच असलेला न्यु ब्रॅण्ड रिबिन लावलेला चकाकता प्रेशर कुकर... सिनेमाचं पोश्टरच सिनेमाविषयी एक वेगळपणं सांगून जातं...ह्या सिनेमाची रिसेपी थोडी वेगळी आहे नेहमीच्याच पठडीतला मसाला न वापरता किंवा कुठल्याही आडवळणाची फोडणी न घातलेला असा हा सिनेमा कुकुरमध्ये शिजवलेल्या साध्या खिचडीसारखाच रूचकर आहे..
"मैं कर सकती है !" सिनेमाच्या कॅचलाईनतच एक प्रकारचा पोझीटीव्ह अप्रोच आहे आणि हा पोझिटीव्ह अप्रोच पुर्ण सिनेमाभर थोडाफार टिकवून ठेवण्यात दिग्ददर्शक सुरेश त्रिवेणी यशस्वी झालेत हयात नो डाऊट...सिनेमा नायिकाप्रधान आहे हे ट्रेलर पाहून कळतंच पण त्याहीपेक्षा तो स्त्रीसुलभ भावप्रधान आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये..
कधी कधी आपल्याला जिंकायचं असतं, आपल्याला काहीतरी करायचं असतं, नेहमीचंच चाकोरीबध्द जगण्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचं धाडसं असतं अंगात पण नेमकं काय करावं हेच कळत नाही म्हणून आपण दिसेल, सापडेल त्यात उडी मारून "ते वेगळं" शोधायचं प्रयत्न करतो...अशाच काहीशा संभ्रमात असलेली सुलोचना अशोक दुबे ऊर्फ सुलु (विद्या बालन) ही आपला नवरा अशोक,11 वर्षाचा मुलगा प्रणव,नेहमी टोमणे मारणार्या मोठ्या बहीणी आणि त्या कशा बरोबर आहेत हे सांगणारे तिचे बाबा ह्या सार्यात ती स्वःतला शोधतेय.. एक पत्नी, एक आई, एक गृहणी म्हणून ती उत्तम आहेच पण फक्त गृहणी म्हणून आयुष्य किचनमध्ये, कपड्याभांड्यामध्ये न घालवता काही तरी केलं पाहीजे असं तिला नेहमी वाटतं असतं आणि जिंकण्याची हौस कुणाला नसते..प्रत्येकालाच जिंकायचं अगदी छोटया छोट्या गोष्टीतही स्वतःला जिंकलेलं पाहणं आवडत तिला मग मुलाच्या शाळेत असलेली चमाचा लिंबूची स्पर्धा असो की,रेडीओवर झालेली काॅन्टेस्ट ह्या सार्यात ती जिंकतच असते..सुलु ही फुल ऑफ लाईफ जगणारी व्यक्ती आहे..ती स्वतःची फेवरेट आहेच शिवाय तिला श्रीदेवी,हेमामालिनी, बालसुब्रहमण्यमची मिमिक्री चांगली करता येते असं तिला वाटणारी, नेहमी कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमात सहभाग घेणारी आणि त्यात जिंकण्याची हौस असणारी , स्वप्ने बघणारी अशी सुलु आपल्याला आपलंसं करते..
रेडीओची काॅन्टस्ट जिंकल्यानंतर बक्षिस घ्यायला गेलेल्या सुलुला एक "आप आर.जे बन सकते हो" अशी जाहीरात दिसते आणि त्यासाठी ती स्वतःला क्वालिफाय करायला कशी धडपडते आणि आर जे बनल्यानंतर ती भुमिका निभवता निभवता तिच्यातली बायको,आई,गृहणीची भुमिका निभावणं तिला जमतं का? आणि त्यात तिला कुठले संघर्ष येतात त्यावर ती कशी मात करते हे सर्व सिनेमात पाहीलेलच बरं..
ह्या सिनेमाची कथा ही प्रत्येक त्या स्रीची कथा आहे जी घर आणि काम दोन्ही सांभाळत तारेवरची कसरत करत घरादाराचा तोल सांभाळते मग त्यातली घुसमट, कधी वाटलेला आनंद, काळजी,कुतुहूल,भीती, विरोध, चिकाटी, जिद्द, आत्मविश्वास ह्या सार्यात गुंतलेल्या स्रीसुलभ भावभावना म्हणजेच हा सिनेमा..
