सुयुध्द त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा. भाग -13
आजचा सामना सुयुध्दला जिंकायचा होता. त्याच्या गटाला दिशा दाखवायचे महत्वाचे काम तो आज करत होता. त्याच्या मनात आज हा सामना कसा जिंकता येईल ह्याचेच विचार घोळत होते. निलमध्वजने पाच ते सहा गट केले होते आज त्यांना गरुडध्वजला हरवायचेच होते. त्याच सोबत इतर गट पुढे पोहचणार नाहीत ह्याची ही खबरदारी त्यांना घ्यायची होती. सुयुध्द सोबत त्याच्या गटात 14 जणं होती ज्यात 4 मुली आणि 10 मुलं होती. झाडांच्या आडोशातुन लपत छ्पत एक-एक जण बरोबर सर्वीकडे नजर ठेवत पुढे जात होता. त्यांना तलावापासुन जंगलाच्या आत येऊन नुकतीच 20 मिनिटं झाली होती. त्याचे कपडे तलाव पार करताना भिजले होते.