दिवाना

Submitted by अजय चव्हाण on 24 October, 2017 - 06:36

दिवाना..

तुझे चित्र साकारताना रंग संपले माझे..
नव्हतीच कधी तु स्वप्न तुटले माझे..
कनव्हास तुझ्या असण्याचा कोराचा राहीलाय..
कशी असशील तु? कशी दिसशील तु?
हा प्रश्न माझा नेहमीचा अपुराच उरलाय..

"भगवान घर पे देर है मगर अंधेर नही"
हा डायलाॅग आता खोटा वाटायला लागलाय..
माझ्या फॅशन आणि स्टाईलचा तोटा व्हायला लागलाय..
व्हाॅटसअप स्टेट्स माझ लोनली झालय...
डीपीमध्ये सुद्धा मी सिंगल ओन्लीच उरलोय..

चाॅद तारे तोडने की बाते नही होती..
खयालो मे पुलाव बनाके रेसिपी नही बनती..
बघ एकदा येऊन पुलाव हा शिळा झालाय..
ह्रद्याच्या बाणाचा आता विळा झालाय..
क्रश न कुणी मजवर सो कॅण्डी क्रश खेळतोय..
असतो उदासलेला हल्ली मी फ्रेश नसतोय...

कपल लोकांना बघतो तेव्हा..
"किस जन्म का बदला ले रहा मुझसे.."
असा प्रश्न भगवानला विचारवासा वाटतो..
बोलतो मी मनातल्या मनातसुद्धा असं..
तर तो बोलतो की, तु किती फिल्मी असतोस..

हरकोई बोलता है..मिलही जाईगी तुझे कोई तो...
सोनम,पुनम, किंजल या डिंपल..
व्हाट कॅन आय से आय नीड ओन्लि सोबर अॅण्ड सिंपल.
दिल के दरवाजे पे फ्री इन्ट्री रखी है...
बट साला जो भी आती है उसके हाथ में राखी है..

दिवाना होतो मी दिवानाचा राहीलोय..
अधाशलेल्या नजरेने फक्त बघतच बसतोय..
माझ्याबरोबरच ईमेलचा पासवर्ड मी चेंज केलाय..
"ईग्नोरेड मेटेरिअल" असा मी ठेवलाय..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!!! Happy
दिल के दरवाजे पे फ्री इन्ट्री रखी है...
बट साला जो भी आती है उसके हाथ में राखी है..>>> Lol