पॉली हाउसेस. कान्होबाची वाडी व सातवड. जि.अहमदनगर
Submitted by मानुषी on 31 March, 2015 - 03:29
मागचा रवीवार निसर्गाच्या सान्निध्यात अगदी सार्थकी लागला. आणि वाटायला लागलं की शहरी दिनक्रमात आपण जीवनातल्या अगदी सहज साध्या छोट्या छोट्या आनंदाला मुकतो.
नगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यात कान्होबाची वाडी व सातवड या दोन्ही खेड्यात असलेल्या पॉलीहाऊसला भेट देण्याचा योग आला.
ही गावं नगरपासून पाऊण तासाच्या अंतरावर आहेत.
निसर्गाचा लहरीपणा किंवा अनियमितता कधीकधी पिकांसाठी फारच मारक किंवा हानिकारक ठरते. पण पॉलीहाऊसच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे शेतकरी अश्या प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींशी सक्षमपणे लढा देऊ लागलाय.