फस्ट हाफ मस्त हलकाफुलका झालाय कित्येकवेळा खळाखळाळून हसतो आपण पण मध्यतरानंतर सिनेमा थोडासा रेंगाळला जरी असला तरी वास्तववादी दाखवल्याने जमून जातं.
अभिनयाच्या बाबतीत विद्या बालनने कमाल केलीय अगदी सहजरितीने स्वतःच्या खांद्यावर पेललाय तिने हा सिनेमा ..ह्या सिनेमातला तिचा गोड चेहरा आणि हावभाव अगदी "कभी आना तु मेरी गल्ली" गाण्यामधल्या नवख्या विद्याची आठवण करून देतात तरीही कुठेतरी आपल्या नकळत आपण सुलुची तुलना इंग्लिश विंग्लिशमधल्या श्रीदेवीने साकारलेल्या "शशी"शी करू लागतो आणि त्यात विद्या थोडीशी डावी वाटते इतकंच..
बाकी मानव कौलने साकारलेला नवरा, कर्मचारी मस्तच.. स्पेशली त्याने केलेला "बन जा तु मेरी रानी" मधला डान्स नॅचरल वाटतो...
नेहा धुपियाला बर्याच वेळाने चांगला रोल मिळालाय म्हणून की काय अंगप्रदर्शन आणि रोडीसची फालतुगिरीची नाटके सोडून तिनेही "मारीया" साकारायला थोडीफार मेहनत घेतलेली दिसतेय...
विजय मोर्याने साकारलेला कवि कम स्क्रिपरायटर "पंकज"धमाल उडवून देतो...
आर.जे. मलिश्काला आर.जे अलबेलीच्या रोलमध्ये परद्यावर पाहणं तितकसं झेपत नाही..
चित्रपटातलं संगीत छान आहे "बन जा तु मेरी रानी हे गाणं अप्रतिम तर आहेच शिवाय हवा हवाई हे गाणं फारशी भेसळ न करता साकारलयं हे नशिब फक्त तुकड्या तुकड्यात हे गाणं चित्रित केल्यामुळे थोडासा हिरमोड होतो..
छायांकन बर्यापैकी चांगल आहे आणि दिग्ददर्शनही ठिकठाकच आहे..
पात्रे :
सुलोचना दुबे ऊर्फ सुलु : विद्या बालन
अशोक दुबे : मानव कौल
मारीया : नेहा धुपिया
विजय मौर्या :पंकज
मलिश्का: आर जे अलबेली
पाहुणा कलाकार: आयुष्यमान खुराना.
का पाहावा:
स्वतःवर आत्मविश्वास असल्यावर काय करता येत हे आजमावण्यासाठी व "मै कर सकती हू"किंवा "मैं कर सकता हू "
हे स्वतःला परत एकदा सांगण्यासाठी.
नामांकन: ***1/2
छान लिहिलंय चित्रप परीक्षण !!
छान लिहिलंय चित्रपट परीक्षण !!!
अरे वा... पहिला पाहिजे
अरे वा... पहिला पाहिजे चित्रपट.
छान परीक्षण.. वाटच बघत होतो..
छान परीक्षण.. वाटच बघत होतो.. कोण यावर लिहितेय.. नेहा धुपियासाठी बघायचाय
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
फक्त ते श्रीदेवीसमोर डावी वाटते ह्या वाक्याला जरा अडखळले.
कृपया 'रिव्ह्यू' असं लिहाल
कृपया 'रिव्ह्यू' असं लिहाल का ?
धन्यवाद हर्षल,सिम्बा,ऋन्मेऽऽष
धन्यवाद हर्षल,सिम्बा,ऋन्मेऽऽष..
सस्मित..हो अभिनयच्या बाबतीत
सस्मित..हो अभिनयच्या बाबतीत थोडीशी श्रीदेवी वरचढ आहे विद्याने काम चांगल केलय पण श्रीदेवी हे कॅरेक्टर अजुन छान करू शकली असती. हे जाणवतं सिनेमा पाहताना..
प्रतिसादाबद्दल धन्यवाद..
भरत धन्यवाद सांगितल्याबद्दल
भरत धन्यवाद सांगितल्याबद्दल पुढच्या वेळेपासून"रिव्ह्यू" असं नक्कीच लिहेन....आता बदल करणं शक्य नाही..
>भरत धन्यवाद सांगितल्याबद्दल
>भरत धन्यवाद सांगितल्याबद्दल पुढच्या वेळेपासून"रिव्ह्यू" असं नक्कीच लिहेन....आता बदल करणं शक्य नाही..
