भटक्यांचा सह्य मेळावा २०१४ - वर्ष दुसरे

Submitted by कोकण्या on 23 October, 2014 - 11:16
ठिकाण/पत्ता: 
शिरपुंजे/भैरवगड/भैरोबा दुर्ग व कलादगड

गेल्या वर्षीच्या यशस्वी मेळाव्या नंतर पुन्हा ह्या वर्षी गिर्यारोहकांसाठी सुवर्ण संधी.. धमाल, मस्ती, मजा,

भटक्यांचा सह्य मेळावा २०१४

मेळावा कार्यक्रम पत्रिका आणि नियोजन: ओंकार ओक (सह्याद्री मित्र )

वेळापत्रक (दिवसाप्रमाणे)

२१ नोव्हेंबर (शुक्रवार) -

  • २१ नोव्हेंबरच्या रात्री प्रत्येकाने आपआपल्या राहत्या ठिकाणावरुन राजुर कडे सुटायच..
  • ( साधारणपणे रात्री १० वाजता )

  • भेटण्याचे ठिकाण - राजुरला पहाटे ३ वाजता

२२ नोव्हेंबर (शनिवार)

  • राजुरहुन पुढे शिरपुंजे (भैरवगडाच्या पायथ्याचे गाव) गाठायच... साधारणपणे - पहाटे ४:३०
  • थोडासा आराम...
  • अन सकाळची न्याहरी करुन भैरवगड चढायला सुरुवात - सकाळी ७:३०
  • भैरवगडाच्या माथा - सकाळी ९:३०
  • गडावर भटकुन ११:३० च्या सुमारास गड उतरायला लागायच...
  • पायथ्याला - दुपारी १ वाजेपर्यंत ...
  • नंतर कोठाळे (भैरोबा गडाचा पायथा) कडे कुच - दुपारी २ वाजता पोहचु.
  • गड चढायला जास्तीत जास्त २५ मिनिटे लागतील.
  • मग जेवण अन गडावर भटकुन ४ वाजेपर्यंत गडाचा पायथा गाठायचा.

याच्यानंतर आपल्याकडे दोन पर्याय आहेत..

  • कोठाळेतुन निघुन तडक पाचनईला जायच.. किंवा ..
  • भंडारदरा जलाशयात डुंबुन सुर्यास्ताचा आस्वाद घेउन कलाडगडाचा पायथा गाठायचा.
  • भंडारदरा/पाचनईला साधारणत: साडे-पाचच्या दरम्यान पोहचु.
    ( वेळ आणि ट्रेकर मित्रांचा सल्ला ऐकुन योग्य पर्याय निवडण्यात येईल.)

२३ नोव्हेंबर (रविवार)

  • पहाटे लवकर उठुन , नाश्ता करुन गड चढायला सुरुवात - सकाळी ७:३०
  • कलाडगडाचा माथा - सकाळी ९:३०
  • गड भटकुन दुपारी १२:३० च्या दरम्यान पायथा गाठायचा..
  • भंडारदर्‍याला जेवुन आपआपल्या घराकडे सुटायच..

२०१४ या सह्यमेळाया साठी Final करयात आलेले टी शर्ट चे design खाली डकवलेले आहे.

टी शर्ट ची तपशील वार माहीती खालील प्रमाणे

  1. टी शर्ट ची ,किंमत प्रत्येकी २५०/- आहे.
  2. टी शर्ट दोन रंगात उपलब्ध आहेत.. ग्रे कॉलर (Grey Collar) आणि बॉटल ग्रीन (Bottle Green)
  3. टी शर्ट च्या दर्शनी भागावर योरॉक्स च्या उडीची आऊट लाईन व मागील बाजूस 'सह्यमेळावा' ही अक्षरे छापन्यात आली आहेत.
  4. टी शर्ट पुर्ण बाह्यांचे (full sleeves) असतील.
  5. टी शर्ट चा कपडा Dry Fit (Sports) या Quality मधील आहे.
  6. टी शर्ट चा साईज खालील प्रमाणे आहे.
  • 38" (M)
  • 40" (L)
  • 42" (XL)
  • 44" (XXL)
  • 46" (XXXL)
  • टी शर्ट ची लांबी Sports Category नुसार म्हणजेच कमरे पर्यंतच असेल.
  • टी शर्ट साठी इंद्रा कडे संपर्क साधावा. इंद्रा- draj598@gmail.com
  • IMG-20140726-WA0015.jpgIMG-20140726-WA0011.jpgमेळाव्या साठी संपर्क.
    मुंबई
    यो रॉक्स- 8652244241 / 9833212530
    मनोज भावे- 9820465206

    पुणे
    ओंकार- 9922452931
    आशिष फडणीस- 9881509108

    IMG_6133.jpg

    त.टी. हा मेळावा मायबोलीवरील उत्साही भट्क्यानी फक्त मायबोलीवरील भटक्यांसाठी आयोजीत केलेला उपक्रम असून याचा कुठल्याही संस्थेशी/कंपनीशी काहीही संबंध नाही.

