"काष्ठशिल्पांची अद्भुत नगरी" - घोणे काष्ठशिल्प संग्रहालय (कोलाड)
Submitted by जिप्सी on 25 March, 2017 - 22:47
मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करताना कोलाड रेल्वे स्टेशनजवळ, महामार्गाला लागुनच "कलाकृती" नावाचे एक हॉटेल आहे. खरंतर प्रत्येक महामार्गावर गावाजवळ/गावाबाहेर हॉटेल्स, ढाबे हे दिसतात. पण या "कलाकृती" हॉटेलमध्येच वसली आहे "काष्ठशिल्पांची एक अद्भुत नगरी" श्री रमेश घोणे यांचे "घोणे काष्ठशिल्प संग्रहालय". लाकडाच्या ओबडधोबड ओंडक्यामधुन साकार झालेल्या विविध कलाकृतींची अनोखी दुनिया या संग्रहालयात पाहण्यास मिळते. या नानाविध वस्तुंना "काष्ठशिल्प कला" आणि इंग्रजीमध्ये याला ड्रिफ्टवूड असे म्हणतात. म्हणजेच जळाऊ, टाकाऊ आणि जंगलातुन गोळा करण्यात आलेल्या लाकडांमधुन साकार करण्यात आलेल्या विविध कलाकृती.
विषय: