ते तिघे - प्यार,इश्क और मोहब्बत भाग -1

Submitted by अजय चव्हाण on 5 January, 2018 - 14:53

"ते तिघे"

"तीन तिगडा काम बिघाडा" अशी म्हण जरी मराठी भाषेत प्रचलित असली तरीही त्या तिघांचं थोडं वेगळं होतं.

तीन मित्र..तीन बाजु..तीन आयुष्य...
तिघांची मैत्री.. तिघांचाच त्रिकोण...
तीन गोष्टी..तीन नाती..
तिघांच असणं ...तिघांच जगणं..

असं म्हणतात की, ही दुनिया गोल आहे पण त्या तिघांच्यालेखी दुनिया ही त्रिकोणी होती.त्यांनी ईतर लोकांच्या भुरसटलेल्या चष्मातून जग कधी पाहीलच नाही त्यांनी जग नेहमी काटकोनाच्या कोपर्यातून पाहीलं आणि म्हणूनच ते तिघे वेगळे होते.

त्यांचीच ही त्रिकोणी कथा.

ते तिघे म्हणजे विश्वास, सचिन आणि जयेश.

तर ही कथा इथून सुरू होते...

बारा वाजायला अजून पाचच मिनिटे बाकी होती..
ते तिघेही मस्त तलावाच्या किनार्यावर आकाशातल्या तार्‍यांकडे एकटक बघत होते.चांदण्यानी भरेलेलं लख्ख चमचमतं आभाळ...संथ तलावाच्या पाण्यावर पडलेलं हलकसं चमचमत्या आभाळच प्रतिबिंब आणि त्यात सरसर पाण्यावर तरंगणारे हिरवेकंच काजवे...हलकीशी गुलाबी थंडीतली गार हवा ह्या सार्यामुळे वातावरण जणू मंत्रमुग्ध झालं होतं..इतकयात बारा वाजले..फटाकांच्या आताषबाजीने आभाळ जणू रंगून गेलं होतं...तो आवाज ते रंगलेलं आभाळ नव्या वर्षाच स्वागत उत्साहाने करत होतं....

"हॅप्पी न्यू ईयर..." एकमेकांना विश करत त्यांनी एकमेकांना हग केलं.बियरच्या बाॅटल्स फोडल्या गेल्या त्याचा तो फेसाळता सेलिब्रेट आवाज कानांना गोड वाटत होता.

चिअर्सऽऽऽऽ बाॅटल उंचावत चिअर्स करत त्यांनी तोंडाला लावल्या.

अर्ध्यापेक्षा जास्त बाॅटल एका सिपमधे संपली तशी प्रत्येकाने
बाॅटल बाजुच्या कठड्यावर ठेवली.

अंगठ्याने ओठ पुसत नेहमीप्रमाणेच जयेश मध्ये पचकला.

" आयला, आपली जिंदगी भी साली बिनाचाकण्याच्या बिअरसारखीच झालीय कडवट आणि पचपचीत.."

"हो ना यार काय ठरवलं होतं आपण आणि काय करून बसलोय,साला लव्ह नावाच्या गेममध्ये गेमओव्हर झाला रे आपला??" सचिन थोड सेंटी होतं जयेशला जाॅईन झाला..

"मोहब्बतही बदनाम करती है...
मोहब्बतही गुलाम करती है..
इतिहास के पन्नो पन्नो पे देख लो..
मोहब्बतही गम को अंजाम देती है.."

चार बिअरचे घोट गेली की,विश्वासमधला शायर जागा होतो हे जयेश आणि सचिनला नेहमीचच होतं आणि म्हणूनच ते नेहमीच त्याला वैतागायचे पण आज मात्र त्याच्या शायरीत वास्तव होतं.कल्पनातच कोलमडून पडणारं स्वप्नाचं घरं नव्हतं.आजची ही शायरी खरंच खुप लाजवाब होती आणि म्हणूनच त्या दोघांनीही त्याला मनापासून दाद दिली.

तसे ते तिघे खुप जिगरी दोस्त.
एकाच शाळेत होते पण शाळेत असताना ते तिघे फक्त मित्र होते पण जिगरी नाही म्हणजे हाय बायशिवाय तुझ माझं काय?" कैसा है?", "घरपर सब ठीक?","पढाई कैसी चली रही है" ह्यानंतर "और बता" अशा टाईपची मैत्री होती.

