विश्वांतर जातक
बोधिसत्व राजा विश्वांतर म्हणून जन्म घेतो. त्याचे आप्त त्याला फसवून कारस्थान करून राज्याबाहेर काढतात, तडीपार करतात हे सांगण्याकरता ती लाडक्या राणीला-माद्रीला घेऊन बसला आहे. तिला दु:खाची जाणीव होऊ नये म्हणून तिला मद्य पाजतो. इथे राणीच्या डोळ्यात मद्याची धुंदी दिसते तर बोधीसत्वाच्या डोळ्यात स्थितप्रज्ञ भाव आहेत.
त्यांचे सेवक त्यांना सुरईतून मद्य वाढत आहेत. ह्या चित्रावरून त्याकाळची परस्थिती, रीतीरिवाज नीट दिसतात. घरांची रचना , स्त्रियांचे कपडे, केश संभार आभूषण , घरातले फर्निचर ई. बघण्यासारखे..
बुद्धाचे निर्वाण शिल्प - हे प्रचंड मोठे आहे , कॅमेरात एकत्र बसतच नाही. निर्वाणावास्थेतल्या बुद्धाच्या चेहेर्यावरचे शांत भाव वाखाणण्या जोगे ..
महाजनक जातक. बोधिसत्व राजा महाजनक म्हणून जन्म घेतो. त्याला वैराग्य प्राप्त झाल्याने तो सर्व सुख विलासांप्रती उदासीन झाला आहे . राणी शिवाली व तिच्या सखी, दासी त्याला खुलवण्याचा प्रयत्न करतात पण तो बधत नाही. त्याचे अर्धोन्मीलित नेत्र हेच दर्शवतात
(No subject)
चित्रांची हालत फारच खराब आहे.
चित्रांची हालत फारच खराब आहे. एखाद्या कलाकाराने त्यांची मूळ आकारात नक्कल करून ती जतन करायला हवीत.
तिथे फोटोग्राफीला परवानगी आहे का ?
हो आहे.
हो आहे. पण flash आणि tripod वापरू देत नाहीत. आत बराच अंधार असतो त्यामुळे बराच प्रोब्लेम येतो... फोटो पेक्षा प्रत्यक्ष चित्र खूप जास्त चांगली आहेत, प्रत्यक्ष बघितलीच पाहिजेत प्रत्येकाने...
(बोधिसत्व राजा विश्वांतर
(बोधिसत्व राजा विश्वांतर म्हणून जन्म घेतो. त्याचे आप्त त्याला फसवून कारस्थान करून राज्याबाहेर काढतात, तडीपार करतात हे सांगण्याकरता ती लाडक्या राणीला-माद्रीला घेऊन बसला आहे.)
ह्याचा संदर्भ द्याल. म्हणजे कोणते पुस्तक, इत्यादी. उत्सुकता चाळवली म्हणून हवेय.