कालच्या बातम्यात महाराष्ट्रात गोवंश हत्येला बंदी घालण्याच्या विधेयकाला राष्ट्रपती महोदयांनी मंजुरी देऊन आता महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी लागु होईल.
हा कायदा महाराष्ट्रात युती शासन ( भाजप - शिवसेना १९९५ -१९९९ ) काळात पास झाला होता आणि राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी गेला होता. दरम्यान च्या काळात युतीचे शासन जाऊन काँग्रेस- राष्ट्रवादीचे शासन १५ वर्षे सत्तेवर होते.
मुंबई ते काश्मीर... दुचाकीच्या संगे... भाग 1
मस्त कलंदर अरुण वेढीकरचा तरुणपणातील सायकलनामा.
मस्कत सहलीचे काही भाग अजून यायचे आहेत. पण मी मागच्या भागात वर्णन केल्याप्रमाणे त्या दिवशी तिथे तूफान पाऊस झाला.
मस्कतमधे दगडाचे डोंगर असल्याने सर्व पाणी तिथे न अडता रस्त्यावरच आले. असा पाऊस असा तिथे नियमितपणे येऊ लागला आहे.
तिथल्या घरांची आणि रस्त्यांची बांधणी पावसासाठी केलेली नाही, त्यामूळे पाणी वहात राहते. तिथे ज्या नद्या आहेत त्या एरवी कोरड्याठाकच असतात ( कधी काळी त्यातून पाणी वहातही असेल, नदीचे पात्र रुंद आहे. )
पण त्या दिवशी रुवी नदीतही भरपूर पाणी वहात होते.
दोनतीन तास पावसाचे थैमान चालू होते. मायबोलीकर मित ने पाठवलेले हे फोटो..
१)
मी आतापर्यंत लंडन, माथेरान, महाबळेश्वर, अलिबाग, गणपतीपुळे, कोल्हापूर, अजिंठा, कार्ला, मुंबई एवढी ठिकाणे फक्त बघितली आहेत.
ही चर्चा प्रवास वर्णन आणि संबंधित पुस्तके, मासिके, चॅनेल्स यासंदर्भात आहे. यापूर्वी मी प्रवास वर्णने कधी वाचली नव्हती.पण नुकतीच मीना प्रभूंची दक्षिणरंग (दक्षिण अमेरिकेवर आधारित) आणि मेक्सिको पर्व ही लायब्ररीतली पुस्तके हाती लागली आणि मला प्रवासवर्णन वाचनाची आवड निर्माण झाली. मीना प्रभूंच्या इतर देशांवरील आणि इतर अनेक लेखकांची प्रवास वर्णनाची पुस्तके मी शोधून विकत घेतली आणि जसा वेळ मिळाला तसा वाचायला लागलो.
उदा: दक्षिणायन - रणजित मिरजे (दक्षिण अमेरिकेवर आधारित),
( मी आधी विस्कळीत पणे लिहिलेली माहिती एकत्र करतोय, एवढेच ! )
केनया, पूर्व आफ्रिकेतला एक सुंदर देश. भारतीयांना आगदी आपला वाटेल असा. केनयातल्या अनेक शहरांत
फिरताना तूम्हाला भारतातच ( गुजराथमधील एखाद्या शहरात ) वावरत असल्याचा भास होईल. "केम छो ?"
वगैरे शब्द अगदी स्थानिक लोकांच्या तोंडूनही ऐकता येतील. १०० वर्षांपेक्षा जास्त काळ भारतीय तिथे वास्तव्य
करून आहेत.
केनयाच्या खाद्यसंस्कृतीबद्दल लिहायचे तर भारतीय प्रभावाबद्दल लिहिणे भाग आहे. पण भारतापेक्षाही ब्रिटीश
राजवटींनीदेखील त्यांच्या खाद्यसंस्कृतीवर प्रभाव पाडलेला आहे.