गेल्या वर्षीच्या यशस्वी मेळाव्या नंतर पुन्हा ह्या वर्षी गिर्यारोहकांसाठी सुवर्ण संधी.. धमाल, मस्ती, मजा,
भटक्यांचा सह्य मेळावा २०१४
मेळावा कार्यक्रम पत्रिका आणि नियोजन: ओंकार ओक (सह्याद्री मित्र )
वेळापत्रक (दिवसाप्रमाणे)
२१ नोव्हेंबर (शुक्रवार) -
- २१ नोव्हेंबरच्या रात्री प्रत्येकाने आपआपल्या राहत्या ठिकाणावरुन राजुर कडे सुटायच..
- भेटण्याचे ठिकाण - राजुरला पहाटे ३ वाजता
( साधारणपणे रात्री १० वाजता )
२२ नोव्हेंबर (शनिवार)
- राजुरहुन पुढे शिरपुंजे (भैरवगडाच्या पायथ्याचे गाव) गाठायच... साधारणपणे - पहाटे ४:३०
- थोडासा आराम...
- अन सकाळची न्याहरी करुन भैरवगड चढायला सुरुवात - सकाळी ७:३०
- भैरवगडाच्या माथा - सकाळी ९:३०
- गडावर भटकुन ११:३० च्या सुमारास गड उतरायला लागायच...
- पायथ्याला - दुपारी १ वाजेपर्यंत ...
- नंतर कोठाळे (भैरोबा गडाचा पायथा) कडे कुच - दुपारी २ वाजता पोहचु.
- गड चढायला जास्तीत जास्त २५ मिनिटे लागतील.
- मग जेवण अन गडावर भटकुन ४ वाजेपर्यंत गडाचा पायथा गाठायचा.
याच्यानंतर आपल्याकडे दोन पर्याय आहेत..
- कोठाळेतुन निघुन तडक पाचनईला जायच.. किंवा ..
- भंडारदरा जलाशयात डुंबुन सुर्यास्ताचा आस्वाद घेउन कलाडगडाचा पायथा गाठायचा.
भंडारदरा/पाचनईला साधारणत: साडे-पाचच्या दरम्यान पोहचु.
( वेळ आणि ट्रेकर मित्रांचा सल्ला ऐकुन योग्य पर्याय निवडण्यात येईल.)
२३ नोव्हेंबर (रविवार)
- पहाटे लवकर उठुन , नाश्ता करुन गड चढायला सुरुवात - सकाळी ७:३०
- कलाडगडाचा माथा - सकाळी ९:३०
- गड भटकुन दुपारी १२:३० च्या दरम्यान पायथा गाठायचा..
- भंडारदर्याला जेवुन आपआपल्या घराकडे सुटायच..
२०१४ या सह्यमेळाया साठी Final करयात आलेले टी शर्ट चे design खाली डकवलेले आहे.
टी शर्ट ची तपशील वार माहीती खालील प्रमाणे
- टी शर्ट ची ,किंमत प्रत्येकी २५०/- आहे.
- टी शर्ट दोन रंगात उपलब्ध आहेत.. ग्रे कॉलर (Grey Collar) आणि बॉटल ग्रीन (Bottle Green)
- टी शर्ट च्या दर्शनी भागावर योरॉक्स च्या उडीची आऊट लाईन व मागील बाजूस 'सह्यमेळावा' ही अक्षरे छापन्यात आली आहेत.
- टी शर्ट पुर्ण बाह्यांचे (full sleeves) असतील.
- टी शर्ट चा कपडा Dry Fit (Sports) या Quality मधील आहे.
- टी शर्ट चा साईज खालील प्रमाणे आहे.
- 38" (M)
- 40" (L)
- 42" (XL)
- 44" (XXL)
- 46" (XXXL)
मेळाव्या साठी संपर्क.
मुंबई
यो रॉक्स- 8652244241 / 9833212530
मनोज भावे- 9820465206
पुणे
ओंकार- 9922452931
आशिष फडणीस- 9881509108
त.टी. हा मेळावा मायबोलीवरील उत्साही भट्क्यानी फक्त मायबोलीवरील भटक्यांसाठी आयोजीत केलेला उपक्रम असून याचा कुठल्याही संस्थेशी/कंपनीशी काहीही संबंध नाही.
पण जिप्स्या तुला का नही जमणार
पण जिप्स्या तुला का नही जमणार रे ?
आयोजक संयोजक ... जरा सगळ्यांना जमेल अशी तारीख धरा की ... काय हे तुमच?? ....आपल टिपिकल मायबोलीकरासारख ...
अरे विन्या, जिप्स्या,
अरे विन्या, जिप्स्या, आयोजकांना तारिख बदलायला भाग पाडा...
