"काष्ठशिल्पांची अद्भुत नगरी" - घोणे काष्ठशिल्प संग्रहालय (कोलाड)

Submitted by जिप्सी on 25 March, 2017 - 22:47

मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करताना कोलाड रेल्वे स्टेशनजवळ, महामार्गाला लागुनच "कलाकृती" नावाचे एक हॉटेल आहे. खरंतर प्रत्येक महामार्गावर गावाजवळ/गावाबाहेर हॉटेल्स, ढाबे हे दिसतात. पण या "कलाकृती" हॉटेलमध्येच वसली आहे "काष्ठशिल्पांची एक अद्भुत नगरी" श्री रमेश घोणे यांचे "घोणे काष्ठशिल्प संग्रहालय". लाकडाच्या ओबडधोबड ओंडक्यामधुन साकार झालेल्या विविध कलाकृतींची अनोखी दुनिया या संग्रहालयात पाहण्यास मिळते. या नानाविध वस्तुंना "काष्ठशिल्प कला" आणि इंग्रजीमध्ये याला ड्रिफ्टवूड असे म्हणतात. म्हणजेच जळाऊ, टाकाऊ आणि जंगलातुन गोळा करण्यात आलेल्या लाकडांमधुन साकार करण्यात आलेल्या विविध कलाकृती. निसर्गाच्या मृत अवस्थेत दडलेल्या अप्रतिम शिल्पांना जिवंत रूप देण्याचे कसब श्री रमेश घोणे यांनी केले आहे आणि निसर्ग हा आपला गुरू असुन निसर्गातील घटकांचे बारकाईने निरिक्षण केले असता खुप काही गवसते याची पुरेपुर अनुभुती हे संग्रहालय पाहताना होते.

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

Group content visibility: 
Use group defaults

माझी आवडती जागा आहे ही. मागच्या वर्षी इंदापूरला असाच एक छान पॉटरी स्टुडिओ कळला.

हो जाई, विक्रीसाठी आहेत.

ह्या कलाकृती विक्रीसाठी उपलब्ध आहेत का ?>>>येस्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. Happy

मागच्या वर्षी इंदापूरला असाच एक छान पॉटरी स्टुडिओ कळला.>>>>>आडो, इंदापुरला कुठे?

सुंदरच...
मला प्रचि ९ सर्वात जास्त आवडला...नजर आणि कवड्याची माळ वगैरे सॉल्लिड्ड दिसतयं...
प्रचि २० पन छानच..
इतरही मस्त आहे पण हे दोघे नजर खिळवून ठेवतात..

खूप सुंदर.. अप्रतिम आणि सगळेच फोटो क्लास आलेत..
प्रचि ०८ मला आवडला.. उत्साह आहे

सर्वात आवडले ते "गुटख्याने दिला फटका...... "
मी अमूर्त शैलीला नाके मुरडतो, पण वरील गोष्टी आवडल्या.
इथे दिल्याबद्दल धन्यवाद.

छान प्रचि. किती कला आहे. केरळात ह्या ड्रिफ्ट वूडचे फर्निचर बनवतात. भली मोठी सेंटर टेबले बघितली आहेत.

छान प्रचि. किती कला आहे. केरळात ह्या ड्रिफ्ट वूडचे फर्निचर बनवतात. भली मोठी सेंटर टेबले बघितली आहेत.

सगळ्याच प्रचि अतिशय उत्तम आहेत. विक्रिसाठी पण आहेत ते बरे. अन्यथा एवढ सगळ फक्त डोळ्यात साठवुन घरी यायला नको वाटत.

प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे मनःपूर्वक धन्यवाद!!!

मला फोटोच दिसत नाहीत काय करु.>>>>>विद्या१, Mozila Firefox मध्ये ओपन करून बघा ना.