जयेश आणि सचिन तर मागच्या बाकावर बसण्यावरून नेहमीच भांडायचे.एकदा तर सचिनने जयेशचा डोळाच फोडला होता.हा एवढा मोठा जयेशचा काळानिळा झालेला डोळा सुजला होता आणि तेव्हापासून अख्या शाळेत दोघंही "डोळेफोड्या" अनुक्रमे "डोळेफुट्या" अशा नावाने खुप फेमस झाले होते.पुढे शाळा सुटली मग कधीतरी तिघांचीही एकदा गेट टुगेदरला भेट झाली.शाळा सुटल्यानंतर तब्बल पाच वर्षानंतर तिघे जिगरी दोस्त झाले.नेहमी एकत्र फिरायचे.लाईफ खुप इंजोय करायचे असं जरी असलं तरी तिघांचे स्वभाव खुप डिंफरंट होते.

जयेश हा बोलबच्चन, हुशार, हजरजबाबी कुणालाही गुंडाळण्यात पटाईत तर सचिन त्यापेक्षा खुप वेगळा.. हॅन्डसम, क्युट, पाणीदार डोळे,बोलायचा इतका गोड कि, अख्खा जगातली साखर फक्त त्याच्याच जिभेवर आहे असंच वाईट वाटायचं त्यामुळे ज्या गावाला जायचा त्या गावाचच होऊन जायचा.

आता राहिला विश्वास... हा अवलिया गर्दितल्या हजारो चेहर्यांत खपणारा..सहज लक्षात न येणारा...नविन दोन हजाराच्या नोटेसारखा पटकन स्विकारता न येणारा..असही जरी असलं तरी ह्या माणसाकडे एक विलक्षण कला आहे.त्याचा मुळ स्वभाव तापट जरी असला तरी त्याचे बाकीही प्रसंगानुरूप अॅडजस्ट होणारे खुप स्वभाव आहेत.ह्या विश्वासचा एक वीकपाॅईंट आणि त्याच्यालेखी प्लसपाॅईट म्हणजे कविता,शायरी लिहणे.अगदीच त्याच्या शायरीतून सरस्वती जरी दिसत नसली तरी इतक्याही त्या बोअर बिलकुल करत नाही.

असे हे तिघे अनकाॅमन जरी असले तरी ते तिघे अजुनही सिंगलच आहेत हेच काय ते त्यांच्यात काॅमन होतं.

विशी उलटली तरी सिंगल असल्याच दुःख काय असतं हे त्या तिघांना चांगलच ठाऊक होतं.

"आखिर एक हमदर्द ही दुसरे हमदर्दका दर्द समझ सकता है"

हे ते काय म्हणतात ना त्यामुळेच बहुतेक त्या तिघांच खुप चांगल बाॅडिंग होतं.

असो, तर अशा ह्या तिघांनीही गेल्या ईयर इंडीगला म्हणजे तब्बल 365 दिवस, 52 आठवड्याअगोदर -

"काहीही झालं तरी येत्या वर्षांत एकतरी आयटम पटवायचीच!"

अशी भीष्मप्रतिज्ञा केली होती...

..........................................................................................................................................................

6 जानेवारी 2010..

विश्वास फेसबुकच अकांऊट चेक करत होता रादर तो पटवण्यासाठी सुयोग्य मुलगी शोधत होता.जगातली कुठलीही गोष्ट ईंटरनेटवरच मिळते अशी ठाम श्रद्धा असलेला असा हा गुगल आणि फेसबुकभक्त आजही आपल अत्यंत महत्वाच काम फेसबुकवर करत होता.खुप मुलीचे प्रोफाईल चेक करून झाले.
चाॅकलेट्स, टेडी बिअर, दिल, सेलिब्रिटी यांच्या प्रोफाईल फोटोच्या गर्दीत रिअल फोटो असलेले अकांऊट तसे कमीच.तब्बल दोन तास खर्ची घालून ( त्याच्यालेखी इन्वेस्ट करून) त्याला एक सुंदरसा फोटो असलेलं अकांऊट सापडलचं.