तुम्हाला वर "संपादन टॅब" दिसत नाही का? तुम्ही कालच रिव्ह्यू" लिहलाय म्हणजे सहज शीर्षक (किंवा मजकूर) बदलता यायला हवा.
बदललं आहे ..धन्यवाद
बदललं आहे ..धन्यवाद webmaster
मानांकन
मानांकन
सस्मित..हो अभिनयच्या बाबतीत
सस्मित..हो अभिनयच्या बाबतीत थोडीशी श्रीदेवी वरचढ आहे>>> आता हे अजुन काय?
ईंग्लिश विनगलिश बाबत येस ! तो
ईंग्लिश विनगलिश बाबत येस ! तो श्रीलंकेचा बेस्ट परफॉर्मन्स आहे आणि त्यात तिला बीट करणे अवघड आहे. श्रीदेवीचे दुर्दैव की तिला तिच्या स्टारडमला साजेश्या भुमिका मिळाल्या पण अभिनयाला वाव देणारया नाहीत. अन्यथा ती माधुरीपेक्षा अभिनेत्री म्हणून सरसच होती. विद्या बालन सुद्धा खूप चांगली आहे. मात्र ओवरहाईप देखील आहे. सध्याच्या हिरोईनींमध्ये प्रियांका चोप्रा तिला अभिनयात भारी आहे. फक्त प्रियांका सर्व प्रकरच्या चित्रपटात काम करते आणि विद्या बालन शक्यतो नायिकाप्रधान चित्रपटात करते त्यामुळे तिचा अभिनय हायलाईट होतो ईतकेच. असंच आणखी एक उदाहरण म्हणजे आपली कंगणा..
छान लिहिले आहे. विद्याला
छान लिहिले आहे. विद्याला चांगल्या भुमिका मिळाल्या तर ती सोने करते
तो श्रीलंकेचा बेस्ट
परीक्षण आवडलं. (मला श्रीदेवीपेक्षा विद्या बालन सरस वाटते अभिनयात )
तो श्रीलंकेचा बेस्ट परफॉर्मन्स आहे >
चित्रपट अप्रतिम आहे.
चित्रपट अप्रतिम आहे. प्रत्येकाने पाहिलाच पाहिजे असा आहे. मेसेज अप्रतिम आहे, उगिच मोठे सेट्स, हाय फाय गाड्या, उंची कपडेपट वगैरे काहि नाही. साध्या सुध्या गृहिणीची कथा आहे.
छान लिहिले आहे परीक्षण.
छान लिहिले आहे परीक्षण. बघायला हवा हा चित्रपट.
ह्या चित्रपटाचे ट्रेलर मला
ह्या चित्रपटाचे ट्रेलर मला आवडले होते आणि चित्रपट बघायचे ठरवले होते. परीक्षण वाचून बघायचे नक्की झाले आहे
मलाही हटा चित्रपटाने इंग्लीश विंगलिश ची आठवण झाली
रावी, भारत श्रीलंका टेस्ट
रावी, भारत श्रीलंका टेस्ट मॅचचा स्कोअर बघून या धाग्यावर आलो होतो. त्यामुळे गलतीसे मिस्टेक हो गया. येनीवेज, संपादनाची वेळ टळून गेली आहे.
मस्ट सी च्या लिस्ट मधे टाकला
मस्ट सी च्या लिस्ट मधे टाकला होता ट्रेलर बघुन.. छान रिव्हू.
धन्यवाद राहुलका,रावी,दक्षिणा
धन्यवाद राहुलका,रावी,दक्षिणा,सुमुक्ता,केदार123 आणि आदिति..
@ऋन्मेऽऽष तेच मी विचार करत होतो मध्येच श्रीलंका कुठुन आलं ..क्रिकेटमध्ये फारसा इंटरेस्ट नाही त्यामुळे मॅच वैगेरे कधी बघत नाहीच मी....असो.
मी पाहिला आणि खूप अवडलाय
मी पाहिला आणि खूप अवडलाय
वा... पहिला पाहिजे चित्रपट.
वा... पहिला पाहिजे चित्रपट.
काल पाहिला हा पिक्चर....
काल पाहिला हा पिक्चर.... आवडला... वर म्हटल्याप्रमाणे मध्यंतरानंतर थोडा बोर होतो पण इटस ओके. विद्या बालन नेहेमीप्रमाणे परफेक्ट झालीये या रोलसाठी. ती वाटत राहते मध्ययवर्गीयच, तिच्या साड्या, ड्रेसेस, थोडे अस्ताव्यस्त केस सगळे सूट होते एकदम तिच्या रोलसाठी....