    प्रांत/गाव: 
    तारीख/वेळ: 
    शुक्रवार, November 21, 2014 - 13:20 to रविवार, November 23, 2014 - 14:20
    Group content visibility: 
    Public - accessible to all site users

    सनीताई,

    >> हे मात्र बरोबर.. प्रत्येकाने आपापल्या मापाच्या घेवुन या.

    पुरूषांना उन्हाचा तितकासा त्रास होत नाही. मात्र बायकांची गोष्ट वेगळी. प्रकृती जरा नाजूक असते. म्हणून तुम्हीच तुमच्या मापाच्या हव्या तेव्हढ्या टोप्या घेऊन या नं!

    आ.न.,
    -गा.पै.

    रच्याकने : तुमचं नाव दिसलं नाही सहभागींच्या यादीत.

    आयोजक,
    या सह्यमेळव्यासाठी मी, माझा मूलगा अनिरुद्ध (वय-५.७ वर्ष) आणि माझा मित्र कुशल देशमुख असे तिघेजन सहभागी होणार आहोत.
    माझ्या मुलाच्या वयाची काळजी करू नये. त्याची संपूर्ण जबाबदारी माझी असेल. यंदाच्या मोसमात त्याने ८ ते ९ किल्ल्यांवर भटकंती केलेली आहे.

    मेळाव्यासाठी आणायच्या गोष्टींच्या यादीमध्ये खालील गोष्टी सुद्धा आणायच्या आहेत

    शनिवार दुपारचा जेवणाचा डबा

    १. जेवणासाठी थाळी / ताट (शक्यतो स्टीलचे ताट आणण्याचा प्रयत्न करावा. प्लास्टिकचे ताट अनेकदा प्रवासादरम्यान तुटून जाते)
    २. छोटी प्लेट (पोहे / रस्सा) ह्यासाठी
    ३. एक चमचा
    ४. चहासाठी कप (हा कप कृपया प्लास्टिकचा (फायबर) घेऊन यावा. आपण कचरा करणे टाळत असल्याने थर्माकोल किंवा प्लास्टिकचा (चहावाले जशा कपात चहा देतात तसा) कप आणू नये. तसेच चिनी मातीचा कप सुद्धा टाळावा. पाणी पिण्याचा स्टीलचा ग्लास आणला तरी चालेल).

    सिद,

    कुशल देशमुख हे माय बोली चे सभासद आहेत का? ते असणे फार महत्वाचे आहे. नसेल तर त्यांना मायबोली चे सभासद व्हायला सांगा.

    आपले चीरंजीव आलेत तर स्वागत आणि कौतुकही .आपण स्वतः एक प्रोफेशनल ट्रेकर्स आहात तसेच आयोजकांमधेही सर्व प्रोफेशनल ट्रेकर्स आहेत आणि त्यांचीही अल्पवयीन मुले त्यांच्यासोबत कायम ट्रेकींगला जातात त्यामुळे तुमच्या चीरंजीवांमुळे कोणालाही त्रास कीवा प्रोब्लेम होण्याचा काहीही संबध नाही. आणि तसेच आम्हाला आपल्या चीरंजीवांच्या कुवतीवरही तीळमात्र शंका नाही, पण जर शक्य असेल तर न आणलेले बरे. कारण ह्या मेळाव्याचे उद्दीष्ट हे ट्रेकींग हेच नसुन मायबोलीवरील भटके आपआपल्या ग्रुप सोबत कायमच भटकायला जातात आणि इथे सुंदर सुंदर लेख लिहितात. या सर्व भट्क्याना एकत्र आणुन त्यांच्याशी मुक्त पणे संवाद आणि मजा करने हा आहे.

