निसर्ग

गडद - बेधडक!!!

Submitted by Discoverसह्याद्री on 2 November, 2014 - 09:41

भामा खोऱ्यातल्या अल्पपरिचित - गडदच्या दुर्गेश्वर लेण्यांचा शोध घेतानाचा थरार...
(पूर्वप्रकाशित:: http://www.discoversahyadri.in/2014/10/BhamaGadadDurgeshwarCaves.html)

...एकापाठोपाठ एक अश्या कातळकोरीव पायऱ्या काही केल्या संपेनात...
...सरत्या पावसाचं खट्याळ पाणी अजूनही कातळकड्यावर रेंगाळलेलं, शेवाळलेलं, झिरपत राहिलेलं...

दगड, जिऑलॉजी वगैरे.

Submitted by नीधप on 1 November, 2014 - 00:21

विविध ठिकाणी सापडणारे दगड ओळखणे, वर्गीकरण करणे हे शास्त्र जिऑलॉजी (मराठी?) मधेच येते ना?
की याला काही वेगळे नाव आहे?

यासंदर्भातली बेसिक पुस्तके सुचवा.
तसेच हे दगड ओळखता यावेत यासाठी कुठला कोर्स असू शकतो का? पुणे वा मुंबईत आहे का?
यासंदर्भात पुणे/ मुंबईत कोण तज्ञ आहेत? कोण मदत करू शकेल?
पक्षीनिरीक्षणासाठी जशी बेसिक गाइडस उपलब्ध आहेत तशी दगडांसाठीही असावीत किंवा असायला हवीत ना?

विषय: 

भटक्यांचा सह्य मेळावा २०१४ - वर्ष दुसरे

Submitted by कोकण्या on 23 October, 2014 - 11:16
तारीख/वेळ: 
21 November, 2014 - 13:20 to 23 November, 2014 - 14:20
ठिकाण/पत्ता: 
शिरपुंजे/भैरवगड/भैरोबा दुर्ग व कलादगड

गेल्या वर्षीच्या यशस्वी मेळाव्या नंतर पुन्हा ह्या वर्षी गिर्यारोहकांसाठी सुवर्ण संधी.. धमाल, मस्ती, मजा,

भटक्यांचा सह्य मेळावा २०१४

मेळावा कार्यक्रम पत्रिका आणि नियोजन: ओंकार ओक (सह्याद्री मित्र )

वेळापत्रक (दिवसाप्रमाणे)

२१ नोव्हेंबर (शुक्रवार) -

  • २१ नोव्हेंबरच्या रात्री प्रत्येकाने आपआपल्या राहत्या ठिकाणावरुन राजुर कडे सुटायच..
  • ( साधारणपणे रात्री १० वाजता )

प्रांत/गाव: 

वर्षा तुझे नाव

Submitted by अनिकेत भांदककर on 8 October, 2014 - 14:33

वर्षा तुझे नाव
आकाश तुझे गाव
तुझ्या आगमनासाठी
आतुर सारा गाव

तुझ्या आगमनापूर्वी
आभाळ भरून येतात
गड गड आवाज करीत
सरी वाहू लागतात

मोत्यासारखा थेंब
जमिनीवर पडतो
काळ्या मातीत मग
सुगंध दरवळतो

बघता बघता पाऊस
जोर धरू लागतो
पिसारा फुलवून मग
मोर नाचू लागतो

सरी तुझ्या संपताच
आभाळ खुलून येतो
सोनेरी किरण पडताच
इंद्रधनुष्य दिसू लागतो

पुन्हा आभाळ भरताच
इंद्रधनुष्य नाहीसा होतो
तुझ्या आगमनासाठी सारा गाव
पुन्हा आतुर होतो.

-अनिकेत भांदककर

विषय: 

राजगड-गडांचा राजा, राजियांचा गड

Submitted by मुरारी on 8 October, 2014 - 05:00

ट्रेक ला जायचं कुठे ह्यावरून बरीच चर्चा केल्यानंतर 'राजगड' करायचा असे किसन देवांनी जाहीर केले. बरेच मेंबर गळत गळत शेवटी मी , किसन, सुड, अल्प्या आणि सिड.. एवढे उरलो.इंद्रायणी वेळेवर शिवाजीनगर पोचली.तडक रिक्षा पकडुन आमची वरात सुडच्या घरी पोहोचली.
मग सुड च्या हातचे फक्कड फवे खाल्ले, वर झकास चाय ढोसला. परत स्वारगेट ला आलो.

दुबई / अबु धाबी सहल - भाग ९ - जबेल हाफीत

Submitted by दिनेश. on 22 September, 2014 - 07:26

दुबई / अबु धाबी सहल - भाग १ http://www.maayboli.com/node/50452

दुबई / अबु धाबी सहल - भाग २ http://www.maayboli.com/node/50460

दुबई / अबु धाबी सहल - भाग ३ http://www.maayboli.com/node/50475

दुबई / अबु धाबी सहल - भाग ४ http://www.maayboli.com/node/50501

दुबई / अबु धाबी सहल - भाग ५ http://www.maayboli.com/node/50520

दुबई / अबु धाबी सहल - भाग ६ - शेख झय्यद पॅलेस म्यूझियम, अल ऐन http://www.maayboli.com/node/50789

दुबई / अबु धाबी सहल - भाग ७ - अल ऐन नॅशनल म्यूझियम ( पहिला भाग ) http://www.maayboli.com/node/50816

लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग ४

Submitted by केदार on 18 September, 2014 - 02:09

बुधी कॅम्प मध्ये सकाळचा चहा पिऊन आम्ही निघालो. सर्वच यात्री उत्साहात होते. फार तर १०० मिटर चाललो नाही की छियालेख चढाई लागते. ही एकूण चढाई ३ किमी आहे. त्या चढाईबद्दल आधी पासून ऐकले होते. तिची उंची गुगल अर्थ ११२०० फुट दाखवत आहे, पण जेंव्हा जीपीएस द्वारे मोजली तेंव्हा ती ११९०० फुट दाखवली होती.

३ जुलै बुधी ते गुंजी

एकुण अंतर १८ किमी (खरेतरे २० असावे)

बुधी १०३०० फुट
गुंजी १०५०० फुट

एलेवेशन गेन: ४४४५ फुट
एलेवेशन लॉस : ४२७६ फुट

आजचा रस्ता

Budhi To Gunji.JPG

आणि एलेवेशन

लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग ३

Submitted by केदार on 16 September, 2014 - 03:14

ॐ नमः पार्वतीपते, हर हर महादे SSSSSSव !!!

Pages

Subscribe to RSS - निसर्ग