रंगपंचमीच्या हार्दीक शुभेच्छा!! (फोटो दिसत नसल्यास कृपया क्रोम मधुन बघावे हि विनंती)
कृष्ण पंचमी या तिथीला रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. धुलीवंदनापासून सुरू होणाऱ्या वसंतोत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात.
वसंतोत्सवातील प्रमुख सण असलेला रंगपंचमी हा सण रंगांचा आणि सर्वांचा आनंद द्विगुणीत करणारा असतो. रंगपंचमीचे हे रूप असेच रहावे यासाठी रंगपंचमीला घातक रसायनांचा वापर, प्लॅस्टिकच्या पिशव्या, फुगे आणि पाण्याचा वापर टाळून प्रदूषणविरहीत आणि सुकी रंगपंचमी साजरी करण्याचे आवाहन निरनिराळ्या संस्था वेळोवेळी करत असतात.
मुख्यत्वे महाराष्ट्रात साजरा होत असणारा हा सण देखील बाकीच्या उत्तर भारतीय संस्कृतींचे सावट पडुन गेले अनेक वर्ष दुर्लक्षीला जात आहे. होळीच्या दिवशी होळी पेटवुन त्यातील राख दुसर्या दिवशी खेळणे व पाचव्या दिवशी रंगपंचमी अशी प्रथा असताना हल्ली सर्रास धुलवडीलाच रंग खेळले जातात. अनेकांना तर रंगपंचमी सण माहीतही नाही.
असो. तर मागे एका लेखात नमुद केल्याप्रमाणे वसंताच्या आगमनाबरोबर निसर्ग रंगपंचमी खेळायला सुरुवात करतो. लाल हिरवा पिवळा निळा नारंगी गुलाबी रंगांची उधळण करत असतो. यातील पळस, पांगारा, जकारंदा वगैरेची फुले पाण्यामधे भिजवुन तो रंग दुसर्या दिवशी खेळायची अनेक खेडेगावात प्रथा आहे.
प्रकाशचित्र १
प्रकाशचित्र 2
प्रकाशचित्र ३
प्रकाशचित्र ४
प्रकाशचित्र ५
प्रकाशचित्र ६
प्रकाशचित्र ७
प्रकाशचित्र ८
प्रकाशचित्र ९
प्रकाशचित्र १0
प्रकाशचित्र ११
व्वा... छान फोटो.
व्वा... छान फोटो.
मस्त रे केप्या!
मस्त रे केप्या!
केपी कमाल सूंदर फ़ोटो मजा आली
केपी कमाल सूंदर फ़ोटो
मजा आली
मस्त फोटो केपी.
मस्त फोटो केपी.
अप्रतिम फोटो ... फोटोमधली ती
अप्रतिम फोटो ... फोटोमधली ती रंगधुंद झाडं प्रत्यक्षात डोळेभरुन पहाणं या सारखं सुख कशात नाही ...
लोकहो धन्यावाद.
लोकहो धन्यावाद.
Pages