    तुम्ही ओंकार ओक/आशिष फडणीस या पुण्यातील आयोजकांशी संपर्क साधा त्यांचे भ्रमण ध्वनी क्रमांक वरती दीलेले आहेत

    manapurvak shubheccha...
    Kalji ghya sarvani... Happy

    शनिवारी २२ला मस्तपैकी अमावस्या आहे रे. आकाश निरभ्र असेल तर स्टार ट्रेल/गॅलेक्सी शूट करता येईल. ट्रायपॉड घेऊन जा. Happy
    आणि हो सोबत टॉर्च (विजेरी) एक्स्ट्रा घेऊन जा. (अर्थात हे सांगण्याची गरज नाही, तरी सुद्धा......;-))

    रायबागान, तुम्ही सह्भागी होणार असाल तर होवु शकता अजुनही काही स्त्री सद्स्य आहेत ज्या सहभागी होण्यास उत्सुक आहेत त्यामुळे तुम्ही पण लवकरच कंफर्म कराल तर उत्तम. कारण तुम्ही येणार असाल तर आम्ही इतरही स्त्री सदश्याना कंफर्म सांगु शकु.

    जागल्या, आपण सहभागी होणार त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. आपण जर आपला भ्रमण ध्वनी क्रमांक संपर्कातुन द्याल किंवा वरील आयोजकांपैकी कोनालातरी संपर्क कराल अशी आशा करतो. जर तुम्ही १/२ दीवसात संपर्क करु शकलात नाही तर तुमचा सहभाग नाकारण्यात येयिल याची क्रुपया नोंद घ्यावी.

    .

    कुठे आणुन ठेवलाय हा धागा
    वर घ्या रे या यांना ....
    इंद्रा... कुठे आणुन ठेवलेस रे आमचे टि शर्ट
    लवकर पाठव रे ...

    मनोजने टि शर्ट ताब्यात घेतले आहेत.

    मेळाव्याला न येणार्‍यांनी टिशर्ट लवकारात लवकर घेऊन जाण्याची कृपा करावी.

    मेळाव्याला न येणार्‍यांनी टिशर्ट लवकारात लवकर घेऊन जाण्याची कृपा करावी.>>>>>>कुठे? कधी? केंव्हा? कसे?

    सन्योजक आणि इतर मित्रमन्डळी सर्वाचे आभार खुप मजा आली . मला बरेच दिवस कलाद्ड्गड करावयाचा होता पण जमला नाही .मल्ली सुन्या खाल पर्यान्त आले.. बरे वाट्ले.

    "फजिल लाड चालणार नाहीत" असे नि़क्षुन सांगत सगळ्या "फाजिल भटक्यांचे" सगळे लाड फाजिलपणे पुरवणार्या "फाजिल भटक्यां संयोजकांचे" हार्दिक अभिनंदन......
    ओंकार असे छान नाव ओंड्क्या इतके ओबड्धोबड पणे म्ह्णुन ही... मख्खपणे न वावरता सगळ्यानां सांभाळुन वेळेत परत "पोहोचवल्या बद्दल" आभार...
    आज्च्या दिवसची वेठबिगारी झाली कि अधिक वृतांत टाकतो.....

    एक सुपरफास्ट वृत्तांत...

    एकूण उपस्थिती - २१ फुल १ हाफ,, टांगारु संख्या - अगणित..

    २१ नोव्हेंबर
    रात्रौ. ११:५५ मिनिटांनी पुण्यातील राजाराम पुलावरून आप्पांच्या ड्रायव्हगिरी बरोबर प्रवासास सुरुवात..
    पवन, जम्बो, आशुचॅम्प, ओंकार आणि मी गाडीत स्थानापन्न.
    गोलगोल फिरत कोथरुडमधून श्रेयस उर्फ राकुला गाडीत जागा मिळाली.. तिथून बालेवाडी फाट्यावर केडीचे आगमन, परत एकदा गोल गोल फिरत डांगे चौकातून सुन्या आंबोलकर दाखल, डायरेक्ट नाशिक फाट्यावर मल्ली, सिड आणि छोटा अनिरुद्ध गाडीत दाखल..
    गप्पाटप्पा मारत प्रवासास सुरुवात.

