भारतात पक्षीनिरीक्षकांची पंढरी म्हणता येईल अशी ३-४ महत्वाची ठिकाणे आहेत. सह्याद्री किंवा पश्चिम घाट (Western Ghat), कच्छचे रण, अरुणाचल प्रदेश व उत्तराखंड. यापैकी या आधी पश्चिम घाटातील अनेक ठिकाणांविषयी मी लिहीलेले आहेच. आत्ता पर्यंत महाराष्ट्र कर्नाटका व गोवा या भागात फिरुन झाले आहे. तमिळनाडु, केरळा, पश्चिम बंगाल, गुजराथ व अरुणाचल अजुनही झालेले नाही.
विश्वांतर जातक
बोधिसत्व राजा विश्वांतर म्हणून जन्म घेतो. त्याचे आप्त त्याला फसवून कारस्थान करून राज्याबाहेर काढतात, तडीपार करतात हे सांगण्याकरता ती लाडक्या राणीला-माद्रीला घेऊन बसला आहे. तिला दु:खाची जाणीव होऊ नये म्हणून तिला मद्य पाजतो. इथे राणीच्या डोळ्यात मद्याची धुंदी दिसते तर बोधीसत्वाच्या डोळ्यात स्थितप्रज्ञ भाव आहेत.
त्यांचे सेवक त्यांना सुरईतून मद्य वाढत आहेत. ह्या चित्रावरून त्याकाळची परस्थिती, रीतीरिवाज नीट दिसतात. घरांची रचना , स्त्रियांचे कपडे, केश संभार आभूषण , घरातले फर्निचर ई. बघण्यासारखे..
गेल्या शनिवार रविवार पुण्याजवळील एका तळयाकाठी मुक्काम आणि परतीच्या मार्गात एक सूंदर असे पाले गावातील लेणे अशी भटकंती झाली. पुण्यापासून पाले हे साधारण ५०किमी अंतरावर आहे. पाले गावा पर्यंत थेट गाडी मार्ग आहे आणि गावतुन एखादा गावकरी मदतीस घेतला असता भटकंती सुरक्षित आणि वेळेत होईल ह्याची निश्चिंति येते.
"अशोक वाटिका" नावाच्या फार्महाउस शेजारून लेण्यापर्यन्त वाट गेली आहे. फार्म हाउसच्या शेजारी गाडी पार्क करून ५ मिनिटाची चाल आपल्याला लेण्याच्या पायथ्याला घेवुन जाते. तेथून पुढे १० मिनिटांच्या डोंगर चढाईने आपण लेण्याच्या मुखाशी येतो.
मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करताना कोलाड रेल्वे स्टेशनजवळ, महामार्गाला लागुनच "कलाकृती" नावाचे एक हॉटेल आहे. खरंतर प्रत्येक महामार्गावर गावाजवळ/गावाबाहेर हॉटेल्स, ढाबे हे दिसतात. पण या "कलाकृती" हॉटेलमध्येच वसली आहे "काष्ठशिल्पांची एक अद्भुत नगरी" श्री रमेश घोणे यांचे "घोणे काष्ठशिल्प संग्रहालय". लाकडाच्या ओबडधोबड ओंडक्यामधुन साकार झालेल्या विविध कलाकृतींची अनोखी दुनिया या संग्रहालयात पाहण्यास मिळते. या नानाविध वस्तुंना "काष्ठशिल्प कला" आणि इंग्रजीमध्ये याला ड्रिफ्टवूड असे म्हणतात. म्हणजेच जळाऊ, टाकाऊ आणि जंगलातुन गोळा करण्यात आलेल्या लाकडांमधुन साकार करण्यात आलेल्या विविध कलाकृती.
ह्या वर्षीचा मी अनुभवलेला वसंतोस्तव.
१) कुठून येतो हा कुसुंबाला रंग जो दूरवरूनही लक्ष वेधून घेतो.
जानेवारी संपत आला की हुरडा पार्टीचे वेध लागायला लागतात. ज्वारीची कणसं किती भरली आहेत, कोवळी आहेत बघून अंदाज घेतला जातो. साधारण फेब्रुवारीच्या दुसर्या तिसर्या आठवड्यात हुरडा तयार होतो आणि अगदी आठवडाभरच राहतो. नंतर कणसं निबर होतात, थोडक्यात ज्वारी तयार व्हायला लागते.
आचरा बीच... कणकवली रेल्वे स्टेशन पासून १ तासाच्या अंतरावर असलेला अतिशय सुंदर आणि स्वच्छ आचरा समुद्र किनारा.