आजचा सामना सुयुध्दला जिंकायचा होता. त्याच्या गटाला दिशा दाखवायचे महत्वाचे काम तो आज करत होता. त्याच्या मनात आज हा सामना कसा जिंकता येईल ह्याचेच विचार घोळत होते. निलमध्वजने पाच ते सहा गट केले होते आज त्यांना गरुडध्वजला हरवायचेच होते. त्याच सोबत इतर गट पुढे पोहचणार नाहीत ह्याची ही खबरदारी त्यांना घ्यायची होती. सुयुध्द सोबत त्याच्या गटात 14 जणं होती ज्यात 4 मुली आणि 10 मुलं होती. झाडांच्या आडोशातुन लपत छ्पत एक-एक जण बरोबर सर्वीकडे नजर ठेवत पुढे जात होता. त्यांना तलावापासुन जंगलाच्या आत येऊन नुकतीच 20 मिनिटं झाली होती. त्याचे कपडे तलाव पार करताना भिजले होते.
चैतंन्य, अजिंक्य आणि मल्हारी गुरुजींना सुयुध्दने गुरु विश्वेश्वरांच्या घरात घुसताना पाहिले व तो ही त्यांच्या मागे मागे घरात शिरला. गुरु आतल्या खोलित ध्यानस्थ होते. जेव्हा ते तिघे आत शिरले ते सरळ गुरुंच्या खोलीकडे गेले होते. सुयुध्द्ने माजघरात कोणी नाही हे पाहुन खोलीकडे जाण्याचे ठरवले. खोलीच्या दाराशी जाऊन तो थांबला. आत चैतंन्य गुरु विश्वेश्वरांना काही सांगत होते. त्याने कानेसा घ्यायला म्हणुन दाराशीच उभे राहुन ते काय बोलत आहेत हे ऐकण्याचा प्रयत्न केला. चैतंन्य गुरुजी बोलत होते. तो त्यांचा आवाज ओळखत होता.
मैदानात जमा झालेल्या मुलांच्या घोळक्यात सुयुध्द लढत असलेल्या त्या दोन शिष्यांना अतिशय एकाग्रतेने पाहत होता. ते दोन्ही शिष्य एक गरुडध्वज तर दुसरा निलमध्वज गटाचे होते. गरुडध्वजच्या शिष्याच्या हातात तलवार होती तर निलमध्वज शिष्याच्या हातात भाला होता. अतिशय कुशलतेने ते दोघे एकमेकांशी लढत होते. प्रत्येक वार प्रत्येक डाव विचार करुन आणि वारंवार सराव केल्याने अचुक होता. त्या दोघांना लढताना पाहुन सांगणं कठिण होतं की नक्की कोण जिंकेल. सुयुद्ध अगदी बारकाईने त्यांच्या प्रत्येक हालचाली कडे लक्षपुर्वक पणे पाहत होता. ते करत असलेल्या हालचाली सुयुध्द एकेक करुन लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत होता.