तिचाच रिअल फोटो होता...
तो एक क्लोजअप ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो होता.टेबलावर दोन हात पसरवून त्यावर तिने हनुवटी ठेवली होती.तिचा अर्ध्यापेक्षा जास्त चेहरा पुढे आलेल्या तिच्या मऊ रेशमी केसांनी झाकला होता.असं जरी असलं तरी कुणीही सांगू शकलं असतं ती दिसायला नक्कीच सुंदर होती.रंडोम फ्रेन्ड रिक्वेस्ट अवोईड करण्यासाठी मेय बी मुद्दाम तिने असा फोटो ठेवला असेल.बॅकग्राऊंडच्या कव्हरफोटोवर तिचा फेवरट सिनेमा डीडीएलजेमधल्या राज-सिमरनचा राॅमेंटीक फोटो होता.त्याने अजुन तिचे फोटो पाहण्याचा प्रयत्न केला पण तिचा हा एकच फोटो त्याला सापडला.

नाव राधिका कुलकर्णी, स्टडीड अॅट फर्ग्युसन काॅलेज..
ईतकीच काय ते तिची इन्फो मेंशन होती पण एक गोष्ट साफ होती ती म्हणजे ती शाहरूख खानची डाय हार्ट फॅन होती.
तिच्या फोटो अल्बममध्ये फक्त शाहरूखचेच फोटो होते.
कितीतरी शाहरूख खानचे फॅनक्लबचे पेजस तिने लाईक केले होते.संपूर्ण प्रोफाईल चेक केल्यानंतर विश्वासने काहीतरी ठरवलं आणि लगेच कामाला लागला.

विश्वासने लगेच आपला जुना प्रोफाईल फोटो हटवून डीडीएलजेमधला गिटार हातात घेतलेला शाहरूखचा नवा फोटो ठेवला.त्याच्या अल्बममध्ये असलेले स्वतःचे सगळे फोटोस डिलीट केले.चार पाच शाहरूखचे फॅनक्लब असलेले पेजसही लाईक केले...मग "जय शाहरूख" असं नाव घेऊन तिला रिक्वेस्ट पाठवली.

दोन दिवसांनी रिक्वेस्ट अॅक्सेप्ट झाल्याची नाॅटीफीकेशन विश्वासच्या अकांऊटमध्ये येऊन धडकली मग थॅन्क्स यु पासून सुरू झालेली चॅटींग अपेक्षित वळणावर येऊन ठेपली.
रोज बोलण सुरू झालं... एकमेकांचे चांगले फ्रेन्डस बनले होते ते दोघे..हळूहळू विश्वास सिरीअसली तिच्यावर खरं प्रेम करू लागला.कदाचित तिच्याही मनात तसचं काहीसं होतं.
कुठेतरी अव्यक्त असलेलं नातं आता फुलण्यास आतुर होत होतं.ती खुपच फिल्मी होती म्हणूनच की काय विश्वास नवे नवे फंडे करून तिच्या मनात घरं करू पाहत होता.

एकेदिवशी ती काही कामानिम्मत मुंबईला येणार असल्याचे कळवते मग दोघांनी मस्त भटकायचं.मराठा मंदीरमध्ये डीडीएलजे बघायचा वैगैर प्लान ती करते.
विश्वास ठरवतो ती आली की,सिनेमा संपल्यानंतर बॅण्डस्टॅण्डला जायचं.शाहरूखच्या बंगल्यासमोर मोहबत्तेमधल्या राजसारखंच पानावर लव्ह लेटर लिहून तिला प्रो करायचं पण त्या अगोदर एक करायला हवं.ते लेटर खुद्द शाहरूखने लिहायलं हवं विथ आॅटोग्राफ म्हणून मग रोज बॅण्डस्टॅडवर चकरा सुरू होतात.
रात्रंदिवस तो शाहरूखच्या बंगल्याजवळ त्याची वाट पाही पण तिथले सिक्युरिटी त्याला आत जाऊ देत नाही की, त्याला निरोप देऊ देत नव्हते पण विश्वासपण हार मानण्यातला नव्हता.तो अजूनच खंबीरपणे वाट पाही.तब्बल पंधरा दिवसानंतर सिक्युरिटीला त्याची दया आली आणि कसाबसा तो निरोप त्यांनी शाहरूखला पाठवला.लकीली शाहरूखनेही अपकमिंग रा.वन च्या शूटींगमधून थोडा ब्रेक घेतला होता त्यामुळे तो घरीच आराम करत होता.

