जानेवारी संपत आला की हुरडा पार्टीचे वेध लागायला लागतात. ज्वारीची कणसं किती भरली आहेत, कोवळी आहेत बघून अंदाज घेतला जातो. साधारण फेब्रुवारीच्या दुसर्या तिसर्या आठवड्यात हुरडा तयार होतो आणि अगदी आठवडाभरच राहतो. नंतर कणसं निबर होतात, थोडक्यात ज्वारी तयार व्हायला लागते.
आचरा बीच... कणकवली रेल्वे स्टेशन पासून १ तासाच्या अंतरावर असलेला अतिशय सुंदर आणि स्वच्छ आचरा समुद्र किनारा.
रंगपंचमीच्या हार्दीक शुभेच्छा!! (फोटो दिसत नसल्यास कृपया क्रोम मधुन बघावे हि विनंती)
कृष्ण पंचमी या तिथीला रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. धुलीवंदनापासून सुरू होणाऱ्या वसंतोत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात.
वसंतोत्सवातील प्रमुख सण असलेला रंगपंचमी हा सण रंगांचा आणि सर्वांचा आनंद द्विगुणीत करणारा असतो. रंगपंचमीचे हे रूप असेच रहावे यासाठी रंगपंचमीला घातक रसायनांचा वापर, प्लॅस्टिकच्या पिशव्या, फुगे आणि पाण्याचा वापर टाळून प्रदूषणविरहीत आणि सुकी रंगपंचमी साजरी करण्याचे आवाहन निरनिराळ्या संस्था वेळोवेळी करत असतात.
डिसेंबर आणि जानेवरी महिन्यात काही कामानिमित्त मुंबई आणि आसपासच्या परिसराचे दर्शन झाले होते. ह्या भटकंती दरम्यान आम्ही त्या प्रदेशातील छोटेखानी अश्या किल्ल्यांना भेटी दिल्या होत्या. जमिनीवर अथवा समुद्र किनारी असलेल्या ह्या किल्ल्यांनी आमच्या मनाला भुरळ घातली.
मुंबई शहरात सुद्धा असे छोटेखाणी किल्ले आहेत ह्याची प्रचिती जानेवारी मधील सेंट जॉर्ज किल्ल्याला दिलेल्या भेटीवरून कळून आले आणि मग ध्यास लागला ह्यांच्या माहितीची जुळवा जुळव करण्याचा, ह्यांची एक भ्रमंती करण्याचा.
___/\___शिवजयंती निमित्त श्री छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा___/\___

फुलों के रंग से दिल कि कलम से ... खरंच हे गाणं ऐकतांना डोळ्यासमोर फुलांची अनेकरंगी दुनिया राहते . गेल्या तीन चार वर्षात घेतलेली हि विविध फुलांची प्रकाशचित्रे . नावं माहीत नाहीत. जाणकारांनी कृपया माहिती द्यावी (विशेषतः: तिसर्या क्रमांकावरील )

दापोली , बस नाम काफी है! मायबोलीवरचे धागे वाचूनच (आणि थोडी इतरांकडून माहिती घेऊन) दापोलीची सहल आखली होती. त्यामुळे प्रवास वर्णन असे काही नाहीये. फक्त मला दिसलेला आणि भावलेला दापोली परीसर तुमच्यापुढे सादर करतोय...
स्टॅंडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉन २०१७ च्या निमित्ताने मुंबईला येणे झाले. मनावर भुरळ घातल्या शिवाय मुंबई काही राहत नाही. प्रत्येक वेळेस काही तरी नवे दर्शन होतेच. ह्या ही वेळेस असेच काही झाले.
यंदाचे मुख्य आकर्षण होते ते "St जॉर्ज फोर्टचे", ह्याच नावाच्या दवाखाण्यात हा छोटेखानी किल्ला (त्याचे अवशेष म्हणा ना) आहे. मुंबईला असलेल्या परकोटाची हे सध्या अस्तित्वात असलेले अवशेष आहेत. पूर्वीचे हे दारुगोळा कोठार सद्य स्थितीत महाराष्ट्र शासनाचे "पुरातत्व व वस्तूसंग्राहालय संचालनालाय" म्हणून कार्यरूपात आहे.
चैतंन्य, अजिंक्य आणि मल्हारी गुरुजींना सुयुध्दने गुरु विश्वेश्वरांच्या घरात घुसताना पाहिले व तो ही त्यांच्या मागे मागे घरात शिरला. गुरु आतल्या खोलित ध्यानस्थ होते. जेव्हा ते तिघे आत शिरले ते सरळ गुरुंच्या खोलीकडे गेले होते. सुयुध्द्ने माजघरात कोणी नाही हे पाहुन खोलीकडे जाण्याचे ठरवले. खोलीच्या दाराशी जाऊन तो थांबला. आत चैतंन्य गुरु विश्वेश्वरांना काही सांगत होते. त्याने कानेसा घ्यायला म्हणुन दाराशीच उभे राहुन ते काय बोलत आहेत हे ऐकण्याचा प्रयत्न केला. चैतंन्य गुरुजी बोलत होते. तो त्यांचा आवाज ओळखत होता.