.
.
हसणे आणि रूसणे
ह्यातील फरक
जेंव्हापासून
कळायला लागला
तेव्हा पासून
आयुष्याचं गणित
विस्कटायला लागलं
आठवणीतले दिवस
आठवणीतच विरून गेलें
साठवावे जेवढे तेही
कमीच वाटू लागले
संगतीने जर कोणाच्या
माणूस घडत जातो
तर निसर्गाच्या संगतीत
मी कविता करायला लागलो
विसरलो होतो
जो स्वत:ला
पुन्हा मिळायला लागलो
हा लेख New Jersey च्या रंगदीप या दिवाळी अंकात प्रकाशित झाला आहे
-------------------------
२०१५ चा हॉलिडे सिझन. जवळजवळ रोजच पार्ट्या चालू होत्या. अश्याच एका पार्टीत, संगीताच्या तालावर धुंद नाचून दमलेली मंडळी जेवायला बसली होती.
“अगं, शेतकऱ्यांच्या आत्महत्येविषयीचा व्हिडिओ पाहिलास की नाही? कित्ती वाईट वाटतं ना ग त्यांची छोटी छोटी मुलं आणि म्हातारे आईवडील बघून?”
घरगुती समारंभासाठी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात गुजरातला जायचे आहे. त्या काळात नलसरोवर पक्षी अभयारण्यात रोहित ( फ्लेमिंगो) पक्षी पहायला मिळतील का? अजून कोणते पक्षी दिसू शकतील? तिथे राहण्याची सोय कशी आहे? की अहमदाबादला राहणे सोयीचे होईल?
अथांग हा तुझा देह न पुरे या लोचनी
नजर होते सैरभर पहातो श्वास रोखुनी
तळाची परिसीमा भिडते हृदयाच्या अंतरी
भासते नववधू प्रिये समान तू या भूवरी
मंथनाच्या डोहात जग हे सामावलेले
निळाशार स्पर्शात शरीर आसुसलेले
उत्कटतेच्या परमबिंदूत मन शहारलेले
जसे दिवस नि रात्र भेटीस आतुरलेले
एका भिताडावरून उडी हाणताना नेमकं एक भगुणं मधी आलं आणि भुऱ्या सामानासकट खाली कोसळला. चिंचेखालच्या कुत्र्याने कान टवकारले. गडद अंधारात उन्मळून पडलेला भुऱ्या त्याला दिसला आणि ते दबकून गेलं. सवंदडीतली म्हैस बिथरली. हुकल्यासारखा क्षणोक्षणी लागून विझणारा एक जुनाट बल्ब बोचऱ्या थंडीशी लढत होता. मंद हवेची एक झुळूक बाजरीच्या ताटातून सळसळत निघून गेली.
भुऱ्यानं सावध कानोसा घेतला. चप्पल अर्धवट तुटलं होतं. नडगी फुटली होती. हात सालवटून निघाले होते. डोक्याला मुक्का मार बसला होता.
कॅनडातली बुचार्ट गार्डन ही जागा. वेगवेगळ्या ऋतूत वेगळा अनुभव देणारी. मागच्या वर्षी बुचार्ट गार्डन ला भेट दिली त्या दिवशी भरपूर पाऊस होता. त्यामुळे बागेचे, फुलांचे फोटो काढण्यापेक्षाही मला माणसं आणि त्यांच्या हातातल्या छत्र्या ही स्टोरी कॅपचर करावीशी वाटली होती. ते फोटोज मी शेयर देखील केले होते.
यावर्षी परत एकदा बुचार्ट गार्डनला जायचा योग आला. यावेळी मस्त सूर्यप्रकाश आणि त्या प्रकाशात आपले रंग मुक्तपणे उधळणारी फुलं यांनी माझं लक्ष वेधून घेतलं.
शनिवार रविवार नेहमीप्रमाणे कॅम्पिंग ट्रिप च्या नियोजनासाठी वेल्ह्याला जाणे झाले. अगदी अचानक ठरल्यामुळे एकट्यावरच सगळी जबाबदारी आली. एकटाच असल्यामुळे दुचाकी वर जाणेच पसंत केले. पुणे बेंगलोर महामार्ग सोडुन वेल्ह्याकडे निघालो. तस पाहता चेलाडी-वेल्हे-केळद(-महाड) हा देखील राज्य महामार्गच आहे. रस्त्यावर गाड्यांची वर्दळ होतीच. दुचाकी असल्याने वेग मर्यादीत होता. त्यातच आपल्याकडे रात्रीच्या वेळी वाहने चालवताना समोरच्या गाडीच्या हेडलाईट चा झोत डोळ्यावर आल्याने डोळे दिपुन जात होते. त्यातच हेल्मेट घातले होते, त्यामुळे रस्त्यावर किंवा आजुबाजुला फारसे पाहता येत नव्हते किंवा दिसत ही नव्हते.
मुळातच नोकरी करणारे म्हटले की हे plans क्वचितच सफल होतात,आणि ऐनवेळेस काही मंडळी बारगळणारी ही असतात...तसच आमच्या बाबतीतही हि योजना असफल होता-होता राहिली...भटकंती हि पुर्णांती सफल होण्यासाठी प्रत्येकाचाच उत्स्फूर्त प्रतिसाद हवा even हा अनुभव खूप जणांचा असेल तो नव्याने सांगत नाही...असो..दोन आठवड्यांच्या काथ्याकूट चर्चेनंतर, अगणित घेतलेल्या मीटिंग्स नंतर कुठेतरी जायच हे निश्चित होत बरीचशी संकेत स्थळ, आसपास असलेली ठिकाण वेळोवेळी search करून पालथी घातली आणि आमच्या अवाक्यातील ठिकाण म्हणून ब्रम्हगीरी फेरी किंवा पर्वत हे ठिकाण सगळ्यांच्या संगनमताने ठरवण्यात आल होत कारण जोडूनच सुट्टी असल्याने दुसऱ
घराचं अंगण अगदी कुणाच्या खिजगीणतीतही नसलेला विषय...पण तरी यावर लिहावंसं वाटतंय...घराला अंगण असणारे किती भाग्यशाली असतात हे पुण्या मुंबईत फ्लॅट मध्ये राहणाऱ्याला विचारा? हा लेख लिहीत असताना कदाचित मी त्यांच्या दुखऱ्या भागावरील खपल्याही काढत असेल याबद्दल क्षमस्व!!! पर्यायाने माझ्याही...