वसंतोत्सव

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 21 March, 2017 - 07:07

ह्या वर्षीचा मी अनुभवलेला वसंतोस्तव. Happy

१) कुठून येतो हा कुसुंबाला रंग जो दूरवरूनही लक्ष वेधून घेतो.

२) करंजाची हिरवीगार कोवळी पालवी परीसरात जणूकाही रोषणाईच.

३)

४) काटेरी पांगारा वर्षभर काट्यावर राहून वसंतात मात्र लाल पुष्पपताकांनी बहरतो.

५)

६) काळाकुडा बहरताना आपल्या नावातील काळा रंग झाकून टाकताना दिसतो.

७) पांढर्‍या कुड्याची फुले डोंगर दर्‍यात डोकावताना दिसतात.

८)

९) पळस उर्फ फ्लेम ऑफ फॉरेस्ट पहाता अगदी मशाली पेटवल्याचा भास होतो.

१०) काटेसावर उर्फ शाल्मलीची फुले नववधूप्रमाणे लाजरी-गईजीरी वाटतात.

११) करवंदाच्या जाळीतून फुलांचा दरवळणारा सुगंध हवा हवासा वाटत असतो.

१२) वसंतातल्या सुगंधाची राणी म्हणजे सुरंगी असे वाटते मला. वर्षातून एकदाच मिळणारा सुरंगीचा सुगंध अनुभवणे म्हणजे स्वर्गसुख.

१३)
ही तर आपल्या फांद्यांनाही नैसर्गिक गजर्‍यात गुंफते.

१४) गगनाच्या सुशोभीकरणासाठी गिरीपुष्प भरभरुन फुलतो.

१५) गगनाला भिडण्याची आस ठेवणारा पांढर्‍या रंगातील गिरीपुष्प

१६)

१७) बाळकैर्‍या बाळसं धरतायत.

१८) ऐटदार कांचन.

१९) पर्जन्य वृक्षावर पुष्पवर्षाव.

२०) उन्हात जणू चांदण पसरलय अस पैशाच झाड म्हणजे वावळ.

२२)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर फोटो,
जागू, वसंत म्हणजे पिवळा रंग हवाच, तुझे सोन सावरीचे पण फोटो दे इथे.

केपी, चैत्राली धन्यवाद.

सुरंगी आहे ना पिवळी Happy

सोनसावरीचे फोटो मी काढलेले नाहीत. पण उद्या दुसरे पिवळ्या फुलांचे फोटो शोधते.

लेले काका, कंसराज, जिप्सी धन्यवाद.

शोभा तू क्रोमातूनच का नाही आधीच वाचत? धन्यवाद तुलाही इतके कष्ट करून पाहीलेस म्हणून Happy

लेले काका, कंसराज, जिप्सी धन्यवाद.

शोभा तू क्रोमातूनच का नाही आधीच वाचत? धन्यवाद तुलाही इतके कष्ट करून पाहीलेस म्हणून Happy

फार फार छान फोटो आहेत. मला हे कुसुंबी प्रत्यक्ष बघायचे आहे. मुंबई आसपास शक्यतो पश्चिम उपनगरात कुठे दिसण्याची शक्यता आहे का? नॅशनल पार्क मधे आहे का?

Pages