लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग ३
ॐ नमः पार्वतीपते, हर हर महादे SSSSSSव !!!
ॐ नमः पार्वतीपते, हर हर महादे SSSSSSव !!!
२०१३ च्या निसर्ग तांडवामुळे कैलास मानसरोवर यात्रा बंद केली होती, तेंव्हा माझी बॅच ७ नं होती. एवीतेवी सुटी घेतल्यामुळे मग मी सहपरीवार लेहला जाऊन आलो. या वर्षी परत फॉर्म भरले आणि माझा नं परत लागला. अचानक एके दिवशी परागचा फोन आला. तेंव्हा मी सायकल चालवत होतो. बॅच नं ५ मध्ये परागचे सिलेक्शन झाल्याचे परागने मला सांगीतले. मग त्यालाच माझे पर्सनल डिटेल्स सांगितले आणि त्याने मला आनंदाची बातमी दिली की, त्याचे अन माझे योगायोगाने एकाच बॅच मध्ये सिलेक्शन झाले आहे !! तेंव्हा मी कुठेतरी जुन्या मुंबई पुणे हायवेवर होतो. तिथून लगेच परत निघालो नी घरी येऊन बातमी ऐकवली.
एकेक श्वास घेणे देखील नकोसे झाले होते, शरीरातील ताकद पूर्ण नाहीशी झाली होती. अजून डोल्मा पास (उंची ५६००+ मिटर्स डोल्मा हे तारा देवीचे तिबेटी नाव आहे.) यायला निदान एक किमी तरी होते. साधारण मी ५२०० मिटर्स उंची वर असेन अजून ४०० मिटर्स वर चढायचे होते ! माझे पाय पूर्ण लाकडासारखे झाले होते. एकेक पाऊल उचलायला त्रास होत होता. पण मन मात्र थांबू देत नव्हते. अजून एक किमी झाले की पुढे उतारच लागेल, चल गड्या आता चाल एक किमी, फक्त एक किमी मग उतार लागेल असे मन वारंवार सांगत होते. थांबू नकोस, चालत राहा !
गेल्या अनेक वर्षांपासून फिरण्याच्या विश लिस्टवर दोन ठिकाणं होती. एक एव्हरेस्ट बेस कँपचा ट्रेक व दुसरी कैलास-मानसरोवर यात्रा. पण दोन्हीचा खर्च बराच असल्याने नुसतेच मनातल्या मनातले मांडे होते. यावर्षी मायबोलीवर स्पार्टाकसची एव्हरेस्ट व के२ मोहिमांची लेखनमाला वाचली आणि एव्हरेस्ट बेस कँप ट्रेकच्या विचारांनी परत उचल खाल्ली. मात्र यावेळेस एव्हरेस्ट बेस कँप ट्रेकचा सिरियसली विचार सुरु केला. स्वतंत्र ट्रेकचा विचार अजिबात नव्हता आणि पुण्याच्या 'फोलिएज आऊटडोअर्स 'चं नाव ऐकून असल्याने सगळ्यात आधी त्यांच्याच वेबसाईटवर हा ट्रेक ते घेऊन जातात का ते बघितलं.