गेल्या वर्षीच्या यशस्वी मेळाव्या नंतर पुन्हा ह्या वर्षी गिर्यारोहकांसाठी सुवर्ण संधी.. धमाल, मस्ती, मजा,
भटक्यांचा सह्य मेळावा २०१४
मेळावा कार्यक्रम पत्रिका आणि नियोजन: ओंकार ओक (सह्याद्री मित्र )
वेळापत्रक (दिवसाप्रमाणे)
२१ नोव्हेंबर (शुक्रवार) -
- २१ नोव्हेंबरच्या रात्री प्रत्येकाने आपआपल्या राहत्या ठिकाणावरुन राजुर कडे सुटायच..
- भेटण्याचे ठिकाण - राजुरला पहाटे ३ वाजता
( साधारणपणे रात्री १० वाजता )
२२ नोव्हेंबर (शनिवार)
- राजुरहुन पुढे शिरपुंजे (भैरवगडाच्या पायथ्याचे गाव) गाठायच... साधारणपणे - पहाटे ४:३०
- थोडासा आराम...
- अन सकाळची न्याहरी करुन भैरवगड चढायला सुरुवात - सकाळी ७:३०
- भैरवगडाच्या माथा - सकाळी ९:३०
- गडावर भटकुन ११:३० च्या सुमारास गड उतरायला लागायच...
- पायथ्याला - दुपारी १ वाजेपर्यंत ...
- नंतर कोठाळे (भैरोबा गडाचा पायथा) कडे कुच - दुपारी २ वाजता पोहचु.
- गड चढायला जास्तीत जास्त २५ मिनिटे लागतील.
- मग जेवण अन गडावर भटकुन ४ वाजेपर्यंत गडाचा पायथा गाठायचा.
याच्यानंतर आपल्याकडे दोन पर्याय आहेत..
- कोठाळेतुन निघुन तडक पाचनईला जायच.. किंवा ..
- भंडारदरा जलाशयात डुंबुन सुर्यास्ताचा आस्वाद घेउन कलाडगडाचा पायथा गाठायचा.
भंडारदरा/पाचनईला साधारणत: साडे-पाचच्या दरम्यान पोहचु.
( वेळ आणि ट्रेकर मित्रांचा सल्ला ऐकुन योग्य पर्याय निवडण्यात येईल.)
२३ नोव्हेंबर (रविवार)
- पहाटे लवकर उठुन , नाश्ता करुन गड चढायला सुरुवात - सकाळी ७:३०
- कलाडगडाचा माथा - सकाळी ९:३०
- गड भटकुन दुपारी १२:३० च्या दरम्यान पायथा गाठायचा..
- भंडारदर्याला जेवुन आपआपल्या घराकडे सुटायच..
२०१४ या सह्यमेळाया साठी Final करयात आलेले टी शर्ट चे design खाली डकवलेले आहे.
टी शर्ट ची तपशील वार माहीती खालील प्रमाणे
- टी शर्ट ची ,किंमत प्रत्येकी २५०/- आहे.
- टी शर्ट दोन रंगात उपलब्ध आहेत.. ग्रे कॉलर (Grey Collar) आणि बॉटल ग्रीन (Bottle Green)
- टी शर्ट च्या दर्शनी भागावर योरॉक्स च्या उडीची आऊट लाईन व मागील बाजूस 'सह्यमेळावा' ही अक्षरे छापन्यात आली आहेत.
- टी शर्ट पुर्ण बाह्यांचे (full sleeves) असतील.
- टी शर्ट चा कपडा Dry Fit (Sports) या Quality मधील आहे.
- टी शर्ट चा साईज खालील प्रमाणे आहे.
- 38" (M)
- 40" (L)
- 42" (XL)
- 44" (XXL)
- 46" (XXXL)
मेळाव्या साठी संपर्क.
मुंबई
यो रॉक्स- 8652244241 / 9833212530
मनोज भावे- 9820465206
पुणे
ओंकार- 9922452931
आशिष फडणीस- 9881509108
त.टी. हा मेळावा मायबोलीवरील उत्साही भट्क्यानी फक्त मायबोलीवरील भटक्यांसाठी आयोजीत केलेला उपक्रम असून याचा कुठल्याही संस्थेशी/कंपनीशी काहीही संबंध नाही.
तुंबू भाड्याने देणे आहेत का?
तुंबू भाड्याने देणे आहेत का?
फाजील लाड केले जाणार नाहीत
फाजील लाड केले जाणार नाहीत![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
झकास..बातमी येणार येणार
झकास..बातमी येणार येणार म्हणता आलेली आहे.
नाव नोंदणी करण्याल आलेली आहे...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नेहमीचे नियम : १. आमच्या
नेहमीचे नियम :![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
१. आमच्या ग्रुपचा लिडर आमचा ग्रुपच असतो.. घेतले जाणारे निर्णय सर्वानुमते असतात.. 'पाहीजे तसेच झाले पाहीजे' अशा एकाच गोष्टीवर जास्त अडून बसत नाही..