मानव कौल... हा पहिलाच पिक्चर पाहिला त्याचा पण विद्या इतकंच त्याचं पण काम मस्त... बरेच शेडस दाखवायची संधी मिळालीये त्याला...
शेवट थोडा वेगळा दाखवला असता तरी चाललं असतं..... ते दोघं टिफिनचा बिजनेस चालू करतात असं वाटलं.... असो पण ऑव्हरऑल मस्त आहे...
मस्त पिक्चर,
मस्त पिक्चर,
>>>>>>
काल पाहिला हा पिक्चर.... आवडला... वर म्हटल्याप्रमाणे मध्यंतरानंतर थोडा बोर होतो पण इटस ओके. विद्या बालन नेहेमीप्रमाणे परफेक्ट झालीये या रोलसाठी. ती वाटत राहते मध्ययवर्गीयच, तिच्या साड्या, ड्रेसेस, थोडे अस्ताव्यस्त केस सगळे सूट होते एकदम तिच्या रोलसाठी....
मानव कौल... हा पहिलाच पिक्चर पाहिला त्याचा पण विद्या इतकंच त्याचं पण काम मस्त... बरेच शेडस दाखवायची संधी मिळालीये त्याला...>>>>>> +100
मानव कौल कडे पाहून मला संजय(??) सूरी ची आठवण येत होती my ब्रदर निखिल वाला,
मला त्यांचे घर पण आवडले, खरे खरे मध्यमवर्गीय घर वाटते.
हॉल मधले मल्टि परपज टेबल, हॉल मधल्या सोफ्याचा पलंग म्हणून वापर सगळे एक्दम खरे खरे वाटते.
नवरा बायको मधले नाते सुद्धा छान दाखवले आहे, पण ते कधीच बसून प्रॉब्लेम काय आहे हे बोलत का नाहीत कोण जाणे,
शेवटी मुलगा कान उघडणी करतो ते मस्त, शाळेत बुलिंग होत असल्याने तो मावश्याकडू आई ला होणाऱ्या बुलिंग शी रिलेट होऊ शकतो असे वाटले.
धन्यवाद.. अनिश्का,सुखी 123
धन्यवाद.. अनिश्का,सुखी 123,अंजली_12, सिम्बा..
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.
काल पाहिला.मस्त पिक्चर आहे
काल पाहिला.मस्त पिक्चर आहे.खूप सुपर ट्रान्स्फॉर्मेशन चा आव न आणता मस्त ट्रान्झिशन दाखवलं आहे.
नेहा धुपिया ने पण रोल संयत आणि सोबर पणे केला आहे.
सुरुवातीला विद्या ला फोन वर कुकर ऐवजी टिव्ही साठी बारगेन करताना ऐकुन नाकं मुरडणार्या नेहा धुपिया आणि आरजे मलिष्का नंतर तिच्यातला स्पार्क कळल्यावर जेन्युइनली मस्त फ्रेंडली वागताना दाखवल्या आहेत.उगीच स्नॉब बनून नाकं मुरडत नाहीत.
कवी चं कॅरेक्टर पण अफलातून आहे.
मुख्य म्हणजे ५+ मुलांबरोबर अजिबात न संकोचता पिक्चर पाहता येतो.एकमेकांच्या किंचित जवळ येणे सोडून बाकी काहीही मुलांसमोर बघू नयेत असे सीन नाहीत.जितकं आहे त्याच्यापेक्षा अनेक पटीने जास्त वाइल्डस्टोन च्या जाहीरातीतून आणि आयटम साँग मधून मुलांना दिसतं.
चित्रपट अजुन पाहिला नाहीये.
चित्रपट अजुन पाहिला नाहीये. पण मी अनु शी वाइल्डस्टोन च्या जाहीराती बद्दल सहमत.
आणि सनीतैची एक आणि इतरही कंडोमच्या जाहिराती.
तिचा नवरा दाखवलाय तो सातच्या
तिचा नवरा दाखवलाय तो सातच्या आत घरात या चित्रपटात होता. आत्ता एका मराठी न्यूजचॅनेलवर टीमची मुलाखत चालू होती, त्यात विद्या स्वत: सांगत होती. मराठी ब-यापैकी चांगलं बोलते.
Pages