    २२ नोव्हेंबर
    ०२:४५ वाजता आळेफाटा ओतूर मार्गावर चालू असलेल्या एकमेव टपरीवर मस्त चहा..
    ०३:४५ च्या सुमारास राजूरला पुणेकर मुंबईकरांची गळाभेट आणि पुढे प्रस्थान.
    ०६:२० ला शिरपुंजे गावात दाखल आणि पोहे, चहा असा भरपेट नाष्टा.
    ०८:०० वा शिरपुंज्याचा भैरवगड चढायला सुरुवात.
    ०९:३० वाजता सगळे जण गडावर दाखल. तिथे सगळ्यांची ओळखपरेड.. सर्वानुमते ओंकार सह्यमेळाव्याचे मुख्यमंत्री तर अनिरुद्ध उपमुख्यमंत्री..
    ११:०० वाजता गड उतरुन खाली आणि तिथे एक धमाल ग्रुप फोटो. व पुढे कोठाळ्याच्या भैरव गडाकडे प्रयाण. वाटेत रस्ता खचल्याचे कळाल्यामुळे उशीर होणार असे वाटत असताना परत एकदा योग्य चौकशीमुळे पर्यायी रस्त्याची माहिती कळाली आणि गाडे वेळेवरच आहे ह्याची खात्री झाली.
    १३:३० वाजता भैरव गड चढायला सुरुवात. खालून बघितल्यावर जरा धाकधूक वाटली. पण वाटेतला रस्ता अप्रतिम झाडीतला आणि सावलीतला. कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसरातील असल्यामुळे सुरेख झाडी.. तसेच वनखात्यातर्फे व्यवस्थित सोयी.
    १४:४५ वाजता सगळेजण १५, ४० आणि १० पायर्‍यांच्या शिड्या चढून गडावर दाखल.. आणि वर पोहोचता पोहोचता खाली हेमची चाहूल.. पुढील पाच मिनिटांत हेम आणि राहुल ह्यांची भेट.
    १५:३० वाजता खाली उतरुन लव्हाळी गावाकडे जेवणासाठी प्रयाण.लव्हाळी गावात मस्त पोटभर जेवण. आणि जवळच्याच बंधार्‍यावर काही उत्साही लोकांची डुंबा डुंबी.
    १८:१५ वाजता पाचनई गावाकडे आगेकूच.. वाटेत कलाडगडाच्या पार्श्वभूमीवर सूर्यास्ताचा सुंदर नजारा.
    १९:३० वाजता पाचनई गावात दाखल आणि तिथे दंगा चालू.. तिथेच सूनटुन्याचे आगमन. घारु आणि केडी तर्फे शेकोटी पेटवण्याचा कार्यक्रम, हे चालू असतानाच इंद्रा, यो ह्यांचे सूप बनवण्याचे प्लॅन यशस्वी, तोपर्यंत हेम, सूनटुन्या, राहुल ह्यांचे त्यांच्या क्षेत्रातील अनुभवांचे कथन आणि त्याच बरोबर मध्ये मध्ये मुख्यमंत्री ओंडक्याची किल्लेपिडीयाची माहिती.
    २१:०० वाजता फर्मास मटकी उसळ आणि भाताचे भरपेट जेवण, बरोबर मल्लीने आणलेल्या फरसाणमुळे जबरी मिसळ. जेवण झाल्यावर परत एकदा गप्पांचा फड आणि त्यात ओंक्याचे बाजावादन..
    २३:३० च्या सुमारास झोपाख्यान. जाताना मुख्यमंत्र्यांकडून दुसर्‍या दिवशीच्या कार्यक्रमाची घोषणा.

    २३ नोव्हेंबर
    सकाळी ८:३० च्या सुमारास कलाडगडकेडे प्रयाण
    ९:०० वाजता गड चढायला सुरुवात. अचानक खडा चढ समोर... दिसायला उंची फार जरी वाटत नसली तरी चढ असल्याने दमछाक.
    १०:०० च्या सुमारास गडावर दाखल.. तिथे नेहमीचा यशस्वी उड्यामारी कार्यक्रम करुन गड उतरायला सुरुवात.
    १२:०० वाजता गड उतरून पुढे डुंबाडुंबी कार्यक्रमाला जायची तयारी करत असतानाच मनोजची गाडी पंक्चर.. टायर बदलून पुढे प्रयाण.. एका मस्त डोहात सगळ्यांची डुंबाडुंबी.
    १३:३० च्या सुमारास पुणेकर आणि मुंबईकरांची ताटातूट.. शाश्रूनयनांनी गळाभेटी घेत एकमेकांना परत पुढच्या सह्यमेळाव्यात नक्की भेटायचे ठरवून निरोप.
    १४:०० वाजता परत एकदा पाचनई गावात जेवणासाठी प्रवेश.. केडीच्या कुशल पाककौशल्यकलेने फर्मास गावरान कोंबडीचे भरपेट जेवण
    १६:०० वाजता पाचनई गावातून पुण्याकडे प्रयाण.
    २३:०० वाजता मजल दर मजल करत पुणे मुक्कामी परत.