२.प्रत्येकाने आपापल्या जबाबदारीने यावे.. पण संपूर्ण ट्रेकमध्ये 'एकमेकां साह्य करू नि पुढे जाऊ' हेच तत्व वापरतो.. मग 'कुणाच्या काँफीडन्सची बोंब लागूदे.. वा पॅच करताना कुणाची बोबडी वळूदे..' पण मदत करताना जास्त लाड केले जात नाहीत हेही तितकेच खरे..
३. प्रत्येकाने पाठीवर स्वतःच्या सॅकचे ओझे वाहण्याव्यतिरीक्त ट्रेकमध्ये लागणार्या 'ह्या ना त्या' कामात मदत करणे आवश्यक..
४. ट्रेकमध्ये मद्यपान करण्यास वा मद्यपान करून ट्रेकमध्ये येण्यास मनाई..
५. सॅकमधून केवळ स्वतःलाच पुरेल असे खाद्य आणू नये.. इतरांनाही लाभ घेता येइल असे बघावे.. खाताना "लाजायचे नाही.. मागायचे नाही" हे तत्व लक्षात ठेवावे नि सरळ हात मारावा.. नाहीतर उपाशी राहील्यास तुम्हीच जबाबदार !
६. ग्रुपमध्ये चालताबोलता 'हा ग्रुपमध्ये नविन आहे वा जुना आहे' अशा ओळखीची तमा बाळगत नाही..
७. नाक मुरडायची, कपाळ्यावर आट्या पाडण्याची सवय असेल तर आमच्याबरोबर नाही आलात तर उत्तम !
८. ट्रेकसाठी अत्यावश्यक वस्तू सोडल्या तर बाकी दिलेल्या यादीप्रमाणे सर्व सामान/वस्तू आणायचा प्रयत्न करावा.. यादीव्यतिरीक्त अतिरिक्त सामान घेउन येत असाल तर सोबत गडी घेउन यावा..
९. ग्रुपसाठी आणलेले सामान वगैरे प्रत्येकाच्या पाठीवर थोडाफार अतिरीक्त भार टाकून आनंदाने विभागण्यात येइल..
१०. ट्रेकमध्ये कुठल्याही प्रकारचा कचरा होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी..
११. ट्रेक मध्ये चालताना मागे राहिल्यास तसेच मागच्या मागे घरी निघुन जावे.. उगीच मोठ्याने येओ येओ करुन जंगलातील पशु-पक्षांना त्रास देऊ नये
१२. फोटोसेशनमध्ये एक तरी उडी घेणे आवश्यक..
१३. घरापासून ते भेटण्याच्या ठिकाणापर्यंतचा खर्च सोडला तर ट्रेकमध्ये बाकी होणारा सर्व खर्च सर्वांमध्ये विभागला जाईल. कुणालाही 'फुकटात खाण्यास' संधी दिली जात नाही..
१३. वरिल नियमांस पात्र असल्यास येण्याची तसदी घ्यावी अन्यथा नाही.. बाकी नियम ट्रेकमध्ये आल्यावर कळतीलच..
जब्बरदस्त !!!! मी येणार आहे
जब्बरदस्त !!!! मी येणार आहे !!! ठिकाणं काय अप्रतिम निवडली आहेत आणि प्लॅनिंग सुद्धा अगदी काटेकोर आहे !!! माझं नाव प्लीज लिहून ठेवा !!!
ज्यांनी मागच्या वर्षाचा मेळावा चुकवला त्यांनी ह्या वर्षी चुकवू नका. वर्षभर ज्यांचे उत्तमोत्तम लेख आपण मायबोलीवर वाचतो त्या आपल्या लाडक्या गिर्यारोहक मित्रांना एकत्र भेटायची ही वर्षभरातील एकमेव संधी आहे. महिनाभर आधी कल्पना देऊन ठेवली आहे. त्या वीकेंडला आपापली कामं बाजूला ठेवा आणि स्वत:च अनुभवा…सह्यमेळावा म्हणजे काय धुव्वा चीज आहे ते !!!
मला एक कळत नाहीये ....
मला एक कळत नाहीये .... कोकण्या येणार आहे का नुसताच तिकडुन आपल्याला हाकलतोय ....?
कोकण्याच काष्टशिल्प येणार
कोकण्याच काष्टशिल्प येणार आहे.
यो..![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
गड चढणे कितपत अवघड आहे?
गड चढणे कितपत अवघड आहे? त्यानुसार काय करावे ह्याचा निर्णय घेता येईल..
यो नियम भन्नाट आहेत :) पण
यो नियम भन्नाट आहेत
पण हेही तितकेच खरे की एकत्र ट्रेक करण्यात आणी ट्रेकचा आनंद एकत्र घेण्यात वेगळीच मजा असते.
हिम्सकुल - दोन्ही ठिकाणे फार मोठ्या चढाईची नसावीत (नाहीतर आयोजकांनी निवडलीच नसती
)
हिम्या सिंहगडापेक्षा कमीच
हिम्या सिंहगडापेक्षा कमीच आहेत... नोंदणी कर...
