दुबई / अबु धाबी सहल - भाग ९ - जबेल हाफीत

Submitted by दिनेश. on 22 September, 2014 - 07:26

दुबई / अबु धाबी सहल - भाग १ http://www.maayboli.com/node/50452

दुबई / अबु धाबी सहल - भाग २ http://www.maayboli.com/node/50460

दुबई / अबु धाबी सहल - भाग ३ http://www.maayboli.com/node/50475

दुबई / अबु धाबी सहल - भाग ४ http://www.maayboli.com/node/50501

दुबई / अबु धाबी सहल - भाग ५ http://www.maayboli.com/node/50520

दुबई / अबु धाबी सहल - भाग ६ - शेख झय्यद पॅलेस म्यूझियम, अल ऐन http://www.maayboli.com/node/50789

दुबई / अबु धाबी सहल - भाग ७ - अल ऐन नॅशनल म्यूझियम ( पहिला भाग ) http://www.maayboli.com/node/50816

दुबई / अबु धाबी सहल - भाग ८ - अल ऐन नॅशनल म्यूझियम ( दुसरा भाग ) http://www.maayboli.com/node/50823

अल ऐन मधे एकमेव अशी पर्वतरांग म्हणजे जबेल हाफीत. यातल्या एका शिखरावर आम्ही गेलो होतो. अगदी
वरपर्यंत गाडीरस्ता आहे. वाटेवर मर्क्यूरी हॉटेल ( राहण्याचे ) आहे शिवाय अगदी वर एक रेस्टॉरंट पण आहे,
तिथे बसायला छान व्यवस्था आहे व तिथून सूर्यास्त फार छान दिसतो. आम्ही गेलो होतो त्यावेळेपासून
सूर्यास्ताला बराच वेळ होता, म्हणून थांबता आले नाही.

वरच्या दृष्यापेक्षा जाण्याचा रस्ता जास्त सुंदर आहे. जगातील सुंदर अश्या १० पर्वतरस्त्यांमधे याची गणना होते.
वळणावळणाचा हा रस्ता अगदी भान हरपून टाकतो. वाटेवर दोन ठिकाणी थांबण्यासाठी जागा राखलेली आहे,

आम्ही गेलो होतो ते जुलै मधे. त्या वेळी हवामान खुपच धूसर होते. तरी तिथून दिसणारे नजारे सुंदरच होते.
या पर्वताच्या पायथ्याशी एक बाग आहे. तिथे या पर्वताच्या पोटातून येणारा फलाज आहे. अल फलाज म्हणजे
बारमाही वाहणारा झरा. एवढ्या रुक्ष वातावरणात हे पर्वत असे पाणी सोडत असतात हा एक चमत्कारच आहे.
इथला फलाज गरम पाण्याचा आहे. पण काही फलाज थंड पाण्याचेही असतात.

ओमानमधे अनेक भागात केवळ हे फलाजच पाण्याचा स्त्रोत आहेत. या पाण्यावरच शेती, गुरे पाळली जातात.
अर्थात मानवी उपयोगांना प्राधान्य दिले जाते. या पाण्याचे नियोजन कसे करायचे याचे नियम परंपरेने ठरलेले
असतात. एकच फलाज ४/६ गावांना पाणी पुरवतो, त्यामूळे या पाण्याचा वापर अत्यंत काळजीपूर्वक केला जातो.
या फलाज मधे कधीही धुणी धुतली जात नाहीत कि घाण टाकली जात नाही. गरजेपुरतेच पाणी यातून काढून घेतात.

त्यामूळे हे फलाज एवढे स्वच्छ असतात कि ओंजळीने त्यातले पाणी प्यावे. ( तसे मी नेहमीच पितो. )

तर चला.

१) अल ऐन मधे उंटांचा बाजार आहे.

२) पहिल्यांदा हा एवढाच पर्वत दिसला.. ( त्यामूळे वाटले केवढ्ढूसा आहे हा, पण खरी पर्वतरांग याच्या मागे
आहे आणि ती नंतरच दिसू लागते.)

