खग ही जाने खग की भाषा -भाग ८ सातताल नैनीताल उत्तराखंड

Submitted by कांदापोहे on 7 April, 2017 - 02:44

भारतात पक्षीनिरीक्षकांची पंढरी म्हणता येईल अशी ३-४ महत्वाची ठिकाणे आहेत. सह्याद्री किंवा पश्चिम घाट (Western Ghat), कच्छचे रण, अरुणाचल प्रदेश व उत्तराखंड. यापैकी या आधी पश्चिम घाटातील अनेक ठिकाणांविषयी मी लिहीलेले आहेच. आत्ता पर्यंत महाराष्ट्र कर्नाटका व गोवा या भागात फिरुन झाले आहे. तमिळनाडु, केरळा, पश्चिम बंगाल, गुजराथ व अरुणाचल अजुनही झालेले नाही.

अचानक एका मित्राच्या आग्रहामुळे यावर्षीची सुरुवात मात्र सातताल नैनीताल पानगोट या उत्तराखंडाच्या भागात झाली व माझ्या पक्षांच्या यादीमधे १००+ नविन पक्षी जमा झाले. अर्थात सर्वच पक्षांचे फोटो काढता आले नाहीतच. उत्तराखंड मधेच आणखी एक चोपता-तुंगनाथ भाग आहे तो पण राहीलाच आहे.

मी गेलो होतो ते उत्तराखंडातील सातताल या नैनीताल जवळच्या एका गावात. इथे श्री लामा यांचे एक छोटेसे रिसॉर्ट आहे व पक्षीनिरीक्षणाकरता अत्यंत उपयुक्त अशी जागा तयार केली आहे. पुण्यातुन दिल्लीपर्यंत विमानाने व पुढे रानीखेत एक्प्रेसने काठगोदाम पर्यंत जाऊन तिथुन नैनीताल साततालला साधारण ६-७ वाजता पोचलो. तिथे पोचतो ना पोचतो तोच श्री लामा आले व म्हणाले की जा लवकर खलीज पिझंट आला आहे. आमच्या ८ लोकांपैकी ५ जण तसेच पटकन पळाले. ना तोंड धुतले ना बॅग उघडल्या.

त्या सर्वांना खलिजचे फोटो लगेच मिळाले व मी धरुन उरलेल्या ३ लोकांना पुढचे ५ दिवस खलिज काही दिसला नाही. त्याबद्दल पुन्हा कधीतरी. असो खुप प्रस्तावना झाली आता पेश करत आहे खग ही जानेचा पुढचा भाग.

खग ही जाने - सातताल उत्तराखंड

Striated Laughingthrush

निळा शिळ कस्तुर (Blue Whistling Thrush)

पिवळ्या मानेचा सुतार (Greater Yellownape Woodpecker)

तपकिरी गळ्याचा सुतार (Brown Fronted Woodpecker)

तुरेवाला धीवर (Crested Kingfisher)

बदामी पोटाची शिलिंध्री (Chestnut-bellied Nuthatch)

निळ्या पोटाचा कुटुरगा किंवा तांबट (Blue Fronted Barbet)

Russet Sparrow

Rufous-chinned Laughingthrush

Rufous Sibia

पांढर्‍या गालाचा बुलबुल/पिवळा बुडाचा बुलबुल Himalayan Bulbul/Yellow Vented Bulbul

Himalayan Bulbul 2

पिवळ्या मानेचा सुतार (Greater Yellownape Woodpecker)

काळा तित्तीर (Black Francolin)

Great Barbet

राखी डोक्याचा सुतार (Grey-Headed Woodpecker)

Red Billed Blue Magpie

Red Billed Blue Magpie

राखी पंखाचा कस्तुर (Gray Winged Blackbird)

या आधीचे भाग खालीलप्रमाणे
उडान - भिगवण पक्षीनिरीक्षण इथे http://www.maayboli.com/node/22764 बघता येईल.
खग ही जाने खग की भाषा -भाग १ इथे http://www.maayboli.com/node/26925 बघता येईल.
खग ही जाने खग की भाषा -भाग २ इथे http://www.maayboli.com/node/32865 बघता येईल.
खग ही जाने खग की भाषा -भाग ३ इथे http://www.maayboli.com/node/42131 बघता येईल.
खग ही जाने खग की भाषा -भाग ४ इथे http://www.maayboli.com/node/51921 बघता येईल.
खग ही जाने खग की भाषा -भाग ५ इथे http://www.maayboli.com/node/53885 बघता येईल.
खग ही जाने खग की भाषा -भाग ६ इथे http://www.maayboli.com/node/54576 बघता येईल.
खग ही जाने खग की भाषा -भाग ७ इथे http://www.maayboli.com/node/58710 बघता येईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कांदापोहे अरे काय चेष्टाय कि काय राव... एका पेक्षा एक फोटो... अप्रतीम...
एकाद पुस्तक छापा याच, मस्त क्वॉलिटी आहे फोटोची...

तुमच्या कॅमेर्‍याची माहीती टाकता का ?

नितांत सुंदर....देवाच्या रंगपेटीची कलाकुसर...इवलेसे जीव आणि किती रंग आणि किती छटा त्या !
तुमचे छायाचित्रण पण लाजवाब...त्यांचे रंग, पिसांचा पोत, हावभाव...मस्त टिपले गेले आहेत.
सेकंदांच्या अवधीत, चाहुलीने ते उडून जायच्या आत, कॅमेर्‍याची योग्य जुळणी करून.....कसब आहे.
भाग्यवान आहात...हा खजिना प्रत्यक्ष बघताय, ऐकताय आणि धन्यवाद...आमच्यासाठी घेउन येता.

मस्तच.
पण नेहमीची केपीची फोटोग्राफी मिसिंग वाटली. Happy

धन्यवाद सर्वांना. Happy

मोरपंखिस माझ्याकडे निकॉन ७१०० व टॅमरोन १५०-६०० लेन्स आहे.

जिप्स्या धन्यवाद रे. जानेवारीमधे लाईट खुप खराब असतो व थंडी धुके. त्यामुळे फोटो मधे त्याचा परिणाम दिसतोच.

Pages