Submitted by दिनेश. on 25 February, 2015 - 05:44
मस्कत सहलीचे काही भाग अजून यायचे आहेत. पण मी मागच्या भागात वर्णन केल्याप्रमाणे त्या दिवशी तिथे तूफान पाऊस झाला.
मस्कतमधे दगडाचे डोंगर असल्याने सर्व पाणी तिथे न अडता रस्त्यावरच आले. असा पाऊस असा तिथे नियमितपणे येऊ लागला आहे.
तिथल्या घरांची आणि रस्त्यांची बांधणी पावसासाठी केलेली नाही, त्यामूळे पाणी वहात राहते. तिथे ज्या नद्या आहेत त्या एरवी कोरड्याठाकच असतात ( कधी काळी त्यातून पाणी वहातही असेल, नदीचे पात्र रुंद आहे. )
पण त्या दिवशी रुवी नदीतही भरपूर पाणी वहात होते.
दोनतीन तास पावसाचे थैमान चालू होते. मायबोलीकर मित ने पाठवलेले हे फोटो..
१)
२)
३)
४)
५)
६)
७)
ही मी हॉटेलमधून घेतलेली क्लीप
https://www.youtube.com/watch?v=Ljb4iVdC7pw
अर्थात मस्कत लगेचच सावरले, आणि आपली सहल पण पुढे चालू राहीलच.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बाप रे! किती ते पाणी! कसा
बाप रे! किती ते पाणी! कसा निचरा होत असेल त्याचा?
प्रचि ३ - हे पाहून 'मिलन सब-वे'च आठवला
भारीच की.... इथे शेअर
भारीच की.... इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
वाळवंटी प्रदेशात अशा पावसाची "किम्मत" किती त्यावरील तुमचे भाष्य वाचायला आवडेल.
बाप रे मस्कत मध्ये इतका
बाप रे मस्कत मध्ये इतका पाउस....काहीच्या काहीच आहे... कमाल आहे आनि त्यातून सावरण्याची....
७ वर्षांपुर्वी आलेल्या एका
७ वर्षांपुर्वी आलेल्या एका पुराचे जे वर्णन मित कडून ऐकले त्यावरून तो जास्त भयानक होता. त्या अनुभवावरुन शहाणे होऊन आता या पुराने होणार्या नुकसानीचाही विमा उतरवला जातो.
या पावसाचे पाणी दुसर्या दिवशीही वहात होते ( त्याचे फोटो पुढच्या भागात येतील. ) नुकसानही बरेच झाले असणार. पण सावरलेही लगेच.
क्र्मांक ६/७ मधे दिसताहेत ते रुवीचे फोटो. माझ्या ५ वर्षांच्या वास्तव्यात केवळ एकदाच या नदीत ( थोडेसे ) पाणी बघितले होते. असला पाऊस मी कधीच तिथे अनुभवला नव्हता.
दिनेश दा मी पण ही नदी कोरडीच
दिनेश दा मी पण ही नदी कोरडीच पाहिली आहे... म्हणुन तर बाप रे असेच झाले.... पण हल्ली एकूणच सगळी कडे वातावरणात भलताच बदल होत आहे नाही का?
अवेळी काहीही होत असते...
ओह .. खूपच पाणी साठलंय..
ओह .. खूपच पाणी साठलंय.. निसर्ग, आगामी धोक्याची आगाऊ सूचना देत आहे तर!!!
आता ते लोक खबरदारी घेत
आता ते लोक खबरदारी घेत असावेत. पुर्वी बांधलेल्या घरांच्या खिडक्यांना बाहेरून झडपाही नाहीत. पाणी सरळ आत ( जत खिडकी उघडी असेल तर ) माझ्या हॉटेल रूमचा एक्झॉस्ट फॅन, उलट्या दिशेने एवढ्या जोरात फिरला, कि निखळूनच पडला !
बापरे किती तो पाऊस
बापरे किती तो पाऊस
पाऊस ! छान
पाऊस ! छान
मला तर कोकणातल्या नदीला आलेला
मला तर कोकणातल्या नदीला आलेला पूर आठवला.
धन्यवाद मित आणि दिनेश. पाणी
धन्यवाद मित आणि दिनेश. पाणी ओसरले का? जनजीवन सुरळीत झाले का?
ईंटरेस्टींग !
ईंटरेस्टींग !
बाप रे..
बाप रे..
दिनेशदा मला माझे सौदि
दिनेशदा मला माझे सौदि अरेबियाचे दिवस आठवले. माझी कंपनी अशीच वाळवंटात होती. कधीमधीच येणार्या पावसाने फ्लश फ्लडिंग होत असे.कधीकधी पाऊस थांबल्यावर १०-१५ मिनिटांनी पाणी येत असे. रस्त्यावरच्या मोटारी तरंगत कुठल्या कुठे लांब वाहून जात. एकदा तर पावसानंतर असेच पाणी वाढू लागले. कंपाउंड ची भिंत तोडून पाणी आत आले अन बघता बघता 'गॅलव्हनायझिंग' टँक कडे सरकू लागले. सगळे हतबल! थोड्याच वेळात मोठा स्पोट होऊन छप्पर पण खाली आले..!
अगदी पुर आल्यासारखच वाटल.
अगदी पुर आल्यासारखच वाटल.
kaal aamachyaakaDe ( Angola )
kaal aamachyaakaDe ( Angola ) madhe paN khup paaoos jhaalaa. aamhee raatree gharee jaaoo shakalo naahee. Office madhalyaa guest rooms madhech jhopalo.