यो, नोंदणी १ ते ४ बंद राहील
यो,
नोंदणी १ ते ४ बंद राहील हेही टाकुन दे नियमामध्ये![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोटोतले सगळे प्राणी एकत्र
फोटोतले सगळे प्राणी एकत्र बघायची संधी होती... पण![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
ये मी पण येवु का??
ये मी पण येवु का??
नियम क्र ११
नियम क्र ११![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
२१ नोव्हेंबर ऐवजी २१ डिसेंबर
२१ नोव्हेंबर ऐवजी २१ डिसेंबर जमवता आले असते... मज्जा करा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ह्या ट्रेक दरम्यान मंगळगंगा
ह्या ट्रेक दरम्यान मंगळगंगा नदी पार करावी लागेल ना?
गेल्या वर्षीच्या ट्रेक दरम्यान पार केलेल्या नदीचे नाव विसरलो.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
गोटी नदी
गोटी नदी![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
इंद्रा :)
इंद्रा
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सध्या मी इतकेच लिहु
सध्या मी इतकेच लिहु इच्छितो.....
२१-२३ नोव्हेंबर तारीख ठरविणार्यांचा जाहिर णिषेढ!!!!!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
विन्या, सेम पिंच
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गोटी नदी>>>>> इंद्रा![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
जिप्स्या आपण २१-२३ डिसेंबरला
जिप्स्या आपण २१-२३ डिसेंबरला जाउया हा.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
इंद्रा...
इंद्रा...![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
नोन्दणी कधी पर्यन्त करता
नोन्दणी कधी पर्यन्त करता येइल? बरेच दिवस ट्रेकला गेलो नाहिये.कसलेला ट्रेकर नाहीये पण यायची इच्छा आहे.
अनुभवीनी मार्गदर्शन करावे
@ जम्बो व इतर इच्छुक
@ जम्बो व इतर इच्छुक मायबोलीकर
मेळाव्यात समावेश केलेले किल्ले फार अवघड नाहीत पण अगदीच टिल्लू पण नाहीत. पण ह्या मेळाव्याचं मुख्य उद्दिष्ट किल्ले बघणं नसून एकत्र भेटून कल्ला करणं हे आहे. कार्यक्रमातील किल्ल्यांपैकी भैरोबा दुर्ग हा फक्त २० मिनिटांच्या चढाईचा असून भैरवगड व कलाडगड ह्याला सुमारे दीड - दोन तास लागतात. त्यामुळे कोथळे गावचा भैरोबा दुर्ग कोणालाही सहज शक्य आहे. आपला मुक्काम कलाडगड पायथ्याला असल्याने तसाही काही प्रश्न नाहीये.
त्यामुळे एखादा किल्ला चढताना तुम्हाला त्रास होऊ लागल्यास स्वत:च्या जबाबदारी वर तुम्हाला गावात परतता येईल किंवा असाल तिथेच आम्ही परत येईपर्यंत बसता येईल. फक्त तुम्ही येणार आहात की नाही हे १५ नोव्हेंबर पर्यंत वर दिलेल्या नंबर्स वर कळवावे कारण माणसांच्या संख्येप्रमाणे पुढील तयारी करायची आहे.
सर्वप्रथम मेळाव्याचा धागा
सर्वप्रथम मेळाव्याचा धागा काढल्याबद्दल कोकण्या यांचे अभिनंदन आणि माहीती इंग्रजीमध्ये दिल्याबद्दल तातडीने निषेधही.
आणि ते सह्यादीमित्र कर पाहू पहिले...दातात खडा यावा असे वाटत आहे.
बाकी, दगडूचे नियम जगात भारी :प
मज्जाच .. मजा...
मज्जाच .. मजा...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भिडे चँपा.. निषेध
भिडे![lol.gif](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u303/lol.gif)
चँपा.. निषेध मान्य..योग्य बदल केलाय..
मला या सह्यमेळाव्यात भाग
मला या सह्यमेळाव्यात भाग घ्यायचा आहे.
किश्या , गोडबोले आणि
किश्या , गोडबोले आणि मराठवाड्याबद्दल चर्चा करणारे रावबहाद्दुर यांनाही घेउन या रे ...
फार मोठी चर्चा करायची आहे ...![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
जिप्स्या आणि गिरी ... काय ही
जिप्स्या आणि गिरी ... काय ही तुमची घारुगिरी आहे रे च्यायला ....
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मज्जा करा लोक्स डिस्क्याने
मज्जा करा लोक्स![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
डिस्क्याने यावेळेसही क्रिमरोल्स आणले तर माझ्या नावाने दोन क्रिमरोल्स आणि मनोजच्या (स्वच्छंदी) हातचा कपभर चहा बाजुला काढुन ठेवा रे![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सेन्या, आपण २१-२३ डिसेंबरला श्रीखंड/आम्रखंड घेऊन जाऊया रे.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
घारुगिरी>>>>>>विन्या![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
Pages