आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतलेही कसावा हे एक महत्वाचे पिक आहे. पूर्व आफिकेत तो प्रकार एक स्नॅक म्हणून खातात तर पश्चिम आफ्रिकेत ते मुख्य अन्न आहे.
या पिकाची शेती अगदी सोपी, फारसे काही करावे लागत नाही. उत्पन्नही भरपूर. पण या मूळांवर काही प्रक्रिया केल्याशिवाय ती खाता येत नाहीत. त्यात, खास करून सालीत काही विषारी घटक असतात.
आपल्याकडे याचे प्रचलित रुप म्हणजे साबुदाणा. साबुदाणा खिचडी म्हणजे आपला अगदी जिव्हाळ्याचा विषय !
माझ्या भारतातून आणायच्या सामानात साबुदाणा ( जास्त नाही, दोन वेळा खिचडी होईल इतकाच ) असतो. तशी ती
दोनवेळा करूनही झाली.
गेल्या आठवड्यात इथल्या सुपरमार्केटमधे हा प्रकार सापडला..
तसा हा प्रकार साबुदाण्यासारखाच असावा असा अंदाज मी केला.
आपल्याकडची साबुदाण्याची प्रक्रिया वेगळी आहे ( खरे तर सॅगो पर्ल्स असतात ते सॅगो पाम नावाच्या झाडाच्या गाभ्यापासून करतात.. तो आणखी वेगळा प्रकार. ) तसा साबुदाणा दक्षिण आशियाई देशात करतात. मस्कत ओमान मधेही वापरतात.
नायजेरियात, कसावा किसून आंबवून एक गारी नावाचा प्रकार करतात. तो प्रकार शिजवावा लागत नाही.
नुसते गरम पाणी त्यात टाकले कि झाले. तो प्रकार त्यांचे मुख्य अन्न आहे. आपण ( निदान मी तरी ) त्याचा वास सहन करू शकत नाही.
कसाव्याचे पिठ करून, त्याची अशीच उकड करून इथे अंगोलात खातात. त्याला फुंगी म्हणतात. त्या लगद्याचा गोळा तोडून घेणे, हिच एक कसरत असते. मी एकदा चव घेऊन बघितली तर मला तो गोळा गिळवेनाच
तर हा प्रकार आणला, आणि विचार केला याची खिचडी करता येते का बघू.
अगदी बारिक साबुदाणा भिजवताना आपण जसे अगदी कमी पाणी घालतो तसे करून मी हा प्रकार भिजत घातला.
अर्ध्या तासाने बघितले तर याचा एकसंध गोळा तयार झाला होता.
त्याचे काहीच करता येणे शक्य नव्हते. म्हणून त्यात भरपूर पाणी घालून त्यातल्या गुठळ्या मोडून घेतल्या.
मग विचार केला जरा धुवून स्टार्च निघतो का बघू, तर प्रत्येक पाणी दूधासारखे पांढरे निघायला लागले. म्हणजे हा
प्रकार चक्क पाण्यात विरघळायला लागला.
मग तसेच सगळे गाळण्यावर गाळून घेतले. परत गोळा व्हायच्या आत, त्यात झटपट दाण्याचे कूट नव्हे तर पिठ
करून मिसळले. पाणी पूर्ण निथळले असते तर परत त्याचा गोळा झाला असता. म्हणून ते प्रकरण ओलसर असतानाच तूप जिर्याच्या फोडणीत टाकले.
तर परत तसेच. अगदी वडी करण्यासारखा वोकमधे गोळा होईल असे वाटू लागले. मग हाताशी असलेला नारळाच्या
दूधाचा कॅन त्यात ओतला. आता प्रकरण मॅनेजेबल झाले.
त्यात चवीसाठी आमसुले टाकली. बशीत काढून घेतला. वरून बटाट्याच्या सळ्या, दाणे आणि हिरवी मिरचीपूड टाकली.
मस्त चटकदार फराळी मिसळ तयार झाली कि राव !
पण मी या प्रकरणाला एवढ्यावर सोडणार नव्हतोच. त्याच्या खोड्या माझ्या लक्षात आल्या होत्याच. मग त्याच्या
जोडीला तांदळाचे पिठ ( उपवास वाल्यांनी वरईच्या तांदळाचे पिठ घ्यावे ) आणि पोटॅटो फ्लेक्स वापरल्या.
आता हे मिश्रण सहज हाताळता येत होते. मग त्याचे थालिपिठ करून बघितले. मस्त पातळ, कुरकुरीत थालिपिठ झाले.
आणि उरलेल्याचे साबुदाणा वडेही झाले.
आणखी काय करता येईल, त्याचा विचार करतोय
आता याला पर्याय काय ? असे
आता याला पर्याय काय ? असे विचारू नका रे. साबुदाणा मिळणार्या देशात राहतात तुम्ही !!
Tapioca ड्रिंक मधे बघितल आहे.
Tapioca ड्रिंक मधे बघितल आहे.
आह, स्टफ्फ्ड वडा काय दिस्तोय,
आह, स्टफ्फ्ड वडा काय दिस्तोय, मस्त!
सहीये
दिनेशदा
दिनेशदा __________/\___________ तुस्सी ग्रे८ हो!!!
बापरे ! धन्य आहात आपण
बापरे ! धन्य आहात आपण !
