हे वटवृक्षा
हे वटवृक्षा आम्हाला माफ कर
आम्ही अजुनही समजलो नाही
अन् वडाला दोरा बांधतानाही
अजुन सुध्दा लाजलो नाही
वृक्षतोडीने होणारा दुष्परिणाम
आता मानसांनाच जाणावा लागेल
अन् भावी वटपोर्णिमांसाठी वड
बाजारांतुनच आणावा लागेल,.?
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
हे वटवृक्षा
हे वटवृक्षा आम्हाला माफ कर
आम्ही अजुनही समजलो नाही
अन् वडाला दोरा बांधतानाही
अजुन सुध्दा लाजलो नाही
वृक्षतोडीने होणारा दुष्परिणाम
आता मानसांनाच जाणावा लागेल
अन् भावी वटपोर्णिमांसाठी वड
बाजारांतुनच आणावा लागेल,.?
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
गडगडणारे ढग हजारो
दुष्काळलेल्या धरणीस या
नभ पाणी आज पाजेल काय,.?
आस लागली हो मना-मनाला
जो गरजतोय तो बरसेल काय,..?
दुष्काळ पडला निसर्गात या
पाण्यासाठी खुमखुमी आहे
जरी गडगडणारे ढग हजारो
पण पडणाराची कमी आहे
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
हे सत्य आहे
निसर्गात दुष्काळ पडलाय
अंगाला मात्र पाझर आहे
कुलर आणि पंख्यालाही
लोडशेडींगचं गाजर आहे
उन्हाचा सामना करायला
जरी तटस्थ ए.सी. आहेत
पण या नैसर्गिक आपत्तीचे
मानवच तर दोषी आहेत
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
व्हाटस्अप वरून डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783
का माणसा,...?
गरम गरम या उन्हामुळे
जमीन होरपळते आहे
ज्याला उन पोळते आहे
त्याला उन कळते आहे
मात्र उन्हात गेल्या शिवाय
सावलीचं महत्व कळत नाही
अन् तरीही झाडे लावण्यासाठी
माणुस का तळमळत नाही,.?
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
नैसर्गिक सत्य
वाढती पाणी टंचाई
त्यातच उन्हाचा कहर
दिवसें-दिवस वाढतेय
इथे प्रदुषणाचे जहर
वेळीच आळा बसवावा
समस्यांच्या या संसर्गाला
चांगल्या निसर्ग सेवेसाठी
जपावं लागेल निसर्गाला
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
फेसबुकवर सध्या एक मेसेज फिरत आहे - खात असलेल्या फळांच्या बिया साठवून ठेवा आणि पावसाळ्यात कुठे फिरायला गेलात तर त्या आजूबाजूला टाका, निदान काही तरी रुजतील. तेवढाच पर्यावरण हरित करण्यास आपला हातभार.
कल्पना खरंच खूप छान आहे. सध्या आंबे, फणस, जांभळं वगैरेचे दिवस आहेतच. त्यामुळे या सगळ्या फळांच्या बिया एकत्र करून ठेवायला हरकत नाही. शिवाय ही खास आपल्या भूमीतील झाडं. मग ही झाडं रुजवायला थोडा अजून सजग हातभार लावता येईल का?
समजा प्रत्येकानं / किंवा एखाद्या गटानं मुद्दाम यंदाच्या पावसाळ्यात असा प्रयत्नपुर्वक उपक्रम हाती घेतला तर?
उन्हाची गुर्मी
नैसर्गिकता बदलु लागली
वातावरणातच घोळ आहे
सहनशिलतेच्या अंतापर्यंत
उन्हाची चढती मजल आहे
तापमापीतील पार्याचीही
आता कांडी चढली आहे
अन् गर्मठ-गर्मठ उन्हाची
जणू गुर्मी वाढली आहे
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
मी सकाळी झाडाना पाणी घातलं की असे छोटे छोटे पक्षी जमतात आणि पानांवरचे पाण्याचे थेंब पितात त्यात अंग घासुन अंघोळ करतात
खाली साठलेल्या पाण्याकडे पहातही नाहीत
बागड़त असतात अगदी। अळू , सोनटक्का, ब्रह्मकमळ अशी पान त्यांची फेवरिट आहेत
एक दिवस उशीर झाला पाणी घालायला तर येऊन किलबिलाट करु लागले