निसर्ग

तडका - पावसा,...

Submitted by vishal maske on 28 June, 2015 - 11:11

पावसा,...

मना-मनात वाढणारी
प्रतिक्षेची उंचाई आहे
जिकडे-तिकडे आता
पावसाची टंचाई आहे

आकाशयात्री ढग सुध्दा
ना अपेक्षीत बरसले आहेत
अन् शेता-शेतातील अंकुर
पाण्यासाठी तरसले आहेत

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

निसर्गाच्या गप्पा (भाग २६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 June, 2015 - 05:50


आषाढातले घनघोर बरसणारे काळे कभिन्न मेघ आणि कवी कुलगुरू कालिदास यांची मनात एक घट्ट अतूट अशी सांगड घातली गेली आहे.
आपण "आषाढस्य प्रथम दिवसे" ........ आषाढातला पहिला दिवस...... कवी कालिदास जयंती म्हणून साजरा करतो.
असा आपल्या साहित्याचा आणि निसर्गाचा खूप पुरातन काळापासूनचा संबंध आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

ज्ञानयात्रा ४ (शेवट)

Submitted by मंजूताई on 24 June, 2015 - 06:41

मिश्मी पर्वतरांगांमध्ये वसलेल्या लोअर देबांग व्हॅलीत मुख्यत्वे इदु लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. काहीसे कट्टर ! आजही आपल्या रुढी परंपरांना घट्ट चिकटून आहेत. अनेक भाषांप्रमाणे बोलीभाषा इदु लुप्त होण्याच्या मार्गावर आहे कारण त्याची लिपी नाहीये. शेती व पशुपालन हे मुख्य व्यवसाय. मिथुन,डुक्कर, कोंबड्या सारखे प्राणी पाळतात. भात, सरसो ही मुख्य पिकांबरोबर संत्री, केळी, अननस इ. फळांचं मुबलक प्रमाणावर उत्पादन होतं. निर्यातीसाठी दळणवळणाची पुरेशी सोय नाही. साठवणूक करायला फळ प्रक्रिया उद्योग नाहीत म्हणून पशू खाद्य विकत आणण्या ऐवजी उरलेलं अन्न व अतिरिक्त फळांचा उपयोग करतात.

शब्दखुणा: 

ज्ञानयात्रा २

Submitted by मंजूताई on 21 June, 2015 - 04:46

कार्यशाळेचा आज पहिला दिवस. ही कार्यशाळा इस्सोमी फाऊंडेशन पेरेंट बॉडी ऑफ इनतया पब्लिक स्कूल व इन्जालुमेंडा विमेन एमपॉवरमेंट फोरम ह्यांनी आयोजित केली होती. साडेआठवाजल्यापासून मुलं यायला सुरुवात झाली. पन्नास मुलांमध्ये मुलींची संख्या लक्षणीय होती कदाचित वूमन एमपॉवरमेंट सह आयोजक असल्यामुळे तर नाही ना Happy कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात दीपप्रज्वलन व उदघाटक रिवॉचचे डायरेक्टर विजयस्वामीसर व राखी लिंगी ह्यांच्या आटोपशीर भाषणाने झाली अन लाजरी बुजरी (?)मुलं आमच्या ताब्यात आली.

शब्दखुणा: 

तडका - नैसर्गिक पंचनामा,...!

Submitted by vishal maske on 20 June, 2015 - 11:28

नैसर्गिक पंचनामा,...!

कुणी कुणाला दोष दिले तर
कुणी जबाबदारीच झटकली
मात्र निकृष्ठ दर्जाच्या कामांची
गोष्ट सगळ्यांनाच खटकली

जोरदार पडल्या पावसाने
बहारदारच हंगामा झाला
अन् केल्या कामांचाही जणू
नैसर्गिकच पंचनामा झाला,..!

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - पावसाच्या औचित्याने

Submitted by vishal maske on 19 June, 2015 - 22:11

पावसाच्या औचित्याने

आनंद घेणार्‍या मनांचीही
आता दैना केली आहे
वाट पाहिलेल्या पावसाने
जणू वाट लावली आहे

पावसाची अतिवृष्टी होणं हे
दैनंदिनीलाही अडलेलं आहे
अन् पावसाच्या या पडण्याने
राजकारणही घडलेलं आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - मुंबई बंद,...!

Submitted by vishal maske on 19 June, 2015 - 11:00

मुंबई बंद,...!

मुंबई बंद ठेवण्यामागेही
वेग-वेगळे कारणं आहेत
अन् निसर्गाच्या वर्षावासह
कुकर्मिक मानवी वर्ण आहेत

करून दाखवलेल्या कामांचं
दर्जेदारपणही भेदलेलं आहे
अन् पावसा पेक्षाही जास्त
नाल्यांनी लक्ष वेधलेलं आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

२ गटारी अमावस्या ???

Submitted by हेमन्त् on 19 June, 2015 - 00:33

दरवर्षी आषाढी अमावस्येला गटारी अमावस्या साजरी करतात. यावर्षी दोन आषाढ महिने असल्याने गटारी दोनदा साजरी करायची का ? अशी प्रामाणिक शंका भाविकांनी व्यक्त केली आहे....
.
.
.
तज्ञ आणि अनुभवी लोक मार्गदर्शन करतील का?

ज्ञानयात्रा

Submitted by मंजूताई on 16 June, 2015 - 06:54

प्रवास मनापासून करायला आवडतो कुठेही, कसाही, केव्हाही, कितीही! त्यामुळे प्रवास वर्णनेही खूप वाचली जातात. असाच मायबोलीवरचा ( http://www.maayboli.com/node/52091 ) हा लेख वाचनात आला अन विचारचक्र सुरू झालं. टू बी ऑर नॉट टू बी! एक खूप आवडीच वाक्य आहे 'वी डोन्ट नो व्हॉट वुई कॅन डू टिल वुई ट्राय इट'.... आणि एक दिवस नोंदणी करून टाकली. हुश्श! पाठ्यपुस्तकातील विज्ञानाशी संबंध सुटून अनेक दशकं उलटली..

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - निसर्ग