अपराध
Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
33
अंगणात उभे राहून
रात्रीचं आकाश नजरेत भरुन घेताना
लक्षातच येत नाही
की तळपायी चाफ्याची फुल आली आहेत
नकळत ती चेंदामेंदा होत आहेत!!!
रस्त्यावर फाटकी चादर अंथरुन
शेपू चाकवत मेथी विकणार्या बाईकडून
दहा रुपये कमी करुन भाज्या घेताना
काहीच कसे जाणवत नाही
की तिच्या पोराच्या शाळेची फी
हजार रुपये आहे आणि
तिच्या अंगावरचे नऊवार जीर्णशीर्ण झाले आहे!
लहान मुलांशी उंच आवाजात बोलताना
जिभेवरुन सरकन वाहून गेलेले शब्द
डोळ्यातून उतरलेला आगीचा डोंब
हळुहळु त्याच्याही नसात भिनतो
कुणी दिली ही शिकवण हे उमगलेच नाही!!!!
वर्तमान पत्रात छापून येतील
इतके मोठे नसले तरी
रोज छोटे छोटे वाटणारे
अनेक अपराध आपल्याकडून घडतच असतात!!!!!
नोटः ह्यावेळी आमच्या काव्यवाचनाला अपराध हा विषय आहे. काय लिहावे म्हणून ही एक सुचली. मन मारुन लिहिली.
- बी
विषय:
प्रकार:
शेअर करा
आवडली.
आवडली.
जमलीये!!
जमलीये!!
सुंदर लिहिली आहेस कविता बी.
सुंदर लिहिली आहेस कविता बी. खूप भिडली.
अतिशय सुंदर. अपराधांकडे
अतिशय सुंदर. अपराधांकडे पाहायची एक वेगळी नजर.
अवांतर - ते जीर्णशीर्ण असं हवं न?
अवांतर - ते जीर्णशीर्ण असं
अवांतर - ते जीर्णशीर्ण असं हवं न?>> मी पण तोच शब्द लिहिला आहे वेका!!!
सर्वांचे धन्यवाद. तुमच्यामुळे सतत काहीना काही लिहावेसे वाटत राहते.
तू मन मारूनच लिहित जा, खूप
तू मन मारूनच लिहित जा, खूप छान लिहितोस मग...
.
<< खूप भिडली. >> सहमत <<
<< खूप भिडली. >>
सहमत
<< लहान मुलांशी उंच आवाजात बोलताना
जिभेवरुन सरकन वाहून गेलेले शब्द
डोळ्यातून उतरलेला आगीचा डोंब
हळुहळु त्याच्याही नसात भिनतो
कुणी दिली ही शिकवण हे उमगलेच नाही!!!! >>
मुलाना रागवताना या ओळी नक्की मनात येतील....
आवडली..
आवडली..
<< लहान मुलांशी उंच आवाजात
<< लहान मुलांशी उंच आवाजात बोलताना
जिभेवरुन सरकन वाहून गेलेले शब्द
डोळ्यातून उतरलेला आगीचा डोंब
हळुहळु त्याच्याही नसात भिनतो
कुणी दिली ही शिकवण हे उमगलेच नाही!!!! >>
मुलाना रागवताना या ओळी नक्की मनात येतील....>>> + १
मनाला स्पर्शून गेली. मुलाला
मनाला स्पर्शून गेली. मुलाला रागावायच्या आधी हे नक्की आठवेल आता मला.
लहान मुलांशी उंच आवाजात
लहान मुलांशी उंच आवाजात बोलताना
जिभेवरुन सरकन वाहून गेलेले शब्द
डोळ्यातून उतरलेला आगीचा डोंब
हळुहळु त्याच्याही नसात भिनतो
कुणी दिली ही शिकवण हे उमगलेच नाही!!!! >> मस्तच खरच नक्की आठवेल आता
बी खुप सुंदर लिहिले आहेस..
सुरेख कविता! खूप आवडली. (बी,
सुरेख कविता!
खूप आवडली.
(बी, तुम्ही जिर्ण लिहिलंय ते 'जीर्ण' हवं असं वेका म्हणतायत.)
आवडली.
आवडली.
खुप मस्त लिहिलीय .. आवडली
खुप मस्त लिहिलीय ..
आवडली
वाह !
वाह !
क्या बात है बी - अतिशय सुंदर
क्या बात है बी - अतिशय सुंदर कविता ....
तू मन मारूनच लिहित जा, खूप छान लिहितोस मग... >>> येस्स...
धन्यवाद. तुम्हा सर्वांच्या
धन्यवाद.
तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रिया खूप खूप आवडल्यात. मुलाचे ते कडवे तुम्हाला आवडले हे वाचून तर फार आनंद झाला.
साती, उत्तम निरिक्षण. मला वेकाचे म्हणणे कळलेच नव्हते. आता करतो नीट.
धन्यवाद.
बी........... खूप सुंदर
बी........... खूप सुंदर लिहितोस. अगदी मनापासून.
टचिंग आहे कविता.
छान आहे कविता.
छान आहे कविता.
आवडली !
आवडली !
छान आहे !!
छान आहे !!
छान आहे कविता. खूप आवडली.
छान आहे कविता. खूप आवडली.
वर्तमान पत्रात छापून
वर्तमान पत्रात छापून येतील
इतके मोठे नसले तरी
रोज छोटे छोटे वाटणारे
अनेक अपराध आपल्याकडून घडतच असतात!!!!!>> येस्स!!
पहिलं कडवं अप्रतिमच! बाकीची कडवी खरंच विचार करायला प्रवृत्त करतात. मस्त लिहीलंस बी! असंच अस्वस्थ होत राहा, असंच अस्वस्थ करणारं संवेदनाशील लिहीत राहा!
आवडली कविता!
आवडली कविता!
वर्तमान पत्रात छापून
वर्तमान पत्रात छापून येतील
इतके मोठे नसले तरी
रोज छोटे छोटे वाटणारे
अनेक अपराध आपल्याकडून घडतच असतात!!!!...>>>बी हे मुद्दामहून लिहलेयस वाटत नाही.. सहज उमटलेली वाटतेय . छान कविता.
नेमकेपणे पोचतेय, जे सांगायचे
नेमकेपणे पोचतेय, जे सांगायचे आहे ते.
लिहिलेल्या सर्वच घटना अंतर्मुख करणाऱ्या.
एका निरागसतेने शब्द उमटलेत, कुठल्याही शाब्दिक किंवा अलंकारिक दिखाव्याशिवाय.
छान कविता बी. तुमचे लिखाण
छान कविता बी. तुमचे लिखाण बरीच वर्षे वाचत आहे. खुप वेगळे आहे, साधे सोप्पे पण महत्त्वाचे असे.
सुंदर. वेरी टचिंग.
सुंदर. वेरी टचिंग.
आवडली
आवडली
छान ..आवडली
छान ..आवडली
Pages