एव्हढे प्रयोग अथकपणे करायचा पेशन्सही आहे आपल्यात.
सलाम तुमच्या जिद्दीला !!
हे फायनल प्रॉडक्ट छानच दिसतंय !
मस्त!!
मस्त!!
तुम्ही तर कोन्ड्याचाही मान्डा
तुम्ही तर कोन्ड्याचाही मान्डा करण्यात तरबेज आहात,:स्मित: आम्ही काय सान्गणार्?:अओ:
प्रकरण सॉलिड दिसतय. आणी थालिपीठ व वडे कातिल आहेत.
वा... शेवटचा फोटो अगदीच
वा... शेवटचा फोटो अगदीच तोंपासु...
आणखी काय करता येईल, त्याचा
आणखी काय करता येईल, त्याचा विचार करतोय >>> खीर, चिकवड्या पुढच्या वेळेस असा गोळा झाला की थोडा पातळ करुन चिकवड्यांचे वाळवण करुन पहा. तळल्यावर फुलल्या तर भारीच!
दिनेश दा. ____________ /\
दिनेश दा. ____________ /\ ____________
दिनेशदा तुम्हाला____ ^ ____.
दिनेशदा तुम्हाला____ ^ ____.
दिनेश दा !!!! हे तुमचे प्रकार
दिनेश दा !!!!
हे तुमचे प्रकार आणि कौशल्य पाहुन एखाद दिवशी साक्षात अन्नपूर्णा देवी तुमच्या समोर उभी राहील आणि म्हणेल माझे गुरु व्हाल का तुम्ही !!!
साक्षात दंडवत आहे तुम्हाला
दा, तुस्सी ग्रेट हो!!
दा, तुस्सी ग्रेट हो!! ___/\___
साक्षात अन्नपूर्णा देवी
साक्षात अन्नपूर्णा देवी तुमच्या समोर उभी राहील आणि म्हणेल माझे गुरु व्हाल का तुम्ही !!!+++ अगदी अगदी..
दा, त्या थालीपीठाच्या प्र.ची मधली ती सॉस आणि चटणी ची कळी... आई ग कसली गोड दिसते आहे!...
कस काय सुचतं हो तुम्हाला.
लाजवू नका रे.. फारसे काही
लाजवू नका रे.. फारसे काही कौशल्य नाही यात. सहज जमेल कुणालाही.
हा प्रकार बहुतेक खिरीसाठी वापरत असावेत.
दिनेश असे फोटो टाकून किती
दिनेश असे फोटो टाकून किती पापं कराल अहो
तुमचं पोट दुखणार आता बसा..
वडा कसला भारी आहे.. मधे कसलं
वडा कसला भारी आहे.. मधे कसलं स्टफिंग आहे?
दक्षे, इथे नेवैद्य दाखवला ना,
दक्षे, इथे नेवैद्य दाखवला ना, आता मी पापमुक्त
चिमुरी, बेसिल, हिरवी मिरची, दाणे आणि मीठ एकत्र वाटलेय.
दिनेशजी तुमच्याकडे दह्यातला
दिनेशजी तुमच्याकडे दह्यातला साबुदाणा करतात का? मस्त होईल याचा (इफ खिचडी इज ओके)
धन्य धन्य रेसिपी.
धन्य धन्य रेसिपी.
आभार सर्वांचे ! हो विनिता,
आभार सर्वांचे !
हो विनिता, असेच काही काही करून संपवावा लागेल. माझा उपास वगैरे नसल्याने तसे कुठले घटक वापरायचे याचे स्वातंत्र मला असतेच.
वडे खतरनाक दिसतायत, सलाम
वडे खतरनाक दिसतायत, सलाम दिनेशदा
थालिपिठ आणि वडे सहीच.
थालिपिठ आणि वडे सहीच.
दिनेश
दिनेश -----------------/\--------------------------
काय काय करून बघता आणि अगदी तेही टेस्टी!
मला फक्त ते थालिपिठ
मला फक्त ते थालिपिठ द्या!
बाकीचं बाकीच्यांना वाटून टाका (बघा मी किती दर्यादिल का काय म्हणतात ते )
वडा द्या म्हणलं असतं पण बेसिल????? नक्कोच मग
फोटो एकदम मस्त...
फोटो एकदम मस्त...
आभार .. आणि सर्व नमस्कारांना
आभार .. आणि सर्व नमस्कारांना प्रतिनमस्कार
तांदळाच्या पिठामूळे असेल, वडे दुसर्या दिवशीही चिवट झाले नव्हते. पचण्यास सोपे असे त्या तांदळाच्या पिठाच्या पाकिटावर लिहिलेले आहे. या पोटॅटो फ्लेक्स मूळे मॅश्ड पोटॅटो पासून, आलू पराठ्यांपर्यंत काहीही त्वरीत करता येते.
फोटो भारीच आहेत.
फोटो भारीच आहेत.
दिनेश... दी ग्रेट मास्टर
दिनेश... दी ग्रेट मास्टर शेफ... तुला अश्या हटके इन्ग्रेडिएंट्स मधून असे चविष्ट पदार्थ निर्माण करण्यात
मास्टरी झालेलीय रे... !!! मस्त !!!
मस्त टेप्टींग दिसतय. पण चवीला
मस्त टेप्टींग दिसतय. पण चवीला कसं लागलं?
Pages