जेव्हा शाहरूखला हे कळलं तेव्हा तो स्वतः त्याला गेटवर भेटायला आला व चार ओळी लिहून वरून आॅटोग्राफही दिली व बेस्ट ऑफ लकही दिलं.पडद्यावर हिरो साकरणारा शाहरूख रिअल लाईफमध्ये विश्वासच्यालेखी खरा हिरो ठरला...
ज्या दिवसाची तो इतक्या आतुरतेने वाट पाहत होता फायनली तो दिवस आला.फायनली ती आली.रोज रोज फॅसबुकवर बोलणारी व्यक्ती प्रत्यक्षात कशी दिसत असेल??
ह्याचा विचार आणि कल्पना करून करून मेंदू शिणला होता.
जिला फक्त एकदा बघण्यासाठी मन तरसत होतं ती आज प्रत्यक्षात त्याच्यासमोर होती.विश्वासच्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस होता तो.मराठा मंदीरमध्ये सिनेमा बघताना राजच्या जागेवर तो स्वतः व सिमरनच्या जागेवर राधिका विश्वासला दिसत होती.सिनेमा संपल्यानंतर दोघेही हाॅटेलात काहीतरी खायला जातात.खाता खाता मस्त गप्पा रंगलेल्या असताना अचानक राधिका सिरीअस होते व तिच्या डोळ्यातून पाणी येत. तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून विश्वासचा जीव कासावीस होतो.

"राधिका काय झाले..?? मी काही चूकीचं केलं का? प्लिज तु रडू नकोस" विश्वास अगदीच काकुळतीला येऊन तिची समजुत घालण्याचा प्रयत्न करतो.

तशी ती एक आवंढा गिळते..टिश्यूपेपरने डोळे पुसत सांगायला सुरूवात करते...

" विश्वास...मी तुझ्यावर खरोखर खुप प्रेम करायला लागले रे.हे प्रेम आहे की नाही हे मला माहीत नाही पण प्रत्येकवेळी तुझा विचार मनात येतो, मला मान्य आहे आपण आज पहिल्यांदा प्रत्यक्षात भेटतोय पण तुझ्या फेसबुकरूपी सहवासाने माझ्या ह्रद्याच्या तारा कधी छेडल्या गेल्या हे माझं मलाच कळलं नाही. हे प्रेम असंच असावं बहुदा कारण ज्या भावना आता मला कळतायत त्यांच्या जन्म याआधी कधीही झाला नव्हता. ह्या भावनांना काय नाव द्यायचं हे मला माहीत नाही पण हे प्रेमचं असावं असं मला वाटतयं..तु खुप छान आहेस..किती माझी काळजी करतोस..
माझं काम वैगेरे काही नव्हतं रे.. मी मुद्दामच तुला भेटायला इथे आले...तुला प्रत्यक्षात पाहण्याची..तुझ्याबरोबर काही क्षण घालवता यावेत अशी खुप इच्छा होती माझी पण मला माहीतं नाही रे मी चुकीच वागतेय की बरोबर कारण मी तुझ्यावर प्रेम नको करायला हवं आपण एकत्र येण कधीच शक्य नाहीये रे...मी ब्राम्हण तु शिंपी.घरातले कधीच परवानगी नाही देणार रे आणि पळून जाऊन लग्न नाही करू शकत रे मी..तुझ्यावरच माझं प्रेम तसेच राहील पण मी हे सगळं पुढे नाही नेऊ शकतं..."

इतकं बोलून ती आणखीनच रडू लागते.खरंतरं हे सगळं ऐकून विश्वासचं मन आतल्या आत रडत होतं.त्याला रडावसं वाटतं होतं पण त्याला हे ही माहीत होतं की, ही वेळ रडण्याची नाही तर तिला सावरण्याची आहे.

तो तिला मनातलं काही न बोलता परिस्थिती नाॅर्मल करण्याचा प्रयत्न करत असतो.कसेतरी तो तिला समजावतो.मनातलं सारं काही सांगितल्यामुळे तिलाही आता बरेच हलकं हलकं वाटत होतं.टॅक्सी करून ते बॅण्डस्टॅडला जातात.टॅक्सीत कुणीच काही बोलतं नव्हतं.खरंतरं तिथे शब्दांची आवश्यकताच नव्हती जेव्हा शब्द मुके होतात तेव्हा भावना ह्या बोलतात.ती त्याच्या खांद्यावर डोके ठेवून नुसतीच बसली होती...