डिसेंबर करा राव. सालाबादप्रमाणे सर्वांना माझ्याकडून श्रीखंड/आम्रखंड मिळेल.
तारीख बदलू रे एकवेळ ...पण तुझ
तारीख बदलू रे एकवेळ ...पण तुझ श्रीखंड आवर ...:फिदी:
बाई माणुस नाही का रे? मला
बाई माणुस नाही का रे? मला यायचे आहे
तारीख बदलू रे एकवेळ ...पण तुझ
तारीख बदलू रे एकवेळ ...पण तुझ श्रीखंड आवर ...>>>>>:हहगलो:
रायबाघन व इतर इच्छुक मायबोली
रायबाघन व इतर इच्छुक मायबोली महिलावर्ग
सह्यमेळाव्यासाठी ज्या महिला मायबोलीकरांना यायची इच्छा आहे त्यांनी १५ नोव्हेंबरपर्यंत आपापली नावं प्रतिक्रियेमध्ये देऊन आपली उपस्थिती नोंदवावी जेणेकरून इतर इच्छुक महिला मायबोलीकरांना मेळाव्यातील महिलांच्या एकूण उपस्थितीची कल्पना येईल. आपण ज्या शहरातील असाल त्या शहरातील वर नंबर्स दिलेल्या प्रतिनिधींशी बोलून आपल्याला अधिक माहिती उपलब्ध होईल. महिलांनी १५ नोव्हेंबर पर्यंत जमा होणारी संख्या बघून आपल्या उपस्थितीबाबत निर्णय घ्यावा व आपला निर्णय झाल्यावर वर दिलेल्या नंबर्सपैकी आपापल्या शहरांप्रमाणे असलेल्या प्रतिनिधींशी बोलून आपली नावनोंदणी करावी
ह्या मेळाव्याला येणारा प्रत्येक जण स्वत:च्या जबाबदारीवर येणार आहे. अर्थात जिथे आवश्यक तिथे मदत निश्चितच केली जाईल. परंतु मेळावा संयोजक किंवा सहभागी कोणतीही व्यक्ती आपली वैयक्तिक जबाबदारी घेणार नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी.
मेळाव्यातील किल्ल्यांबाबत काहीच माहिती नसलेल्यांसाठीच्या व मेळाव्याबद्दल इतर महत्वाच्या सूचना
१. हा सह्यमेळावा आहे…वर्षाविहार नाही. त्यामुळे ट्रेकिंगचा थोडाफार तरी पूर्वानुभव आवश्यक आहे.
२. ह्यासाठी वयाची तशी अट नाही. पण ज्यांना आपल्याबरोबर मुलांना घेऊन यायचं आहे त्यांनी मुलांना आपापल्या जबाबदारीवर घेऊन यावे. मेळाव्यासाठीची किमान वयोमर्यादा ८ वर्षे असून त्याखालील कोणताही बालसदस्य घेतला जाणार नाही.
३. शिरपुंजे भैरवगड व कलाडगड हे साधारण कर्नाळा,राजगड,सुधागड ह्या सासारखे किल्ले आहेत. अगदी अवघडही नाहीत आणि अगदी सोपेही नाहीत. त्यामुळे आपली शारीरिक क्षमता Average असेल तरीही मेळाव्यात स्वागत आहे. पण अगदीच नवख्या सदस्यांनी मात्र कृपया संयोजकांना माफ करावे.
४. आपण जेवणार असलेले अन्न हे संपूर्ण गावरान शैलीतील असून पाणीही गावातील विहिरीचे व किल्ल्यावरील आहे.
५. सर्वात महत्वाचे : मेळाव्यासाठीच्या नावनोंदणीची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर असून १५ नोव्हेंबर नंतर येणा-या कोणत्याही सदस्यास कोणत्याही कारणास्तव ऐनवेळी जागा दिली जाणार नाही. कारण आपण पुणे व मुंबईतील सदस्यांच्या गाड्यांमधून प्रवास करणार आहोत. त्यामुळे जागा भरल्यास स्वत:ची सोय करावी. परंतु दोन्ही शहरांमधील सदस्यांपैकी कोणी ऐनवेळी कमी झाल्यास इच्छुकांच्या संख्येनुसार प्रवेश देण्यात येईल. तसेच जेवणाची ऑर्डर ही सदस्यांच्या संख्येवर अवलंबून आहे. दोन्ही दिवसांचे जेवण गावातील स्थानिक ग्रामस्थांकडे असल्याने ऐनवेळी सोय होणार नाही. त्यामुळे १५ नोव्हेंबर पर्यंत वर क्रमांक दिलेल्या सदस्यांपैकी कोणालाही संपर्क साधून आपापली उपस्थिती नोंदवावी. प्रतिक्रियेमध्ये दिलेली उपस्थिती ग्राह्य धरली जाणार नाही.