३) इथून चढणीचा रस्ता सुरु होतो.

४)

५)

६)

७)

८)

९)

१०)

११)

१२)

१३)

१४)

१५)

१६)

१७) हे बहुतेक खाजगी घर आहे.. रसिक !!

१८) आता पटलं रसिक का म्हणालो ते !

१९) मर्क्यूरी हॉटेल

२०) वरून दिसणारे दृष्य

२१) तिथल्या रुक्ष हवामानातही काही वनस्पती उगवल्या होत्या.

२२)

२३) त्या घराचे प्रवेशद्वार

२४)

२५)

२६) शिखर आणि रेस्टॉरंट

२७)

२८) सनसेट पॉइंट

२९) परतीच्या वाटेवर

३०)

३१) पायथ्याच्या बागेत

३२)

३३)

३४) गरम पाण्याचा फलाज

३५) असे पाणी सतत वहात असते ( इथे त्यालाच पाईप लावलेला आहे. )

३६) हे छोटेसे मुबाझारा धरणही ऐतिहासिक आहे. कधी काळी अडवण्याएवढे पाणी तिथे असावे. ( सध्या नाही. )

३७) दुबईकडे परतताना...

पुढे चालू...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कामिनी, मला पण तो उल्लेख नकोच होता. काढला तो आता. खरं तर ते उंट खूप छान होते पण ते ऐकल्यावर आम्ही तिथे थांबलोच नाही.

३७, चालत्या गाडीतून काढलाय.

कंसराज... खरेच तो रस्ता फार सुंदर आहे. आपल्याला नेहमी हिरव्या घाटातून फिरायची सवय असते. त्यापेक्षा फारच वेगळा अनुभव होता तो.

त्या रसिक घरात पाणी कुठून येते? तो झरा तर पर्वताच्या पायथ्याशी आहे ना? पायथ्यापासून एका घरासाठीच पाणी वर चढवायचे म्हणजे नक्की कोणी अमीर-उमराव असणार.

आत्तापर्यंतच्या भागात वाळवंटाबरोबरच थोडीशी हिरवाई पण असायची. या भागात मात्र त्या प्रदेशातला रखरखीतपणा अंगावर येतोय.

माधव, जी हिरवाई आहे ती शहर भागातच.. मधला सर्व भाग असाच आहे. दुबईत आता नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत फारच कमी असतील.. पण समुद्राचे पाणी गोडे करून वापरण्याएवढा समुद्र आणि पैसा आहे ना त्यांच्याकडे !

हिरवाई घेऊन येतोच आहे, पुढील भागात !

खुप सुरेख... वळणदार वाटा,रुक्ष पर्वत रांगा पायथ्याशी हिरवळ, नितळ फलाज, त्या रसिकाचे घर, हॉटेल सगळेच अनोखे... धन्यवाद दा..

आभार ..
हो मंदार, बदर ने सांगितले होते तसे पण मला त्या चित्रपटाचे नावच लक्षात राहिले नाही.

दिनेशदा छान रूक्ष फोटोज Happy

जिप्स्याने आज हिरवाईचा जास्तच डोस दिला आहे... त्याला माझा उतारा >>>>>:फिदी:

आय डाऊट तिथे उभे राहून हा नजारा बघताना एवढीच मजा येत असेल का पण त्या दगडधोंड्यांचे फोटो लाजवाब आलेत. त्या मालिकेत मध्येच तो सनसेट पॉईंटचा फोटो (२८) आला तो आवडला ..

ऋन्मेऽऽष, वाळवंतातील सूर्यास्त आणि चांदणी रात्र.. हे अप्रतिम अनुभव असतात. संध्याकाळी वातावरणातील वाळू मूळे खुप सुंदर रंग दिसतात. आणि चांदण्या तर खुपच सुंदर दिसतात.

रश्मी Happy