मिश्मी पर्वतरांगांमध्ये वसलेल्या लोअर देबांग व्हॅलीत मुख्यत्वे इदु लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. काहीसे कट्टर ! आजही आपल्या रुढी परंपरांना घट्ट चिकटून आहेत. अनेक भाषांप्रमाणे बोलीभाषा इदु लुप्त होण्याच्या मार्गावर आहे कारण त्याची लिपी नाहीये. शेती व पशुपालन हे मुख्य व्यवसाय. मिथुन,डुक्कर, कोंबड्या सारखे प्राणी पाळतात. भात, सरसो ही मुख्य पिकांबरोबर संत्री, केळी, अननस इ. फळांचं मुबलक प्रमाणावर उत्पादन होतं. निर्यातीसाठी दळणवळणाची पुरेशी सोय नाही. साठवणूक करायला फळ प्रक्रिया उद्योग नाहीत म्हणून पशू खाद्य विकत आणण्या ऐवजी उरलेलं अन्न व अतिरिक्त फळांचा उपयोग करतात.
कार्यशाळेचा आज पहिला दिवस. ही कार्यशाळा इस्सोमी फाऊंडेशन पेरेंट बॉडी ऑफ इनतया पब्लिक स्कूल व इन्जालुमेंडा विमेन एमपॉवरमेंट फोरम ह्यांनी आयोजित केली होती. साडेआठवाजल्यापासून मुलं यायला सुरुवात झाली. पन्नास मुलांमध्ये मुलींची संख्या लक्षणीय होती कदाचित वूमन एमपॉवरमेंट सह आयोजक असल्यामुळे तर नाही ना कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात दीपप्रज्वलन व उदघाटक रिवॉचचे डायरेक्टर विजयस्वामीसर व राखी लिंगी ह्यांच्या आटोपशीर भाषणाने झाली अन लाजरी बुजरी (?)मुलं आमच्या ताब्यात आली.
प्रवास मनापासून करायला आवडतो कुठेही, कसाही, केव्हाही, कितीही! त्यामुळे प्रवास वर्णनेही खूप वाचली जातात. असाच मायबोलीवरचा ( http://www.maayboli.com/node/52091 ) हा लेख वाचनात आला अन विचारचक्र सुरू झालं. टू बी ऑर नॉट टू बी! एक खूप आवडीच वाक्य आहे 'वी डोन्ट नो व्हॉट वुई कॅन डू टिल वुई ट्राय इट'.... आणि एक दिवस नोंदणी करून टाकली. हुश्श! पाठ्यपुस्तकातील विज्ञानाशी संबंध सुटून अनेक दशकं उलटली..
अरुणाचलप्रदेश ६:-विस्तार है अपार ..प्रजा दोनो पार..करे हाहाकार ...
निसर्गाच्या सृजनाचा अविष्कार फार सुंदरपणे व मुक्तपणे व्यक्त झालेला आपल्याला ईशान्य भारतात पहावयास मिळतो. तिथले लोकजीवन पण असेच मोकळे चाकळे. अशा सुंदर निसर्गाचा व लोकजीवनाची नाळ स्थानिक लोकांची तुटणे अशक्यच. अरुणाचल प्रदेशातील अनेक बुद्धिमान विदयार्थी शिक्षणासाठी अन्य राज्यात जातात. तिथे चांगले शिक्षण घेतात. चांगल्या पगाराची नौकरी त्यांना महानगरातील मोठया उद्योग समूहात सहज मिळू शकते. शहरातील मोहजाल मात्र ते अडकून न राहता ते अरुणाचल मध्ये परततात.
आपल्याला विनंती आहे की ह्या लेखाच्या आधीचे अरुणाचलप्रदेश वरील तीन लेख वाचा ..सोबतच्या लिंकवर क्लिक करून ते आपल्याला वाचता येतील
http://prasadchikshe.blogspot.in/2012/05/blog-post_24.html
कर्नल संभाजी पाटील आपल्या निवृत्ती नंतर आपले सामाजिक जीवन एका सैनिकाप्रमाणे निष्ठेने जगत होते. २००९ मध्ये त्यांना एक फोन आला.
अरुणाचलप्रदेश १......."ईशान्यभारत - भारताचा एक दुर्लक्षित भाग"
http://www.maayboli.com/node/34433
दिब्रुगड येथे महालयामध्ये आमची निवासाची व्यवस्था होती. सतत पडणारा पाऊस त्यामुळे बाहेर फिरणे जवळपास अशक्य. वाचन खूप करत होतो. या काळात सर्वात मोठी साथ होती माझा मित्र योगेश झोपेनी दिलेल्या मस्त गाण्याच्या कॅसेट्स व माझ्या आईने घेऊन दिलेल्या कॅसेट प्लेयरनी. ग्रेसच्या कविता आणि जगजितसिंगांच्या गझला ह्या माझ्या नित्याच्या साथीदार बनल्या.
माँ सुनाओ मुझे वो कहानी,
जिसमें राजा न हो न हो रानी,