हे लक्षात ठेवा : १५ नोव्हेंबर पर्यंतच आपली Final and Confirmed उपस्थिती नोंदवावी. मायबोली कोणत्याही प्रकारचे व्यावसायिक गिर्यारोहण कार्यक्रम आयोजित करत नसल्याने "आधी पैसे द्या मगच प्रवेश" वगैरे भानगड इथे नसते. त्यामुळे आपली उपस्थिती १००% निश्चित असल्यासच नाव नोंदवावे. ऐन वेळी ११th Hour ला आपलं येणं रद्द करू नये कारण आपल्या नावाची जेवणाची ऑर्डर ८ दिवस आधीच दिली जाणार आहे व ती स्थानिक ग्रामस्थांकडे असल्याने रद्द करता येणार नाही त्यामुळे ऐन वेळी कॅन्सल केल्यास आपली वैयक्तिक Food Cost संपूर्णपणे भरावी लागेल व मायबोलीतील कोणताही सदस्य आपल्या नावाचा जेवणाचा खर्च उचलणार नाही ह्याची नोंद घ्यावी.
ह्यवेळेला बोंबील कोण
ह्यवेळेला बोंबील कोण आणनार??
आणि सेन्या नाही आहे का मग श्रीखंड च काँट्रक्ट कोणाकडे मग..
कोकण्या ... तु अखंड बडबडतोयस
कोकण्या ... तु अखंड बडबडतोयस ... येणारेस का ?
श्रीखंडाच आम्ही काय ते बघु ...
सह्याद्रिमित्राने कठोर कायदे केलेत फार .... आम्ही पाळणार नाही ह्याची नोंद घ्यावी ...:फिदी:
मैं आनेका फिक्स किया हूं ...
मैं आनेका फिक्स किया हूं ...
संयोजकांनी फारच घाबरवून टाकले आहे... पण कट्टर मायबोलीकर असल्याने घाबरणे आमच्या तत्त्वात बसत नाही..
आम्ही घाबरवतो ... घाबरत नाही
आम्ही घाबरवतो ... घाबरत नाही
मैं आनेका फिक्स किया हूं ...
मैं आनेका फिक्स किया हूं ... >>>>सह्हिए!!!
कोकण्या ... तु अखंड बडबडतोयस ... येणारेस का ?>>>>>>>:फिदी:
कोकण्या ... तु अखंड बडबडतोयस
कोकण्या ... तु अखंड बडबडतोयस ... येणारेस का ?>>>>>>>:) :स्मित::) :स्मित::)
वरती नोंदणीच्या तिथली तारिख
वरती नोंदणीच्या तिथली तारिख तेव्हढी २१ ते २३ करा की...
किश्या , गोडबोले आणि
किश्या , गोडबोले आणि मराठवाड्याबद्दल चर्चा करणारे रावबहाद्दुर यांनाही घेउन या रे ...
फार मोठी चर्चा करायची आहे ...
हो ना. ते पांडवांची नावेही रहीलियत ना?
मी आहे डोम्बिवलिहुन. यो,
मी आहे डोम्बिवलिहुन.
यो, ओंक्या माझे नाव लिस्ट मध्ये टाका..
महत्वाची सूचना : आपली फायनल
महत्वाची सूचना : आपली फायनल उपस्थिती २० तारखेला पुन्हा एकदा आपापल्या विभागातील प्रतिनिधींना फोन करून कळवावी जेणेकरून एकूण संख्या कळणे सोयीचे जाईल. २० तारखेला आलेली उपस्थितीच मेळाव्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. आणि अचानक अगदीच काही अपरिहार्य कारणामुळे रद्द झाल्यास तेही फोन करूनच कळवावे. उगाचच "मी Whatsapp वर मेसेज टाकला होता,मेल केला होता,फेसबुक वर सांगितलं होतं" अशी कारणे देऊ नयेत. फोन वर काही शंका असल्यास त्याचे निरसनही व्यवस्थित होईल.
सह्यमेळाव्यात सहभागी होणा-या सदस्यांनी खाली दिलेल्या गोष्टी आपल्या बरोबर ठेवाव्यात.