    एक जबरी ट्रेक (साह्यमेळावा) झाला.

    मायबोली वरील दर्दी ट्रेकर साठी तेवढेच दर्दी (ह्टके) किल्ले साह्यमेळाव्यासाठी निवडल्या बद्द्ल संयोजकांचे हार्दिक अभिनंदन......

    >>> हो त्या लहान मुलाने तिन्ही किल्ले सर केले... अगदि सर्वात पुढे राहुन...

    साह्य मेळाव्यात खरी जान तर त्या छोट्याने (अनिरुद्ध) आणली...)

    सन २०१४ मध्ये त्या छोट्या मावळ्याने(वय वर्षे ५ फक्त) तब्बल १४ किल्ले सर केले आहेत... मायबोली वरिल सुनिल यांचा तो मुलगा ...त्याच्या वयाचे १० वर्षे पुर्ण होइपर्यन्त त्याला १०० किल्ले सर करायचे आहेत...

    नविन जनरेशन मध्ये मोबाइल,संगणक याबद्द्ल वाढलेली क्रेझ ....लहान मुले तासनतास त्याच्यावर गेम खेळत
    बसतात ...
    कितीही वाईट परिस्थीती... अश्या या युगात प्रत्येक लहान मुलाला सुनिल सारखा बाप मिळावा....

    नाशिकच्या धोडप किल्ल्यावर होणारा १५ ऑगस्ट २०१४चा होणारा सह्यमेळावा बर्‍याच कारणांमुळे पुढे ढकलण्यात आल्यावर मावळ्यान मधे थोडी नाराजी पसरली. मायबोली वरिल अट्टल भटक्यांसोबत ट्रेक करण्यास सगळेच उत्सुक होते. पण सगळ्या भटक्यांचा तारखांचा मेळ बसत नव्हता. ज्यांना मेळाव्याला येणं अशक्य होतं त्यांना सहानभुती दाखल शाब्दिक लाखोली वाहुन झाली. सरतेशेवटी नवनिर्वाचीत मुख्यमंत्री ओंकार फडणविस यांनी परगावी रहाणार्‍या लोकांचा पाठिंबा मिळवत २२-२३ नोव्हेंबर २०१४ हा सह्यमेळाव्याचा मुहुर्त निश्चित केला. मुंबई संयोजनाची धुरा मनोज आणि योरॉक्सने यांनी लिलया पार पाडली.. तर पुण्याचे संयोजन आशुचँम्प आणि खुद्द मुख्यमंत्र्यानी केलं.

    मेळाव्यासाठी भटक्यांचा टिशर्ट करण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले. या टिशर्ट वर मायबोलीकर भटक्यांची छाप असावी म्हणुन योरॉक्सची उडी मेळाव्याचा लोगो म्हणुन दर्शनी भागावर छापण्याचे निश्चित करण्यात आले. टिशर्टचा पॅटर्न बनवण्याच काम पद्मजा जोशी यांनी पार पाडलं.. तर टिशर्टच्या मागिल बाजुस 'सह्यमेळावा' चे सुलेखन कसे असावे... ते हेम यांनी चितारुन दिलेल्या इमेज वरुन नीलुने हुबेहुब तसेच सुलेखन तयार करुन दिले. आपआपल्या व्यस्त वेळात वेळ काढुन केवळ मायबोलीकरांच्या सह्यमेळाव्याला मदत करण्यार्‍या या हातांना सलाम! (ट्रेकच्या नियमानुसार आपल्या लोकांचे आम्ही आभार मानत नाही Proud )

    या मेळाव्याची धमाल येणार्‍या वृत्तांता मधुन तुम्ही वाचालचं... पण एक गोष्ट नमुद कराविशी वाटते ती म्ह्णजे... जुलै मधे रद्द झालेला मेळावा नोव्हेंबर मधे तेव्हढ्याच उत्साह पार पाडुन 'हाती घ्याल ते तडीस न्याल' ही म्हण मायबोलीकरांनी पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखविली.

    IMG_3327.JPG

    Pages