रंगपंचमी निसर्गाची

Submitted by कांदापोहे on 17 March, 2017 - 01:05

रंगपंचमीच्या हार्दीक शुभेच्छा!! (फोटो दिसत नसल्यास कृपया क्रोम मधुन बघावे हि विनंती)

कृष्ण पंचमी या तिथीला रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. धुलीवंदनापासून सुरू होणाऱ्या वसंतोत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात.

वसंतोत्सवातील प्रमुख सण असलेला रंगपंचमी हा सण रंगांचा आणि सर्वांचा आनंद द्विगुणीत करणारा असतो. रंगपंचमीचे हे रूप असेच रहावे यासाठी रंगपंचमीला घातक रसायनांचा वापर, प्लॅस्टिकच्या पिशव्या, फुगे आणि पाण्याचा वापर टाळून प्रदूषणविरहीत आणि सुकी रंगपंचमी साजरी करण्याचे आवाहन निरनिराळ्या संस्था वेळोवेळी करत असतात.

मुख्यत्वे महाराष्ट्रात साजरा होत असणारा हा सण देखील बाकीच्या उत्तर भारतीय संस्कृतींचे सावट पडुन गेले अनेक वर्ष दुर्लक्षीला जात आहे. होळीच्या दिवशी होळी पेटवुन त्यातील राख दुसर्‍या दिवशी खेळणे व पाचव्या दिवशी रंगपंचमी अशी प्रथा असताना हल्ली सर्रास धुलवडीलाच रंग खेळले जातात. अनेकांना तर रंगपंचमी सण माहीतही नाही.

असो. तर मागे एका लेखात नमुद केल्याप्रमाणे वसंताच्या आगमनाबरोबर निसर्ग रंगपंचमी खेळायला सुरुवात करतो. लाल हिरवा पिवळा निळा नारंगी गुलाबी रंगांची उधळण करत असतो. यातील पळस, पांगारा, जकारंदा वगैरेची फुले पाण्यामधे भिजवुन तो रंग दुसर्‍या दिवशी खेळायची अनेक खेडेगावात प्रथा आहे.

प्रकाशचित्र १

प्रकाशचित्र 2

प्रकाशचित्र ३

प्रकाशचित्र ४

प्रकाशचित्र ५

प्रकाशचित्र ६

प्रकाशचित्र ७

प्रकाशचित्र ८

प्रकाशचित्र ९

प्रकाशचित्र १0

प्रकाशचित्र ११

Group content visibility: 
Use group defaults

आहाहा सुंदर.

जॅकरांदा कुठे दिसला?

जागु पुण्यात अनेक ठिकाणी आहे. फोटोतील झाड हे सिंहगडरोडवरील राजाराम पुलापाशी एक मठ आहे वेंकीजला लागुनच तिथले आहे. आत गेल्यावर वॉचमनने आडवले व हाफिसात फोन करुन परवानगी घेतली व फोटो काढुन दिले. एकाच झाडाच फोटो काढायला माणुस काय येडपट आहे असे बघत होता माझ्यकडे. Proud

सुंदर अप्रतिम फोटो आहे

प्रकाशचित्र ८ जरा जास्तच वरच्या लेव्हल वरुन काढला आहे असे वाटले ... अजून ग्राऊंडलेव्हल जवळ घेतला असता तर अजुन छान इफेक्ट आला असता. (वैयक्तिक मत)

प्रकाशचित्र ८ जरा जास्तच वरच्या लेव्हल वरुन काढला आहे असे वाटले .>> फारसा फरक नव्हता लेव्हलमधे. मोबाईलवर काढले आहे व घेतले तेव्हा लाईट खुप बेकार होता. तसेच थोडे झाडा जवळ जायला हवे होते. खुप लांबुन काढलाय.

जमिनीवरच्या २- ३ फुटावरून काढायला हवे होते.. रस्ता एकदम सुरुवातिपासून फ्रेम मधे मिळाला असता. आणि वरची पुर्ण फ्रेम मधे पुर्ण आकाश कॅप्चर करता आले असते.
मोबाईलवरुन पण चांगला रंग आला आहे.

रंगांची उधळण मस्तच Happy
डहाणूकर कॉलनीच्या सर्कल गार्डन बाहेर बहाव्याचे घोस फुलतील आता.. फोटोसाठी मस्त जागा आहे.

६ आणि ९ आवडले.
रंगपंचमीच्या हार्दीक शुभेच्छा!!

मस्त आहेत.
नंबर १० संध्याकाळी काढला आहेस का? सेल्फोन हलल्या सारखा वाटतोय.

Pages