१. दोन दिवसांचे कपडे / टॉवेल वगैरे
२. कमीत कमी दोन लिटर्स पाणी (Compulsory)
३. टोपी (Compulsory)
४. थंडीसाठी स्वेटर / शाल / थर्मल वगैरे (Compulsory)
५ . बेडिंग - स्लीपिंग बॅग / कॅरी मॅट
६. चादर / पांघरूण
७. गडावर किंवा प्रवासात खाण्यासाठी (सर्वांना पुरतील एवढे) कोरडे पदार्थ
८. वैयक्तिक औषधे वगैरे
शनिवारी दुपारच्या जेवणासाठी डबा आणायचा आहे की नाही हे २० तारखेपर्यंत निश्चित करण्यात येईल. त्यामुळे २० तारखेला एकदा धाग्याला भेट द्यावी
विन्या, मी येत नाहिये पण
विन्या, मी येत नाहिये पण श्रीखंड पाठवतोय रे.. गोड मानून घे.
सेन्या तुही आला असतास तर
सेन्या तुही आला असतास तर श्रीखंडाची गोडी आणखी वाढली असती....
उगाचच गोड मानुन घेण्याची वेळ आली नसती...>>>>>>
ओंकार तु सूचना देतोयस का
ओंकार तु सूचना देतोयस का घाबरवतोयस हेच कळत नाही....
जरा सूर खालच्या पट्टीतला लाव पाहू
मी पण येण्याचा विचार करतेय..
मी पण येण्याचा विचार करतेय..
कुणालाही येण्यास आडकाठी नाही.
कुणालाही येण्यास आडकाठी नाही. पण सर्व गोष्टींची पूर्तता केलेली असणे आवश्यक
१. दोन दिवसांचे कपडे / टॉवेल वगैरे
२. कमीत कमी दोन लिटर्स पाणी (Compulsory)
३. टोपी (Compulsory)
४. थंडीसाठी स्वेटर / शाल / थर्मल वगैरे (Compulsory)
५ . बेडिंग - स्लीपिंग बॅग / कॅरी मॅट
६. चादर / पांघरूण
७. गडावर किंवा प्रवासात खाण्यासाठी (सर्वांना पुरतील एवढे) कोरडे पदार्थ
८. वैयक्तिक औषधे वगैरे
हो मि पन येनार...
हो मि पन येनार...
चला टी शर्ट ची नोंदणी
चला टी शर्ट ची नोंदणी झाली....
चला टी शर्ट ची नोंदणी
चला टी शर्ट ची नोंदणी झाली....>>>>आमचीबी
३. टोपी (Compulsory) हे मात्र
३. टोपी (Compulsory)
हे मात्र बरोबर.. प्रत्येकाने आपापल्या मापाच्या घेवुन या.
ओ सन्नीताई, जरा गंमत काय
ओ सन्नीताई, जरा गंमत काय केली, लैच सुटलायसा...
उगा आचरटपणा करून या चांगल्या धाग्याला टाळे लावायला भाग पाडू नका...
आणि असेही या मेळाव्याला फक्त ओरीजनल आयडी येतात, त्यामुळे एकतर तुमचा ओरीजनल आयडी जाहीर करा किंवा इथून निघायचे घ्या...काय
ओ सनी लिओन…आयडी फालतू ठेवलाय
ओ सनी लिओन…आयडी फालतू ठेवलाय ह्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही पण उगाच काहीतरी वाह्यात कॉमेंट्स करून स्वत:ची लायकी जाहीर करू नका…हा सह्यमेळावा आहे…बालवाडीची सहल नाही त्यामुळे तुम्ही काय बोलताय ते आम्हाला चांगलंच कळतंय. चेष्टा करायची असेल तर मेळाव्याला येऊन सगळ्यांसमोर करा. सभ्यतेच्या मर्यादा ओलांडणार असाल तर आम्हीही दादा कोंडकेंचे चित्रपट पाहतो हे लक्षात ठेवा. तुमचा आयडी खरा आहे का डुप्लीकेट…तुम्ही चेष्टा करताय का खरं बोलताय हे विसरून रीतसर अपमान करण्यात येईल… न तुम्ही स्त्री नाही आहात हे तुमच्या पहिल्याच कॉमेंट वरून कळलंय…धागा वाहता ठेवण्यासाठी बाकीचे विषय पण आहेत…!!
हाकला रे ही ला/ ह्याला...
हाकला रे ही ला/ ह्याला... च्यायला नक्की काय लिहायचं यांना तेच कळत नाही... यांच्याबाबतीत मोठाच जेंडर क्रायसिस आहे बुवा..हो क्रायसिस...
किती जण झाले रे नक्की
किती जण झाले रे नक्की
कालपर्यंत १५ दिवस उंडगेगिरी
कालपर्यंत १५ दिवस उंडगेगिरी केलेली असल्याने मी अजूनही तळ्यात मळ्यात आहे. कदाचित थेट गडावरच भेटेन. बायकोला काय सांगावं या विचारात आहे.
Pages