संध्याकाळच्या कोवळ्या उन्हात दोघेही शाहरूखच्या बंगल्यासमोर निशब्द उभे असतात.तो हळूच खिशातलं ते पान काढून तिला देतो.ती वाचते व अजूनच ढसाढसा रडायला लागते.ह्याचाही बांध फुटतो.तो ही रडायला लागतो.दोघही एकमेकांना घट्ट मिठ्ठी मारतात.मिठ्ठीतल्या त्या उबेत कित्येक भावना सामावल्या होत्या.कित्येक आसूंची बरसात झाली होती आणि त्यातल्या भावनांचा मृदगंध कित्येक वेळा तिथे रेंगाळला होता. त्या क्षणांत कित्येक युगे दाटले होते.सहस्र योजनाचं अंतर क्षणभर कापलं होतं आणि नकळत उमलणारं प्रेम कित्येक वेळा तिथे फुललं होतं..
हे पुन्हा शक्य नाही..हा सूर्यास्त..ही किरणे..ही हवा.हा माहोल पुन्हा होणे नाही..त्यांच्या प्रेमाच्या साक्षीने आणि नकळत होणार्या त्यांच्या विरहाने सूर्य उदास होत होत..दबक्या पावलाने मागे सरला. कदाचित उद्या आणखी एक प्रेमाची किंवा विरहाची गोष्ट अनुभवयला तो परत येणार होता नेहमीप्रमाणेच.

एकेक क्षण साठवत दोघंही ऐकमेकांचा भरल्या डोळ्यांनी निरोप घेतात. पुन्हा कधीही न भेटण्यासाठी..
...................

बिअर जरी प्यायला असला तरी सगळं त्याला जसच्या तसं आठवत होतं...डोळ्याच्याकडेला जमा झालेले...
अश्रू पुसत तो उरलेली बिअरही एका घटक्यात संपवतो...
त्याचवेळी त्याच्या मोबाईलवर राधिका जोशीचा (हो तिच आता लग्न झालयं) हॅप्पी न्यू ईयरचा मॅसेज येतो...

.............................................................................
सचिनचही मन थार्यावर नव्हतचं मुळी...राहून राहून त्याच्या मनात

"मोहब्बतही बदनाम करती है...
मोहब्बतही गुलाम करती है..
इतिहास के पन्नो पन्नो पे देख लो..
मोहब्बतही गम को अंजाम देती है.."

विश्वासची ही शायरी घुमत होती...

थोडीशी बिअर जास्त झाल्यामुळे नकळत त्याचही मन भूतकाळात शिरलं होतं.

क्रमशः

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असू शकतं.....मी काही त्याचा चाहता नाही पण तो आवडत नाही असंही नाही..

त्याचे काही चित्रपट आवडतात मला आणि काही अजिबात आवडत नाही..

प्यार इश्क और मोहब्बत
जो भी इनका नाम ले
पहले दिलको थाम ले
नाम लेनेसे ही कयामत हो जाती है

छान, पुढचे भाग लवकर टाक..
अजुन एक शिर्षकात प्लिज भाग-१ अस टाक म्हणजे क्रमक्ष आहे हे कळेल.

मस्त सुरवात
शायरी ची आयडिया भारी अजुन टाकल्या तर मजा येईल.

धन्यवाद पंडीतजी .

तुमच्यासाठी खास..

मंझिले उन्हीको मिलती है..
जिनके सपनों में जान होती है.
पंखो से कुछ नही होता. .
हौसलो से उडान होती है.

वो खुद को फुल और हमें पत्थर केहकर मुस्काराया करते है ..
शायद उन्हे ये खबर नही पत्थर तो पत्थरही रहते है..
फुलही मुरझाया करते है ...

ह्या माझ्या सर्वात आवडत्या ओळी...

उगीच स्वप्नात सावल्यांची कशास केलीस आर्जवे तु
दिलेस का तु प्रेम कुणाला तुझ्याच जे अंतरात आहे